You are currently viewing गुरु परिवर्तन २०२०: मीन राशी किंवा मीन लग्न

वरील चंद्र राशी कुंडली किंवा लग्न कुंडली मीन राशी आणि मीन लग्नाची आहे. जर आपण मीन राशीचे आहात किंवा मीन लग्नाचे आहात तर खाली दिलेले गुरु च्या बदलाचे विषय हे आपल्याला दिनांक २०/११/२०२० ते २०/११/२०२१ पर्यंत मिळतील.

दिलेला लेख वाचायच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुरु ची बेसिक माहिती अणि गुरु बदलाचे बेसिक परिणाम वाचून घ्या.

मला समजलेला ज्योतिष मधील गुरु ग्रह

https://shreedattagurujyotish.com/mala-samazalela-jyotish-madhil-guru/

गुरु चा मकर राशीत प्रवेश : दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२१

https://shreedattagurujyotish.com/guru-cha-makar-rashit-pravesh-from-20november-2020-to-20-november-2021/

आपल्या मीन राशी किंवा मीन लग्नाच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु हा मागील एक वर्षे धनु राशीत म्हणजे जिथे ९ लिहिला आहे कुंडलीच्या दहाव्या (कर्म) स्थानी येथे गुरु होता. आता तो आपल्या कुंडलीत कर्म स्थान सोडून अकराव्या स्थानी आला आहे जिथे १० लिहिले आहे शनी च्या राशीत आणि शनी बरोबर येथे तो दिनांक २१/११/२०२१ पर्यंत राहील.

गुरु आणि शनी ची युती

गुरु आणि शनी ची युती आपल्या अकराव्या स्थानी जी आहे त्यात आपल्याला ह्या स्थानातील काही चांगली वाईट दोन्ही फळे देईल. अकराव्या स्थानावरून तुमच्या इच्छापूर्ती, सर्व प्रकारचे लाभ पहिले जातात. हे विषय ह्या वर्षी आपल्यासमोर येतील.

येथील गुरु आणि शनी ची युती जे जे मीन लग्न किंवा मीन राशी च्या व्यक्ती आहेत त्यांना ह्या वर्षी त्यांच्या मागील राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या ऍक्टिव्हिटी समोर येताना दिसतील. त्यात खास संतती,करिअर,पराक्रम शिक्षण आणि विवाह हे विषय असतील.

गुरु च्या दोन राशी एक धनु ९ नंबर हे स्थान जिथे आहे तिथून तुमचे कर्म स्थान पहिले जाते. त्या बद्दल तुम्ही आता जास्त ऍक्टिव्ह होऊन त्यासाठी आपल्या स्किल चा प्रयत्न करून त्यातून लाभ मिळविणार आहात. व्यापारासाठी हि चांगली संधी दिसते.

गुरु ची १२ नंबर ची मीन राशी तुमच्या पत्रिकेत पहिल्या स्थानी आहे पहिले स्थान हे तुमच्या प्रेसेंटेशन चे असते. जेव्हा ह्या स्थानाचा मालक लाभ स्थानात येतो तेव्हा व्यक्तीला आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीची उत्कंठा दिसते. ह्या वर्षी म्हणजे दिनांक २१/११/२०२१ पर्यंत तसेच दिसत राहील. प्रत्येक ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही प्रॉफिट चा विचार कराल. पण थोडा त्रास हा शनी मुळे दिसेल कारण शनी ची तिसरी दृष्टी हि लग्न स्थानावर येत आहे कामे उशिरा होतील तरी सुद्धा जिद्द चिकाटी सोडू नका शेवटी आपली ह्या वर्षी इच्छा पूर्ण झालेली दिसेल.

गुरु ची ७ वि दृष्टी

गुरु आणि शनी ची दृष्टी हि आपल्या पत्रिकेच्या ५ व्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिला आहे शनी ची दृष्टी सुद्धा ह्या स्थानावर येत आहे जिथे ४ लिहिले आहे तिथून संतान, प्रेम, ज्ञान, शिक्षण ह्याबद्दलचे विषय ह्या वर्षी समोर येतील. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि दाम्पत्यांना संतती विषय हे चांगले असतील पण त्यात तुम्ही आत्तापर्यंत काही त्रास घेतलेला असेल तर हे वर्ष महत्वाचे असेल.

गुरु ची ५ वि दृष्टी

हि दृष्टी तिसऱ्या स्थानावर जिथे २ लिहिले आहे पण तेथे दिनांक २४/९/२०२० ला जो राहू आला आहे तो १८ महिन्यासाठी म्हणून आपल्या समोर छोटे प्रवास, पराक्रम करण्यासाठी काही प्रयत्न दिसतील. त्यात तुम्हाला लाभ दिसतील.

गुरु ची ९ वि दृष्टी

हि तुमच्या पत्रिकेत जिथे ६ नंबर आहे तेथे येत आहे हे पत्रिकेचे सातवे स्थान असते गुरु ची इथे पडणारी दृष्टी हि नीच आहे आणि अकराव्या स्थानातून येत आहे. त्यामुळे आपल्याला विवाह आणि वैवाहिक सुखाबद्दल च्या सर्व ऍक्टिव्हिटी इथे मिळतील. जे जे दाम्पत्य मागील काही वर्षे आपल्या कोणत्या तरी एका विषयी बद्दल काळजीत असतील त्या बद्दलची सर्व कामे ह्या वर्षी २१/११/२०२१ पर्यंत होईल.

गुरुचे उपाय

मीन राशी आणि मीन लग्न वाल्याना गुरुचे बदलाचे उपाय करताना प्रत्येक गुरुवारी किंवा जमेल तर रोज कोणत्याही गुरुचे वाचन करणे हितावह ठरेल. जसे गुरुचरित्र, स्वामींची कथा, स्तोत्रे , गुरु मंत्र गुरु दर्शन करत राहावे त्याने जास्त चांगले परिणाम दिसतील.

गुरु च्या नक्षत्र भ्रमणाचे मीन राशी आणि मीन लग्नावर होणारे परिणाम देतो

  • २०/११/२०२० ला जेव्हा गुरु मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो उत्तराषाढा नक्षत्री असेल आणि तो ह्या नक्षत्री दिनांक ६/१/२०२१ पर्यंत असेल. हा काळ आपल्या करिअर मधील नोकरी संदर्भातील असेल जर हे विषय नसतील तर काही आजारांबद्दल सुद्धा काही जणांना इथे धावपळ करावी लागेल. आधीचे काही आजार असतील तर हा विषय असेल. ज्यांना २०/११/२०२० नंतर ज्यांना नवीन नोकऱ्या लागल्या असतील त्यांना ६/१/२०२० पर्यंत त्यात काही बदल दिसतील लगेच.
  • पुढे ७/१/२०२१ पासून तो ४/३/२०२१ पर्यंत गुरु श्रवण चंद्राच्या नक्षत्री असेल. मीन राशी आणि मीन लग्न राशीच्या सर्व विद्यार्थाना शिक्षणासाठी काही नवीन पाऊले इथे उचलून प्रगती दिसेल. तशी परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याचे दिसते. ज्या दाम्पत्यांना संतान विषय असेल अशा सर्वानी इथे प्रयत्न जरूर करावेत यश आपल्या हाती आहे.
  • ५/३/२०२१ पासून गुरु २२/५/२०२१ पर्यंत धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असेल. इथे आपल्याला काही कुटुंब आणि आपले भाग्य ह्यासाठी धावपळ दिसेल. भाग्याबद्दल इथे तुमची धावपळ हि जास्त अग्रेसिव्ह असेल काही वेळा इथे कुटुंबातील विषय जास्त त्रास देणारे असू शकतील.
  • २२/५/२०२१ पासून गुरु २०/७/२०२१ पर्यंत शततारका राहूच्या नक्षत्री असेल. ह्यात ५/३/२०२१ ते २२/५/२०२१ मध्ये ज्या ज्या घटना घडतील तर त्यात थोडा जास्त त्रास होण्याची संभावना असेल ह्या कालावधीत सल्ला असा देण्यात येतो कि इथे कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
  • २०/७/२०२१ पासून गुरु पुन्हा धनिष्ठा नक्षत्री येईल आणि पुढे २/१/२०२२ पर्यंत गुरु ह्याच नक्षत्री असेल. पण कुंभ मधून २०/११/२०२१ ला निघेल आणि कुंभेत असेल पुढे. हा काळ सर्व मीन राशी लग्न वाल्याना उत्तम जाऊ शकेल. पैसा आणि भाग्य ह्या दोन्ही गोष्टी कव्हर झाल्यासाख्या वाटतील.

सर्वात महत्वाचे मीन राशी आणि मीन लग्नवाल्याना

गुरु च्या कुंभ राशीच्या प्रवेशाच्या सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे मी कि —

कुंभ राशीत गुरु ५ एप्रिल २०२१ पासून मार्गी असेल तो दिनांक २० जून २०२१ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ८ डिग्री १ अंश आणि ३८ विकला नंतर कुंभ राशीतून उलट फिरण्यास सुरुवात होईल म्हणजे तो कुंभ राशीत वक्री असेल.

पुढे तो २० जून २०२१ पासून उलट फिरत फिरत मागे मागे येत १४ सप्टेंबर ला दुपारी १२:५७ ला कुंभ राशीतून बाहेर पडेल. म्हणजे दिनांक २०/६/२०२१ ते १४/९/२०२१ पर्यंत कुंभ राशीत गुरु वक्री असेल.

२०/६/२०२१ ते १४/९/२०२१ कालावधीत मीन राशी आणि मीन लग्न वाले जर परदेशात असतील तर त्यांना हा काळ पुन्हा मायभूमीत येण्याचा काळ असेल. आपल्या कडून गेलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील असे वाटेल. परदेशात जाण्यासाठी हा काळ आपल्यासाठी खास नाही निर्णय घेऊ नये.
ज्यांच्या पत्रिकेत गुरु वक्री असेल त्यांना हे विषय उत्तम परिणाम देणारे असतील.

गुरु चे हे भ्रमण आपल्या सर्वाना उत्तम ज्ञान आरोग्य आणि धन देऊन सुखी करो हीच प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply