You are currently viewing नवरात्रीचे पाठ आणि इतर मंत्र / स्तोत्र वाचन

नवरात्रीचे पाठ आणि इतर मंत्र

जर आपण घट बसावीत असाल किंवा उपवास करीत असाल तर त्याच्या स्थापनेची विधी खालील लिंक वर दिली आहे त्यावर क्लिक करून वाचून घ्यावी.

पूर्ण नवरात्रीच्या पर्वात सर्वात सुंदर आणि देवीला आळविणारे जर कोणते वाचन असेल तर ते दुर्गा सप्तशती पाठ आहे. पूर्ण श्रद्धेनं आणि नियमांनी केलेले हे पाठ आपल्या नवरात्रीच्या ह्या पर्वात आपल्याला काहीतरी शक्ती देऊनच जातील ह्यावर पूर्ण विश्वास ठेवा.

काही जणांना हे जर पॉसिबल नसेल तर रोज श्री सूक्त आणि त्याबरोबर देवी कवच वाचू शकता.

हे हि पोससीबल नसेल तर देवीच्या आराधनेसाठी घरात बसून एक माळ किंवा रोज ११/२१/५१ माळा नवार्ण मंत्राचा जप केल्याने सुद्धा आई भगवती ची साधना पूर्ण झाल्याचे फळ मिळेल. आणि तिचा आशीर्वाद मिळाल्यावाचुन राहणार नाही.

केव्हा करावा मंत्र जप

सकाळी स्नान कर्म झाल्यावर पूर्व दिशेला बसून वरील कोणतीही साधना करू शकता. शक्यतो वेळ हि ७ ते ८ पर्यंत असावी.

सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळी आरती आधी किंवा आरती झाल्यावर सुद्धा वरील कोणतीही साधना वाचन मंत्र जप करू शकता.

नवरात्रीचे महत्व हे नऊ रात्रीचे आहे आणि त्यासाठी जर शक्य असेल तर वरील कोणतीही साधना हि रात्री ११ वाजता सुद्धा करू शकता.

कसे करावे

आधी कोणती साधना जमेल त्याची निवड करावी.
पूर्ण शद्ध होऊन ह्या साधना कराव्यात
ह्यात पूर्व किंवा उत्तरेला मुख असावे
बसायला आसन असावे लाल असेल तर उत्तम
लाल वस्त्र परिधान करून हि साधना उत्तम असेल जमले नाही तर एखादे लाल वस्त्र जवळ घेऊन बसावे.
सुरुवात करण्या अगोदर आचमन करावे उजव्या हातात तीन वेळा पाणी घेऊन ॐ केशवाय नमः ॐ माधवाय नमः ॐ नारायणाय नमः असे म्हणून तीनदा प्यावे आणि चौथ्या वेळी पुन्हा एकदा पाणी घेऊन ॐ गोविंदाय नमः असे पाणी एका प्लेट मध्ये खाली सोडावे. हा शुद्धीकरणाचा बेसिक प्रोसेस आहे.

फक्त पहिल्या दिवशी कोणतीही साधना करताना जर कोणत्या कार्यसिद्धी साठी हे करीत आहेत तर त्याचा संकल्प करून घ्यावा. हे घटस्थापना च्या पोस्ट मध्ये संकल्प विधी दिला आहे. वाचून घ्यावे.

नंतर आपण जी साधना निवडली आहे त्याची सुरुवात करावी.

पुढील लेखात दुर्गा सप्तशती च्या पाठाचा वाचन विधी देणार आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply