दीपावली २०२३ : शुभ मुहूर्त तालिका
दिनांक 9 नोव्हेंबर २०२३ : रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी.
- एकादशी मुहूर्त — एकादशी तिथि आरंभ: ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ८:२३ पासून.
- एकादशी तिथि समाप्त: ९ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०:४१ पर्यंत.
- एकादशी व्रत पारण तिथि: (उपवास सोडणे) १० नोव्हेंबर २०२३ सकाळी ६:४३ ते ८:५९ पर्यंत.
एकादशी जरी ८ नोव्हेंबर ला सुरु झाली असली तरी एकादशी व्रत उपवास हा ९ नोव्हेंबर २०२३ ला असेल. ह्याचे कारण ९ नोव्हेंबर च्या सूर्योदयाला लागणारी एकादशी तिथी.
रमा एकादशी कथा आणि एकादशी टिप्स साठी खाली दिलेल्या लिंकवर अधिक माहिती मिळावा. पण त्यातील मुहूर्त घेऊ नका फक्त महत्व वाचून घ्या.
९ नोव्हेंबर २०२३ : गोवत्स द्वादशी – वसुबारस
गोवत्स द्वादशी पूजा मुहूर्त — प्रदोषकाल सायंकाळी ६:०२ पासून ते ८:३४ पर्यंत.
गोवत्स द्वादशी चे महत्व आणि एक सुंदर छोटा विचार गाय आणि ज्योतिष बद्दल हे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. पण त्यातील मुहूर्त घेऊ नका फक्त महत्व वाचून घ्या.
१० नोव्हेंबर २०२३ : धनत्रयोदशी, धन्वन्तरी जयंती, भौमप्रदोष आणि यमदीपदान
- धनतेरस पूजा मुहूर्त – सायंकाळी ६:२० ते ८:२० रात्री पर्यंत.
- प्रदोष काल – सायंकाळी ६:०२ ते रात्रौ ८:३४
- वृषभ काल – सायंकाळी ६:२० ते रात्रौ ८:२०
खालील लिंकवर कुबेर पूजन, धनतेरस, धन्वन्तरी आणि यांदीपदानाचे विशेष महत्व जाणून घ्या.
काय आहे प्रदोष? काय महत्व आहे प्रदोषाचे? प्रदोष काळ कसा ओळखावा? प्रदोष व्रत सामान्य विधी आणि पौराणिक कथा खाली दिलेल्या लिंकवरून मिळावा पण त्यातील मुहूर्त घेऊ नका फक्त महत्व वाचून घ्या.
- यम दीपदान १० नोव्हेंबर २०२३
- यम दीपदान १० नोव्हेंबर सायंकाळी ६:०२ ते ७:१८
१२ नोव्हेंबर २०२३ : नरक चतुर्दर्शी
- चतुर्दशी तिथि प्रारम्भ – ११ नोव्हेंबर २०२३ दुपारी १:५७ पासून.
- चतुर्दशी तिथि समाप्त – १२ नोव्हेंबर २०२३ दुपारी २:४४ पर्यंत
अभ्यंग स्नान मुहूर्त १२ नोव्हेंबर ला पहाटे ५:३५ ते ६:४४ पर्यंत असेल. १ तास ९ मिनिटे.
१२ नोव्हेंबर २०२३ : लक्षमीपूजन
- अमावस्या प्रारंभ — दिनांक १२ नोव्हेंबर दुपारी २:४४ पासून
- अमावस्या समाप्ती — दिनांक १३ नोव्हेंबर दुपारी २:५६ पर्यंत
- लक्ष्मी पूजन ६:०० ते रात्री ८:३३ पर्यंत असेल.
- वृषभ काल- सायंकाळी ६:१२ पासून ते ८:१२ पर्यंत.
दिवाळीत महालक्ष्मी पूजन हे खास ज्या दिवशी स्वाती नक्षत्र आणि तिथी अमावस्या असेल त्या दिवशी वृषभ लग्नी/प्रदोष काली करतात.
स्थिर लग्नी लक्ष्मी पूजन करावे जेणे करून आपल्याला लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो आणि ती आपल्याकडे स्थिर राहते.
ज्यांना वरील मुहूर्त जमत नसेल काही कारणास्तव खास व्यापाऱ्यांना त्यांनी खालील वेळेत मंत्र जप आणि महालक्ष्मी पूजा करण्यास हरकत नाही.
१२ नोव्हेंबर २०२३ सिंह लग्न रात्री १२:३८ पासून ते पहाटे २:४६ पर्यंत ( रात्री १२ नंतर १३ तारिख सुरु होत असेल तरी हरकत नाही ती इंग्लिश तारीख आहे))
महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या काही वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी
महालक्ष्मी ला प्रसन्न करणाऱ्या ४ वस्तूंची माहिती आणि त्या वस्तूंची पूजन विधी
कलश निर्माण विधी
महालक्ष्मी जप विधी
महालक्ष्मी मंत्र
महालक्ष्मी पाठ
हवन विधी
१४ नोव्हेंबर २०२३ : गोवर्धन पूजा मुहूर्त, अन्नकुट.
- मुहूर्त — सकाळी ६:५ मिनिटांपासून सकाळी ९:०० पर्यंत
गोवर्धन पूजेबद्दल सर्व माहिती खालील लिंक वर मिळावा.
१४ नोव्हेंबर २०२३ : बलिप्रतिपदा
प्रतिपदा तिथी प्रारंभ – १३ नोव्हेंबर दुपारी २:५६ पासून
प्रतिपदा तिथी समाप्ती – १४ नोव्हेंबर दुपारी २:३६ पर्यंत
संपूर्ण माहिती खालील लिंक वर दिली आहे.
यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज + दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व
१५ नोव्हेंबर २०२३ : भाऊबीज, यमद्वितीया
- द्वितीया तिथी प्रारंभ — १४ नोव्हेंबर दुपारी २:३६ पासून
- द्वितीया तिथी समाप्ती — १५ नोव्हेंबर दुपारी १:४७ पर्यंत.
भाऊबीज ओवाळणी मुहूर्त १५ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०:४५ ते १२:०५ पर्यंत.
काही ठिकाणी भाऊबीज हि १५ ऐवजी १४ नोव्हेंबर ला दाखविली आहे ह्याचे कारण द्वितीया तिथी १४ नोव्हेंबर ला दुपारी २:३६ पासून सुरु होत आहे आणि ती १५ नोव्हेंबर ला दुपारी १:४७ पर्यंतच आहे. मात्र उदय तिथी अनुसार १५ नोव्हेंबर ला दिलेल्या वेळेत ओवाळणी करावी.
नंतर राहू काळ दुपारी १२:२२ पासून ते १:४७ पर्यंत आहे आणि राहू काळात ओवाळणी करू नये.
यमद्वितीयेलाच का मानवली जाते भाऊबीज + दीपावली पाडवा + बलिप्रतिपदे ची कहाणी आणि महत्व
नोट — वरील सर्व माहिती हि फक्त ह्या दीपावलीच्या त्या त्या दिवसांच्या मुहूर्तासाठी आहे. वरील प्रत्येक दिवसांचे महत्व/विधी/उपाय अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या खालील लिंक वर क्लिक करून मिळवावी लागेल. मात्र त्यात दिलेले मुहूर्त हे २०२० चे असतील कृपया ते घेऊ नये.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९