You are currently viewing वैवाहिक सुखात १००% घटस्फोटापर्यंत एकदा तरी जाणाऱ्या पत्रिका

खाली ७ लग्न कुंडल्या मांडून दाखविल्या आहेत. त्यात आपल्याला फक्त आपल्या पत्रिकेत जिथे जिथे नंबर लिहिले आहेत त्यातील कोणताही एक नंबर त्याच स्थानी असेल. हे पत्रिकेचे सातवे स्थान आहे आणि त्या स्थानाचा मालक हा पत्रिकेत दुसऱ्या स्थानात दाखविला आहे.

आपल्या पत्रिकेत जिथे आकडे लिहिले आहेत तेच आकडे हे त्याच स्थानात असतील आणि तोच ग्रह जर वर लिहिलेला असेल तर विवाह होण्याआधी खालील विषय विवाह होण्या आधी वाचला तर उत्तम आणि जर विवाह झालाच असेल तरी आपणास त्याचे सिम्टम्स मिळतील तर वाचून दक्षता घेणे हे उत्तम.

कुंडली क्रमांक १

घटस्फोट कुंडली क्र. १

कुंडली क्रमांक १ मध्ये विवाह स्थानात १ किंवा ८ असेल तर आणि ह्या स्थानाचा मालक मंगळ कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय आणणारा विषय संसारात अति भांडणाचा क्लेश निर्माण करणारा होऊ शकतो. हा मंगळ इथे आपल्याला विवाह सुखात आपल्या कुटुंबाच्या एकतेला उत्तम नाही. वरील विषय हे बऱ्याच वेळा विवाह विच्छेद होण्यास (घटस्फोट) होण्यास बऱ्याच प्रमाणात कारणीभूत होतात.

कुंडली क्रमांक २

घटस्फोट कुंडली क्र. २

कुंडली क्रमांक २ मध्ये विवाह स्थानात २ किंवा ७ असेल तर आणि ह्या स्थानाचा मालक शुक्र कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय आणणारा विषय आपले शारीरिक सुख, कॅरॅक्टर,आपल्याला असणाऱ्या चैनी चा विषय हे सर्व विवाह सुखात बाधा आणू शकतात. अशा सर्व पत्रिका विवाह सुखात वरील विषयाने त्रस्त होऊन वेगळे होण्याचा विचार करू शकतात किंवा वेगळे होतात.

कुंडली क्रमांक ३

घटस्फोट कुंडली क्र. ३

कुंडली क्रमांक ३ मध्ये विवाह स्थानात ३ किंवा ६ असेल तर आणि ह्या स्थानाचा मालक बुध कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय आणणारे विषय हे आपण लावलेल्या अति शकलेचे असू शकतात. इथे कुटुंबात पैशाबद्दल काही समस्या जाणवू शकतात दोघांमध्ये आर्थिक वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोघांमधील दुरावा हा विकोपाला जाऊन वेगळे होण्याचा विचार करू शकतात किंवा वेगळे होतात.

कुंडली क्रमांक ४

घटस्फोट कुंडली क्र. ४

कुंडली क्रमांक ४ मध्ये विवाह स्थानात ४ लिहिले आहे आणि ह्या स्थानाचा मालक चंद्र कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय आणणारे विषय हे आपल्यात मानसिक त्रासाचे असू शकतात. इथे कुटूंब अस्थिर होण्याचा प्रकार होतो. कुटुंबाला काही सर्व्हिस देताना मुलींना फार त्रास होतात आणि मुलाला मानसिक त्रास होऊन दुरावा निर्माण होण्याची शक्यता जास्त असू शकते त्यातून विवाह विच्छेद होऊ शकतो

कुंडली क्रमांक ५

घटस्फोट कुंडली क्र. ५

कुंडली क्रमांक ५ मध्ये विवाह स्थानात ५ लिहिले आहे आणि ह्या स्थानाचा मालक रवी कुंडलीत जिथे २ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय आणणारे विषय हे दोघांमधील एकच अधिकार गाजविणारा असू शकतो. इथे पुरुषांची पत्रिका असेल तर त्यांना कुटुंबाची मोठी जबादारी हि स्त्री पासून दुरावा निर्माण करू शकते आणि स्त्री ची पत्रिका असेल तर तिच्या अधिकाराचा ती जास्त वापर करते किंवा करता येत नाही म्हणून दुरावा निर्माण होतो. हा विषय विवाह विच्छेद करण्यास पुढे कारणीभूत होऊ शकतो.

कुंडली क्रमांक ६

घटस्फोट कुंडली क्र. ६

कुंडली क्रमांक ६ मध्ये विवाह स्थानात ९ किंवा १२ लिहिले आहे आणि ह्या स्थानाचा मालक गुरु हा कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय म्हणजे पैशाची तारांबळ होते. किंवा घरातील अशी जबाबदारी पडते कि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि हा विषय विवाह विच्छेद होण्यास कारणीभूत ठरू शकतो पुढे.

कुंडली क्रमांक ७

घटस्फोट कुंडली क्र. ७

कुंडली क्रमांक ७ मध्ये विवाह स्थानात १० किंवा ११ लिहिले आहे आणि ह्या स्थानाचा मालक शनी हा कुंडलीत जिथे २ ऱ्या स्थानी दाखविला आहे तिथेच असेल तर आपल्याला विवाह सुखासाठी व्यत्यय म्हणजे कुटुंबाची वाढ न होणे अर्थात संतान होताना झालेला विषय हा त्रासदायक ठरू शकतो. असे होत नसेल तर घराण्यातून एखादी अशी व्यक्ती त्रासदायक होऊ शकते कि तिचा विषय हा आपल्यात दुरावा निर्माण करू शकतो त्यामुळे हा विषय विवाह विच्छेद होण्यास पुढे कारणीभूत ठरू शकतो.

वरील सर्व कुंडलीत विवाह विच्छेद होण्याचे प्रमाण जास्त दिसले आहेत त्यामुळे आपणास खबरदारी म्हणून आपली पत्रिका जर अशीच असेल तर योग्य ज्योतिषांकडून सल्ला घेऊनच विवाह करण्याचा सल्ला दिला जातो.

किंवा वरील कुंडली १ ते ७ मधील जे जे विषय आपल्या पत्रिकेत दाखविले आहेत त्याबद्दल आधी क्लिअर होऊन नंतर विवाह करावा असे माझे मत आहे.

वरील सर्व पत्रिकेत गुरु ची स्थिती जर उत्तम असेल तर आपल्याला ह्याचे खुप वाईट परिणाम दिसणार नाहीत ते थोड्या वेळासाठी असू शकतील हे मात्र नक्की.

नोट — वरील कुंडली क्रमांक २ हि साधारण कमी फळ देईल आणि कुंडली क्रमांक ५ हि साधारण सर्वात जास्त वाईट फळ देणारी असू शकते.

तसेच कुंडलीत जर गुरु विवाह स्थानाला पहात असेल किंवा गुरु चांगल्या स्थितीत असेल तर हे फळ फार विकोपाला जाणार नाही. ह्यासाठी कप्स कुंडली चेक करूनच घ्यावी.

आपल्याला न पटणारा विषय

प्रत्येक तरुण तरुणींनी विवाह करताना प्रथम आपल्या DNA मधील चाचणी करून घ्यावी म्हणजे आपल्या घराण्यात काका, आत्या, भाऊ, बहीण, ह्यात चुलत सक्खे सर्व वडिलांकडच्या बाजूचे आहेत का ते पाहून घ्यावे. जर असे वरील प्रकार दिसले तर नक्की त्याच ट्रॅक वर आपण जाणार नाही ना ह्याची काळजी म्हणून पत्रिका दाखवून उपाय करून लग्न करावे हा सल्ला.

अशा सर्व पत्रिकेत पितृदोष असल्याशिवाय असे होत नाही तेव्हा पितृदोषाच्या माझ्या पोस्ट वाचून घ्याव्यात हि विनंती.

https://shreedattagurujyotish.com/pitrudosh-part-1/

https://shreedattagurujyotish.com/pitrudosh-part-2/

https://shreedattagurujyotish.com/pitrudosh-part-3/

https://shreedattagurujyotish.com/pitrudosh-part-4/

धन्यवाद…..!

Leave a Reply