You are currently viewing पितृदोष भाग ३

सूर्य कृत पितृदोष माहिती आणि उपाय

पितृदोष भाग १ मध्ये काही लग्न कुंडल्या दिल्या आहेत त्या आपण पहिल्याच असतील. त्यात
शनी-मंगळ, शनी-राहू, शनी-रवी, शनी-चंद्र, राहू-रवी, राहू-चंद्र, राहू-मंगळ, रवी नीच ७, रवी-चंद्र.ह्यात रवी कृत पितृदोष मध्ये रवी (सूर्य) पत्रिकेत दोषपूर्ण होतो.


ह्यात रवी ला काहीच बळ मिळत नाही अर्थात तुमची ऊर्जा जाते, करिअर मध्ये त्रास होत असतो. पित्याचे सुख कमी होते , पित्याला त्रास होतो किंवा आजाराने पिता ग्रस्त होतो , किंवा पित्याकडे असलेल्या जबाबदारीत पिता त्रस्त असतो. ह्यात पित्याची कमाई पुढे उपयोगी येत नाही पुढील पिढीसाठी. ह्यात असेही दिसले आहे कि पित्याची रिटायरमेंट पूर्ण होत नाही एकतर ते आजारी पडतात किंवा कार्य अपूर्ण राहते त्यांचे. जरी रीटायरर्मेंट झाली तरी त्यांच्या कमाईने पुढील पिढीची डेव्हलोपमेंट करताना त्रास होत असतो.
ह्यातील वरील सर्व एकदाच होईल असे नाही किंवा सर्व होतीलच असे नाही.

ह्यात रवी-चंद्र, रवी राहू, रवी नीच, रवी-शनी ह्या प्रकारचे रवी कृत पितृदोष मोडतात.

ह्यासाठी खालील उपाय केल्याने थोडे तरी वरील समस्यांना त्रास कमी होताना दिसेल.

ज्योतिष शास्त्रातील सर्व उपाय येथे देत आहे जे जे जमेल ते ते जास्तीत जास्त सूर्य स्ट्रॉंग होण्यासाठी करावेत.

जर जास्त उपाय करायचे नसतील तर ह्या दोषाची झळ आपल्याला पोहचू नये असे वाटत असेल तर ज्या मुलांच्या पत्रिकेत हा दोष असेल त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं. वडिलांकडून वयाच्या १८ नंतर स्वतःच्या डेव्हलोपमेंट ला पैसा घेऊ नये. शिक्षण स्वतःच्या पायावर करावे तर त्या शिक्षणातून करिअर होताना दिसेल नाहीतर हे अशक्य होते कि वडिलांनी मुलासाठी पैसा खर्च केला आणि मुलाने तेच करिअर केले ज्यात शिक्षण केले आहे. (ह्यात मुलगा मुलगी असा भेद नाही).


जरी असे करिअर चांगले झाले तरी त्याच्या पुढे त्याची डेव्हलोपमेंट होताना दिसत नाही एकतर वैवाहिक सुखात त्याला त्रास होतो किंवा आरोग्यात गडबड होते.
दुसरे असे कि जर मुलाने स्वतःच्या पायावर उभे राहून करिअर केले तरी पुढे स्वतःचा विवाह सुद्धा स्वतःच्या कमाईतून करावा वडिलांचा आधार घेऊ नये.
पुढे प्रॉपर्टीज करताना सुद्धा हा नियम आहे.

बहुतेक कित्येक घराण्यात वरचा उपाय हा करताना थोडे अवघड जाण्याची शक्यता फार असेल पण ज्याच्या पत्रिकेत सूर्यकृत पितृदोष असेल तर तीच मुले पुढे येताना दिसली आहेत ज्यांनी पित्याचा सपोर्ट घेतला नाही.

पण ह्यात मुलाने वडिलांची जबाबदारी सुद्धा घेणे तेव्हढेच महत्वाचे आहे. जरी त्यांच्यापासून लांब असलात तरी.

येथे जर त्या घराण्यात पुढे सूर्यउपासना बरीच वर्षे केली तर पुढील पिढयांना ह्यातून दोषमुक्त होता येते. पण पितृपक्षातील पितरांसाठी उपाय हे करावेच लागतील.

१) सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल (अर्ध्य) द्यावे रोज जमले नाही तर निदान रविवारी तरी.
त्यानंतर गायत्री मंत्र ची एक माळा करावी.

२) सूर्य आदित्य स्तोत्र वाचावे जर करिअर मध्ये ह्या दोषाने काही त्रास होत असेल तर.

३) नित्य एक माळा गायत्री सूर्य मंत्र जप केल्याने सुद्धा ह्या दोषातून मुक्ती मिळते.
ऊँ आदित्याय विद्महे, प्रभाकराय, धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्।।

४) कोणत्याही शुक्ल पक्षातील पहिल्या रविवार पासून पुढे १२ रविवार किंवा ३० रविवार चे व्रत करावे. ह्यात सूर्योदय आधी उठून वरील प्रमाणे अर्ध्य आणि जप करावेत आणि सूर्यास्त च्या आधी गहू गूळ तूप ह्याने बनवलेला कोणताही एक पदार्थ खावा. दिवसभर उपवास करावा.

५) नित्य द्वादश ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करावे.

६) प्रत्येक रविवारी गायीला गूळ गहू खाऊ घालावा स्वतःच्या हाताने जर हे जमत नसेल तर कोणत्या तरी आश्रमात ३/४ महिन्यातून एकदा रविवारी गहू गूळ आपल्या वजनाएव्हढा दान करावा.

७) कोणत्याही महत्वाच्या कामावर जाताना गूळ खाऊन जावा.

८) रोज रात्री तांब्याच्या लोटीत पाणी ठेवावे सकाळी चूळ भरण्या अगोदर ब्रश करण्याअगोदर ते पाणी थोडे कोमट करून प्यावे. असे ३ वर्षे केल्याने सूर्य स्ट्रॉंग होण्यास फार मदत होते

९) एक लाल धागा नेहमी उजव्या हातावर बांधून ठेवावा आणि स्वतःजवळ एक लाल रुमाल अवश्य ठेवावा नेहमी.

१०) तांबे गूळ गहू वेळोवेळी जमेल तेव्हा रविवारी दान करत राहावे.

वरील सर्व उपाय करताना रविवारी मीठ खाऊ नये अथवा खूप कमी खावे निदान सूर्यास्तापर्यंत हा नियम कडक पाळावा.
ह्या दोषात वडिलांशी पटताना फार कमी दिसते तरी जमवून घेण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त त्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवावे.

पुढील भागात मंगळकृत पितृ दोष माहिती आणि उपाय दिले आहेत.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    Very good information best

Leave a Reply