You are currently viewing पितृदोष भाग ४

मंगळकृत पितृदोष माहिती आणि उपाय

पितृदोष भाग १ मध्ये काही लग्न कुंडल्या दिल्या आहेत त्या आपण पहिल्याच असतील. त्यात शनी मंगळ, राहू मंगळ असणाऱ्या पत्रिकेत मंगळकृत पितृदोष निर्माण होतो.

ह्यात मंगळ निर्बली होतो. असे असताना पराक्रम होताना त्रास होतो किंवा एव्हढे पराक्रमी होतात कि त्याचा इतरांना त्रास होतो. मंगळकृत पितृदोषात शनी मंगळ हे खास वैवाहिक सुख घेताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात. खास रिलेशन सांभाळताना त्रास होत असतो.
घराण्यात मोठी बहीण मोठी आत्या असेल तर तिच्या संसारात बऱ्याच अडचणी येतात.
ज्या स्थानात ह्या युत्या असतील त्या स्थानाचे सुख मिळताना थोडे कठीण होते.

राहू मंगळ युतीत सुद्धा आयुष्यात एक तरी जवळचे रिलेशन सांभाळता येत नाही असे दिसते. ह्यात भावंडे किंवा शेजारी ह्यापासून त्रास होताना दिसतात, एखादे व्यसन सुद्धा लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

राहू मंगळ / शनी मंगळ ह्यावर नंतरच्या पोस्ट मध्ये अधिक प्रकाश पाडण्यात येईल सध्या येथे काही उपाय देत आहे मंगळ स्ट्रॉंग करण्यासाठी ज्याने चैन सिस्टम मधून आलेले हे दोष थोडे कमी होऊन त्रास कमी होण्यास मदत करतील.

१) ह्यात प्रत्येक मंगळवारी गणेशाला दुर्वा घालणे अतिशय महत्वाचे आहे. रोज केलेत तर उत्तम.

२) मंगळ यंत्राची स्थापना करून प्रत्येक मंगळवारी एक लाल फुल घालून ।। ऊँ अंगारकाय विद्महे, शक्तिहस्ताय, धीमहि तन्नो भौमः प्रचोदयात्।।
किंवा ऊँ अंगारकाय नमः चा एक माळा जाप करावा.

३) मंगळवारी हनुमंताची उपासना ह्या दोषात खूप चांगले फळ देणारी आहे.
ह्यात हनुमंताच्या मंदिरात जाऊन हनुमंताला सिंदूर लावावे आणि चमेली च्या तेलाचा दिवा करून तेथे हनुमान चालीसा चे पठण करावे

४) मंगळवारी गरिबाला गोड अन्न देणे किंवा लाल मसूर डाळ गूळ घालून गायीला जरूर द्यावा

५) भौम प्रदोष चे व्रत करावे

६) मंगळवारी तिखट कमी खावे.

७) ह्यात रक्तदान जरूर करत राहावे.

धन्यवाद…..!

Leave a Reply