You are currently viewing वास्तू मधील १६ दिशा आणि त्याच्या डिग्रीज

वास्तू मधील १६ दिशा आणि त्याच्या डिग्रीज

16 directions and degrees
वास्तू मधील १६ दिशा आणि त्याच्या डिग्रीज

प्रत्येक घराची किंवा एखाद्या प्लॉटची डिग्री प्रमाणे वास्तु चेक करण्यासाठी वर दिलेल्या इमेज आपल्याला मदत करू शकतात. समजा वरील आपले घर किंवा प्लॉट आहे तर आपणास ब्रह्म स्थानावर उभे राहून तेथे कंपास ठेऊन प्रथम नॉर्थ दिशा मार्क करायची आहे आणि तेथून तेथून ० डिग्री पासून आपल्या घराच्या दिशा मार्क केल्या तर सहज आपल्याला कळेल कि आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि घरातील इतर जागा कोणत्या कोणत्या दिशेला बसत आहे.

  • उत्तर (नॉर्थ) दिशा = N1 पासून N8 पर्यंत — ८ प्रवेश द्वार — ९० डिग्रीज
  • पूर्व (ईस्ट) दिशा = E1 पासून E8 पर्यंत — ८ प्रवेश द्वार — ९० डिग्रीज
  • दक्षिण (साऊथ) दिशा = S1 पासून S8 पर्यंत — ८ प्रवेश द्वार — ९० डिग्रीज
  • पश्चिम (वेस्ट) दिशा = W1 पासून W8 पर्यंत — ८ प्रवेश द्वार — ९० डिग्रीज
  • एकूण = ३६० डिग्रीज ( एकूण पृथ्वी ची गणना)

हेही वाचा : वास्तुपुरुष मंडल

उत्तर (नॉर्थ) दिशा

  • N1 — रोग पद – नॉर्थ वेस्ट ( उत्तर पश्चिम) दिशा आहे – ३१५ ते ३२६ डिग्रीज
  • N2 — नाग पद – नॉर्थ नॉर्थ वेस्ट (उत्तर उत्तर पश्चिम) –३२६ ते ३३७.५ डिग्रीज
  • N3 — मुख्य पद — नॉर्थ नॉर्थ वेस्ट (उत्तर उत्तर पश्चिम) –३३७.५ ते ३४९ डिग्रीज
  • N4 –भल्लाट पद — नॉर्थ (उत्तर दिशा) –३४९ ते ३६० डिग्रीज
  • N5 –सोम पद — नॉर्थ (उत्तर दिशा) — ० ते ११ डिग्रीज
  • N6 — भुजग पद — नॉर्थ नॉर्थ ईस्ट (उत्तर उत्तर पूर्व) — ११ ते २२.५ डिग्रीज
  • N7 — अदिती पद — नॉर्थ नॉर्थ ईस्ट (उत्तर उत्तर पूर्व) — २२.५ ते ३४ डिग्रीज
  • N8 — दिती पद — नॉर्थ ईस्ट ( ईशान्य) ३४ ते ४५ डिग्रीज

पूर्व (ईस्ट) दिशा

  • E1 — शिखी पद — नॉर्थ ईस्ट (ईशान्य) ४५ ते ५६ डिग्रीज
  • E2 — प्रजन्य पद — ईस्ट नॉर्थ ईस्ट- (पूर्व उत्तर पूर्व) ५६ ते ६७.५ डिग्रीज
  • E3 — जयंत पद — ईस्ट नॉर्थ ईस्ट- (पूर्व उत्तर पूर्व) ६७.५ ते ७९ डिग्रीज
  • E4 — महेंद्र पद– ईस्ट (पूर्व) – ७९ ते ९० डिग्रीज
  • E5 — सूर्य पद– ईस्ट (पूर्व) – ९० ते १०१ डिग्रीज
  • E6 — सत्य पद — ईस्ट साऊथ ईस्ट ( पूर्व पश्चिम पूर्व) – १०१ ते ११२.५ डिग्रीज
  • E7 — भ्रिशा पद– ईस्ट साऊथ ईस्ट ( पूर्व पश्चिम पूर्व) – ११२.५ ते १२४ डिग्रीज
  • E8 — अंतरिक्षा पद — साऊथ ईस्ट ( दक्षिण पूर्व) १२४ ते १३५ डिग्रीज

दक्षिण (साऊथ) दिशा

  • S1 — अनिल पद — साऊथ ईस्ट ( दक्षिण पूर्व) १३५ ते 146 डिग्रीज
  • S2 — पूषा पद — साऊथ साऊथ ईस्ट ( दक्षिण दक्षिण पूर्व) १४६ ते १५७.५ डिग्रीज
  • S3 — वितस्ता पद — साऊथ साऊथ ईस्ट ( दक्षिण दक्षिण पूर्व) १५७.५ ते १६९ डिग्रीज
  • S4 — ग्रिहस्पत्य पद — साऊथ (दक्षिण) १६९ ते १८० डिग्रीज
  • S5 — यम — पद साऊथ (दक्षिण) १८० ते १९१ डिग्रीज
  • S6 — गंधर्व पद – साऊथ साऊथ वेस्ट (दक्षिण दक्षिण पश्चिम) १९१ ते २०२.५ डिग्रीज
  • S7 — भ्रिनगराज पद — साऊथ साऊथ वेस्ट (दक्षिण दक्षिण पश्चिम) २०२.५ ते २१४ डिग्रीज
  • S8 — म्रिगह पद– साऊथ वेस्ट (दक्षिण पश्चिम) २१४ ते २२५ डिग्रीज

पश्चिम (वेस्ट) दिशा

  • W1 — पितर पद– साऊथ वेस्ट (दक्षिण पश्चिम) २२५ ते २३६ डिग्रीज
  • W2 — द्वारिका पद — वेस्ट साऊथ वेस्ट ( पश्चिम दक्षिण पश्चिम) २३६ ते २४७.५ डिग्रीज
  • W3 — सुग्रीव पद — वेस्ट साऊथ वेस्ट ( पश्चिम दक्षिण पश्चिम) २४७.५ ते २५९ डिग्रीज
  • W4 — पुष्पदंत पद — वेस्ट (पश्चिम) २५९ ते २७० डिग्रीज
  • W5 — वरुण पद — वेस्ट (पश्चिम) २७० ते २८१ डिग्रीज
  • W6 — असुर पद — वेस्ट नॉर्थ वेस्ट ( पश्चिम उत्तर पश्चिम) – २८१ ते २९२.५ डिग्रीज
  • W7 — शौक पद — वेस्ट नॉर्थ वेस्ट ( पश्चिम उत्तर पश्चिम) – २९२.५ ते ३०४ डिग्रीज
  • W8 –पाप्याक्षम पद — नॉर्थ वेस्ट ( उत्तर पश्चिम) — ३०४ ते ३१५ डिग्रीज

कोणत्याही घराच्या ४ मुख्य भिंती असतात. त्या चार भिंती पैकी नेहमी अंदाजे आपण असे आखतो कि हि माझी पूर्वेकडील भिंत आणि हि पश्चिमेकडील भिंत. पण तसे नसते कधीही किंवा बऱ्याच वेळा आपली वास्तु पूर्वेकडे ९० डिग्री किंवा उत्तरेकडे ० डिग्री ह्यात बसतच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा पुरवेकडील जी भिंत असते त्याचा डावीकडील भाग हा जास्त उत्तरेकडे असतो किंवा उजवीकडील भाग हा जास्त दक्षिणेकडे असतो. त्यामुळे आपण जर डिग्रीज चा विचार केला तर तंतोतंत आपल्या वास्तु चे परीक्षण उत्तम रित्या होऊ शकते.

पुढील लेखात आपला मुख्य दरवाजा कोणत्या डिग्रीज वर येतो आणि त्याचे आपल्या घरावर काय काय परिणाम होतात ह्याचा विचार नक्की वाचा

धन्यवाद…..!

Leave a Reply