You are currently viewing वास्तूपुरुष मंडल

नमस्कार मित्रानो,

श्री दत्तगुरु ज्योतिष वास्तु मध्ये आपले स्वागत आहे.

आज अक्षय तृतीया २०२२ च्या शुभ मुहूर्तावर मी आपणास बेसिक आणि ऍडव्हान्स वास्तु ची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.वैदिक वास्तु / फेंगशुई वास्तु / नुमेरो वास्तु / लाल ‘किताब वास्तु / के पी वास्तु / महावास्तु ह्या सर्वांची ओळख नवीन पद्धतीने देण्याचा प्रयत्न असेल.

  • वास्तु मध्ये १६ दिशा काय काम करतात
  • वास्तु मध्ये ग्रीड कसे करावे
  • वास्तु मधील दोष आणि बरीच चर्चा पुढील लेखातून देण्याचा प्रयत्न असेल.

माझा पहिला लेख जिथून वास्तु ओळख आपणास नक्की होईल.

वास्तुपुरुष मंडल

वास्तुपुरुष मंडल

४५ ऊर्जा क्षेत्र देवता आणि वास्तू केंद्रित करतात. ४५ ऊर्जा क्षेत्राचा प्रभाव असतो . वास्तुपुरुष मंडल हा त्या वास्तु चा आत्मा मानला जातो. ह्याची पुराणात एक कथा आहे. अशी मान्यता आहे कि भगवान शिव आणि अंधक असुर मध्ये युद्ध सुरु होते. हजारो वर्षांपासून हे युद्ध सुरूच होते.

ह्यात देवता आणि असुर सुद्धा शिवाबरोबर सामील होते. एकदा ह्या युद्धामध्ये महादेव शिवाच्या शरीरातून घामाचे बिंदू धर्तीवर पडले आणि त्यातून एक विशाल प्राण्याचा जन्म झाला. खूप मोठा खूप विशाल दिसत होता तो. तो जसा निर्माण झाला त्याला फार भूक लागू लागली त्याने शिवाकडून आशीर्वाद मागितला कि जे मी बघेन ते खाऊ शकेन आणि त्याने माझी भूक मी मिटवू शकेन. भोलेनाथानी त्याला तसा आशीर्वाद दिला.

मग ह्या प्राण्याने सर्व खाण्यास सुरुवात केली त्याला जे जे दिसेल ते तो गिळू लागला पण त्याची भूक तशीच राहत होती. भाह्माण्डात हाहाकार झाला. लोक साधू संत सैरावैरा पळू लागली. हे पाहून ४५ असुर आणि देवता मिळून ह्याला पकडून ब्राह्मदेवाकडे घेऊन आले.त्यांनी ब्राह्मदेवांना विचारले कि हा प्राणी कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितले कि हा माझ्या मुलासारखा आहे. पण ह्यास शिवाने जो वर दिला आहे त्यामुळे हा काहीही खात आहे पण त्याची भूक जात नाही आहे त्यामुळे त्यास उलटा करून त्यावर सर्वानी बसून घ्या.

तसे ४५ देव आणि असुर त्यास उलटे करून त्यावर बसून गेले आणि स्वतः ब्रह्मदेव मधोमध त्याच्या नाभीवर बसले. आणि त्यांनी त्यास आशीर्वाद दिला कि जेव्हा जेव्हा कोणी मानव भूमीवर कोणतेही निर्माण करेल तेथे आपोआप हा वास्तुपुरुष बनेल.
त्यास ४५ देव आणि असुर नियंत्रित करतील.

कोणत्याही बिल्डिंग/ बांधकाम /निर्माण मध्ये चरण बनतात

  • निव (FOUNDATION STONE) चा दगड – जेव्हा हा दगड ठेवला जातो तेव्हा ब्रह्मा ची उत्पत्ती होते.
  • स्तंभ (PILLAR) निर्माण — जेव्हा पिलर किंवा स्तंभ उभारले जातात तेव्हा ४ ऊर्जा क्षेत्र निर्माण होतात
  • छत (ROOF)निर्माण — जेव्हा वास्तु मध्ये छत चे आयोजन होते तेव्हा ८ ऊर्जा क्षेत्र निर्माण होतात.
  • भिंतीचे (WALL) निर्माण — जेव्हा चारी बाजूने भिंती उभारून त्या वसूल झाकले जाते तेव्हा १६ ऊर्जा क्षेत्र निर्माण होतात
  • आतली सजावट (INTERIOR) निर्माण — जेव्हा आतून एखाद्या वास्तु मध्ये सजावटी चे निर्माण होते तेव्हा १६ ऊर्जा निर्माण होऊन त्या त्या वास्तु मध्ये प्रत्येक कोपरा कोपरा उर्जावान होतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply