You are currently viewing दीप अमावस्या-दिव्याची अमावस्या-आषाढ अमावस्या

दिनांक २० जुलै २०२० रोजी दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येनंतर श्रावण महिना सुरु होतो. ह्या दिवसाला गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात.

दीप अमावस्या-काय काय करावे.

सोमवारी येते ती सोमवती अमावस्या असते. मंगळवारी अमावस्या असेल तर तिला भौमवती अमावस्या म्हणतात. ह्या वर्षी सोमवारी हि अमावस्या येते म्हणून नित्य क्रम आटोपल्यावर सूर्याला जल अर्पण करावे (तांब्याच्या लोटीतून अर्ध्य द्यावे) गायत्री मंत्र जरूर म्हणावा.नंतर शिव मंदिरात जाऊन काळे तीळ पाण्यात मिक्स करून अभिषेक करावा आणि तिथे प्रार्थना करावी.

घरात सायंकाळचा कार्यक्रम – दीपोत्सवाचा

आषाढी अमावास्येला केलेले दीपपूजन पत्रिकेतील अनेक दोष दूर करते. कुंडलीतील सारे त्रास दूर व्हावेत यासाठी दीपावली लक्ष्मीपूजनाप्रमाणे या अमावास्येला दिव्यांची आरास करावी. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी. तेल अथवा तुपाचे किमान दोन दिवे तरी लावावेत. शक्य असेल तर सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून प्रार्थना करावी. रांगोळी, अत्तर, दिवे व लक्ष्मीस्तोत्र तसेच अग्निहोत्र यांना या दिवशी अतिशय महत्व असते. 

या दिवशी दीपपूजन करून दिव्यांचा मंत्र सामुहिकरित्या म्हणावा. सर्वांचे कल्याण व्हावे, जगात कुणीही भुकेले राहू नये, सर्व प्राणीमात्र सुखी रहावेत, कुणाच्याही मनात पापवासना अथवा शत्रुभावना राहू नये अशी प्रार्थना करावी. शक्य असेल तर लक्ष्मीला व दिव्याला पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

या दिवशी मनापासून व श्रध्देने केलेले दीपपूजन एक वर्षापर्यंत शुभ फळ देते व लक्ष्मीची कृपा होते. देशात काही प्रांतात हा दिवस दिवाळीप्रमाणेच साजरा करतात. त्यादिवशी सर्वत्र पावित्र्य ठेवले जाते. अदृष्य रुपाने या अमावास्येला दीप देवतांचा पृथ्वीतलावर वास असतो व जे कुणी दीपपूजन करतात त्यांना या देवतांचा आशीर्वाद लाभतो.

दिव्याचे हजारो मंत्र आहेत पण सर्वात सोपा व सर्वांना म्हणता येणारा मंत्र म्हणजे…..

“शुभं करोती कल्याणम्, आरोग्यं धनसम्पदा ।

शत्रुबुध्दी विनाशाय, दीप:ज्योती नमोस्तुते ।।”

दुसरा मंत्र…

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

अर्थात….‘‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.

अग्निपुराणात दिव्याचे अपरंपार महत्त्व दिलेले आहे. हल्ली सर्वत्र व्यसने वाढलेली आहेत. दिव्याच्या या लक्ष्मी अमावास्येला गटारी अमावस्या म्हणून तिचा अपमान करू नका, ते फार वाईटरित्या बाधते. व्यसन सोडण्याची खरोखर प्रामाणिक इच्छा असेल, तर दिव्याची प्रार्थना करून व्यसन कायमचे सोडा. सर्व कुटुंबाचे कल्याण होईल. आपल्या हातून कळत- नकळत अनेक पापे अथवा अक्षम्य अपराध होत असतात.

ह्या दिवशी खास कार्यक्रम आपल्या पितरांसाठी

ह्या दिवशी पवित्र नदी जलाशय स्थळी जाऊन तिथे स्नान तर्पण आणि दीप दान करण्याची सुद्धा रीती आहे. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. 

हे करता आले नाही तरी रात्री जेवणापूर्वी पितरांच्या सेवेसाठी प्रत्येक अमावसेला पिंपळाला राईच्या तेलाचा दिवा (त्याची पेटती वात दक्षिणेला असावी) आणि अजून एक दिवा शिव पिंडीजवळ ठेवावा तो तुपाचा असेल. दिवे घरातून तयार करून जावे नंतर तेथे प्रार्थना करून पेटवावे.

दीप अमावस्या-मुहूर्त

दीप अमावास्याः २० जुलै २०२०

अमावास्या आरंभः १९ जुलै २०२० रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून १० मिनिटे

अमावास्या समाप्तीः २० जुलै २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ०२ मिनिटे

This Post Has 4 Comments

  1. PRAMILA Kurkal

    Thank you for all important information. I completely believe what you are advising.just pray that we get the ability to fulfill it. Thank you.

  2. Nishant Kolapkar

    Shri Gurudev Datta.
    Asech margadarshan milave.
    🙂

    1. Sonal Shinde

      namskar, khup chan information ahe, aschich festival vishyi mahiti dyavi, 👌👌👍

      1. Devendra Kunkerkar

        धन्यवाद
        प्रयत्न असाच असेल पुढे.

Leave a Reply