You are currently viewing मेष राशी / मेष लग्न शनी चे मीन राशीतील भ्रमण | Shani Transit 2025
Shani Transit 2025
shani transit 2025

येथे आपणास दिनांक २९/३/२०२५ पासून ते शनी मीन राशीत २३/२/२०२८ पर्यंत असताना तो आपल्याला साडॆसातीतील पहिली अडीच वर्षे काय काय फळे देवू शकेल ते ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हे शनीचे भ्रमण सुरु असताना गुरु च्या अवस्था सुद्धा महत्वाच्या असतील
१४/५/२०२५ पर्यंत गुरु वृषभेत असेल
१४/५/२०२५ पासून ते २/६/२०२६ पर्यंत गुरु मिथुन राशीत असेल
२/६/२०२६ पासून २६/६/२०२७ पर्यंत गुरु कर्क राशीत असेल
२६/६/२०२७ पासून २४/४/२०२८ पर्यंत गुरु सिंह राशीत असेल

तसेच राहू १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत शनी बरोबरच असणार आहे
नंतर राहू १८/५/२०२५ पासून ५/१२/२०२६ पर्यंत कुंभ राशीत मागे जाईल
५/१२/२०२६ पासून २३/६/२०२८ पर्यंत राहू मकर राशीत असेल

आता ह्याला अनुसरून शनी चे मीन राशीतील मेष राशीला मिळणारे विषय मांडू

शनी २९/३/२०२५ पासून आपल्या मेष राशीला किंवा मेष लग्नाच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात येत आहे. ज्योतिष नियम प्रमाणे शनी ज्या स्थानातून भ्रमण करत असतो त्या स्थानातील विषय हे व्यक्ती उत्सुकपणाने हाताळत असतो किंवा त्या विषयाची संधी त्यास मिळत असते. कारण शनी अशीच कर्मे करायला लावणार आहे जे बाराव्या स्थानातील विषय असतील त्या बद्दल आपल्या वयाप्रमाणे ते विषय मिळतील.

विषय — बारावे स्थान हे हॉस्पिटल, खर्च, मोक्ष, परदेशगमन, जेल, गुंतवणूक ह्या विषयांचे असेल. आपल्या जन्मस्थानापासूनचे जास्तीत जास्त लांबचे ठिकाण बारावे स्थान असेल.

शनी इथे आपणास ह्या कोणत्यातरी एका विषयात पहिली साडॆसातीतील अडीच वर्षे गुंतवून ठेवू शकतो म्हणून हे विषय आपणास मिळत असतील तर त्यास हाताळण्यासाठी आपणास खूप मेहनत करण्यास शनी इथे सांगत आहे किंवा त्यात सिरियस होऊन त्याचे सोल्युशन शनी देणार आहे असे समजा.

उदाहरण — जर एखाद्या मेष राशीला हॉस्पिटॅलिटी आली तर तिथे तो खर्च सुद्धा होतील. किंवा एखादा मेष राशीचा व्यक्ती परदेशात जाण्यासाठी खर्च करेल. ऑलरेडी जर मेष राशीच्या व्यक्ती आपल्या जन्मस्थानापासून दूर असतील तर त्यांचे चांगल्या गोष्टींवर खर्च होतील जरी जे हॉस्पिटलचे असले तरी एखाद्द्या रोगासाठी रिकव्हरी होईल. किंवा तिथे एखादे सोल्युशन मिळेल नक्की. जन्मस्थानात असणाऱ्या व्यक्तीं साठी जरा त्रासाचा कालावधी असेल हा कारण आपल्या पत्रिकेत लाभ स्थानाचा स्वामी शनी आहे ११ नंबर पहा आणि कर्म स्थानाचा स्वामी शनी आहे १० नंबर मकर राशी पहा.

त्यामुळे असा सल्ला दिला जातो कि जर आपणास कुठेही प्रॉफिट साठी खूप खर्च वाया जात असेल किंवा इच्छापूर्ती साठी वायफळ खर्च होत असेल तर त्या ऍक्टिव्हिटी जन्मस्थानापासून लांब जाऊन त्याची इच्छापूर्ती किंवा लाभ घ्यावेत.
आणि जर कर्मस्थानाचा/प्रोफेशन चा त्रास होत असेल तर आपल्या प्रोफेशन ची निवड हि जन्मस्थानापासून लांब देण्यासाठी शनी उत्सुक आहे असे समजावे.
मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी कुठेतरी बाहेर जाऊन विद्यार्जन करण्याचा उत्तम असेल हे नक्की कारण गुरूच्या राशीतील शनी आपणास खूप मदत करू शकेल पण खर्च सुद्धा अफाट करावे लागतील.

२९/३/२०२५ ते १८/५/२०२५ पर्यंत शनी राहू बरोबर असणार आहे वरील काही विषय जे जे बाराव्या स्थानातील असतील ते लगेच ऍक्टिव्ह होतात का ह्यावर लक्ष द्या आणि त्रास होत असेल तर १८/५/२०२५ पर्यंत थांबून नंतर निर्णय घ्या.

शनीच्या ३ दृष्ट्या

ज्योतिष नियमा प्रमाणे शनी एखाद्या स्थानातून भ्रमण करीत असताना तो आपल्या त्या स्थानपुसून ३ ऱ्या स्थानावर ७ व्या स्थानावर आणि १० व्या स्थानावर दृष्टी टाकीत असतो. शनीच्या ह्याच दृष्ट्या आपणास खूप त्रासदायक होऊ शकतील पण ते ते स्थानातील विषय जर आपण व्यवस्थित हाताळले तर २३/२/२०२८ पर्यंत त्यात आपणास शनी काहीतरी उत्तम सोलुशन देऊन जाईल हे पुढील ५ वर्षासाठी फायदेशीर असेल कारण माझ्या मते शनीच्या ज्या ज्या स्थानावर दृट्या येतात त्या स्थानातील विषयाला शनी आपणास आपल्या मागील कर्माची फळे चांगली किंवा वाईट देत असतो आणि त्याची फळे तो आपल्याला भोगवुन पुढे क्लिअर करीत असतो.

आपल्या पत्रिकेत शनी ची ३ री दृटी हि जिथे २ नंबर ची वृषभ राशी लिहिली आहे तिथे आहे. हे स्थान आपल्या कुटुंबाचे आणि पैशाचे असते. आपल्या तोंडातील अवयव आणि आपल्या वाणीचे सुद्धा हे स्थान असेल. शनी सारखा ग्रह ह्या स्थानावर त्याची दृष्टी असताना आणि तिथे १४/५/२०२५ पर्यंत गुरु असताना त्यावर असेल. तेव्हा १४ मे पर्यंत शनी आपणास आपल्या कुटुंबाची काही तरी नवीन जबाबदारी किंवा पैशासंबधी कष्ट/मेहनत करण्यास लावू शकतो. आणि नंतर गुरु तेथून निघाल्यावर शनी आपणास काहीतरी वरील सर्व विषयांची ऍक्टिव्हिटी चांगली देईल ह्यात शंका नाही.

आपल्या पत्रिकेत शनीची ७ वी दृष्टी हि कुंडलीच्या रोग स्थानावर येत आहे जिथे ६ नंबर पहा कन्या राशी आहे. १८/५/२०२५ पर्यंत तिथे केतू असल्यामुळे त्वरित काही फळे अनुभवास येतील ह्या स्थानाचे विषय — एखादा आजार, नोकरी , कर्ज , शत्रू , स्पर्धा परीक्षा, आणि आपण देत असलेल्या सर्व सर्व्हिसेस. आणि कोर्ट केस सुद्धा.
वरील विषयांचा त्रास होत असेल तर त्याचे सोलुशन १८/५/२०२५ पर्यंत थांबून योग्य निर्णय घ्या.

शनी ची १० वी दृष्टी आपल्या पत्रिकेच्या भाग्य स्थानावर येत आहे. जिथे शनी ची धनु राशी ९ नंबर पहा.
भाग्य स्थानावर जेव्हा शनी आपली दृष्टी टाकेल तेव्हा मेष राशीच्या व्यक्ती च्या जीवनात शनी च्या साडॆसातीतील पहिली अडीच वर्षे फार बदलाची चेंजेस ची असू शकतील. काहीतरी नवीन बदल करून व्यक्ती स्वतःला प्रेसेंट करण्याचा प्रयत्न किंवा त्याची धावपळ करत असतो. धनु राशी हि अग्नितत्वाची राशी आहे आणि शनी ची दृष्टी त्यावर आली कि व्यक्ती ला वेगळीच एनर्जी येते पण कोणताही बदल करण्यासाठी जास्त घाई करू नये सावकाश निर्णय घ्या.

हे स्थान आपल्या वडिलांचे सुद्धा आहे त्यामुळे मेष राशी च्या वडिलांसाठी हा काळ त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याच्या भाग्यासाठी कष्ठाचा असू शकेल तेव्हा वडिलांसाठी कोणतीही त्याच्या आरोग्यासाठी धावपळ होत असेल किंवा लहान मुलाच्या मेष राशीच्या वडिलांना जर काही आपल्या आयुष्यात बदल करण्याची संधी मिळत असेल तर पत्रिका नीट चेक करून निर्णय घ्यावा.

आपणास आणि आपल्या परिवारास शनीच्या मीन राशीतील साडॆसातीतील पहिले चरण व्यवस्थित जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना.

शनी ची हि वरील फळे फक्त जनरल आहेत तंतोतंत समजण्यासाठी आपल्या जन्म पत्रिकेचा शनी पाहावा लागतो तो जन्माचा शनी कोणत्या स्थानात आहे. आपणास महादशा कोणती आहे. अष्टक वर्गात शनी किती गुण देत आहे. ह्यावरूनच एखादा ज्योतिषी आपणास आपल्याच कुंडलीचे निदान सांगू शकेल.

आता काही उपाय देतो.

शनी च्या साडेसातीत मेष राशीच्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यांनी हनुमानजी / गणेशाची ची कोणतीही उपासना आपल्या दिनचर्येत ठेवावी. आणि जास्तीत जास्त वृद्धांची सेवा करावी. दान धर्म करत राहावे आणि चुका कमी कराव्यात.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९

Leave a Reply