You are currently viewing कुंभ राशी / कुंभ लग्न शनी चे मीन राशीतील भ्रमण | Shani Transit 2025
Shani Transit 2025 Kumbh Rashi Kumbh lagna
कुंभ राशी

कुंभ लग्न 


शनी राशी परिवर्तन

Shani Transit 2025 Kumbh Rashi Kumbh lagna- येथे आपणास दिनांक २९/३/२०२५ पासून ते शनी मीन राशीत २३/२/२०२८ पर्यंत असताना तो आपल्याला साडॆसातीतील शेवटची अडीच वर्षे काय काय फळे देवू शकेल ते ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हे शनीचे भ्रमण सुरु असताना गुरु च्या अवस्था सुद्धा महत्वाच्या असतील
१४/५/२०२५ पर्यंत गुरु वृषभेत असेल
१४/५/२०२५ पासून ते २/६/२०२६ पर्यंत गुरु मिथुन राशीत असेल
२/६/२०२६ पासून २६/६/२०२७ पर्यंत गुरु कर्क राशीत असेल
२६/६/२०२७ पासून २४/४/२०२८ पर्यंत गुरु सिंह राशीत असेल

तसेच राहू १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत शनी बरोबरच असणार आहे
नंतर राहू १८/५/२०२५ पासून ५/१२/२०२६ पर्यंत कुंभ राशीत मागे जाईल
५/१२/२०२६ पासून २३/६/२०२८ पर्यंत राहू मकर राशीत असेल

आता ह्याला अनुसरून शनी चे मीन राशीतील कुंभ राशीला मिळणारे विषय मांडू

शनी २९/३/२०२५ पासून आपल्या कुंभ राशीला किंवा कुंभ लग्नाच्या पत्रिकेत धन स्थानातून भ्रमण करणार आहे. शेवटच्या साडेसातीचे हे चरण २३/२/२०२५ पर्यंत असेल. हे स्थान आपल्या कुटुंबाचे आणि पैशाचे असते. आपल्या तोंडातील अवयव आणि आपल्या वाणीचे सुद्धा हे स्थान असेल
शनी इथे आपणास ह्या कोणत्यातरी एका विषयात ह्या कालावधीत गुंतवून ठेवू शकतो. मागील गेलेली साडॆसातीतील ५ वर्षे पैशासंबधित आणि आपल्या कुटुंबा संबंधित हि जर खास गेलेली नसली तर काळजी करून नका त्यावर ह्याच कालावधीत शनी काहीतरी सोलुशन नक्की देऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी इथे जरूर आपणास मदत करणार आहे.

उदाहरण — समजा कुंभ राशीच्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी त्यांना जे जे प्रॉब्लेम्स मागील काही वर्षी होते ते ते आता शनी महाराज आपल्याला त्या समस्येवर निराकरण करण्यासाठी आले आहेत. ज्यांना खूप काही आर्थिक क्षेत्रातल्या अडचणी होत्या त्या आता हळू हळू दूर होतील.
मात्र एक सांगेन कि जर कुटुंबापासून लांब जाऊन पैसे कमविण्याची संधी जर शनी आपणास देत असेल तर समजा हे चांगले आहे. कारण शनी इथे आपणास एकतर कुटुंबासाठी कुटुंबात राहून जबाबदारी वाढवू शकेल किंवा तुम्ही कुटुंबासाठी लांब जाऊन पैसे कुटुंबासाठी कमविण्याची संधी देईल. माझ्या मते लांब गेलेले बरे. नाहीतर कुटूंबात बिझी ठेवून तो पैसे किती देईल जवळ राहून ह्यात शंका आहेच.

२९/३/२०२५ ते १८/५/२०२५ पर्यंत शनी राहू बरोबर असणार आहे वरील काही विषय जे जे धन स्थानातील कुंबाबद्दलचे असतील ते लगेच ऍक्टिव्ह होतात का ह्यावर लक्ष द्या आणि त्रास होत असेल तर १८/५/२०२५ पर्यंत थांबून नंतर निर्णय घ्या. कारण अजून राहू कुटुंब स्थानात असेल १८ मे पर्यंत.

शनीच्या ३ दृष्ट्या

ज्योतिष नियमा प्रमाणे शनी एखाद्या स्थानातून भ्रमण करीत असताना तो आपल्या त्या स्थानापासून ३ ऱ्या स्थानावर ७ व्या स्थानावर आणि १० व्या स्थानावर दृष्टी टाकीत असतो. शनीच्या ह्याच दृष्ट्या आपणास त्रासदायक होऊ शकतील पण ते ते स्थानातील विषय जर आपण व्यवस्थित हाताळले तर २३/२/२०२८ पर्यंत त्यात आपणास शनी काहीतरी उत्तम सोलुशन देऊन जाईल हे कायम स्वरूपात असेल कारण माझ्या मते शनीच्या ज्या ज्या स्थानावर दृट्या येतात त्या स्थानातील विषयाला शनी आपणास आपल्या मागील कर्माची फळे चांगली किंवा वाईट देत असतो आणि त्याची फळे तो आपल्याला भोगवुन पुढे क्लिअर करीत असतो.

आपल्या पत्रिकेत शनी ची ३ री दृटी हि जिथे २ नंबर ची वृषभ राशी लिहिली आहे तिथे आहे. हे स्थान आपल्या प्रॉपर्टीचे, पर्सनल सुखाचे, मातृसुखाचे, वाहन सुखाचे, आणि जन्मस्थानाचे असेल शनी सारखा ग्रह ह्या स्थानावर दृष्टी देत असेल तर तेथील विषयाचे चॅलेंजेस + संधी व्यक्तीला येतातच. म्ह्णून नवीन प्रॉपर्टी घेण्याच्या + घरातील एखाद्या सजावटीसाठी खर्च करण्याच्या + जन्मस्थानातील एखाद्या प्रॉपर्टीच्या विषयाच्या संधी आपणास मिळतील पण आधी त्यात किती आणि कसे काम करावे ह्याचा आराखडा व्यवस्थित मांडल्याशिवाय हात घालू नका.
ह्याच कालावधीत आईच्या तब्येतीसाठी पैसे खर्च होऊ शकेल लक्ष द्यावे.

आपल्या पत्रिकेत शनीची ७ वी दृष्टी हि कुंडलीच्या अष्टम स्थानावर येत आहे जिथे ६ नंबर पहा कन्या राशी आहे. १८/५/२०२५ पर्यंत तिथे केतू असल्यामुळे त्वरित काही फळे अनुभवास येतील ह्या स्थानाचे विषय — एखादा अपघात , काही पीडा, अचानक धनलाभ, नवीन सर्चिंग, आणि वारसा हक्काचे विषय सुद्धा. शनी ह्या स्थानाला पाहत असताना त्यात मात्र ह्या कालावधीत जपायला पहिले खास १८/५/२०२५ पर्यंत करणं तेथे केतू असेल. वरील विषयांचा त्रास होत असेल तर त्याचे सोलुशन १८/५/२०२५ पर्यंत थांबून योग्य निर्णय घ्या. खास कमरेच्या खालील अवव्यावर लक्ष द्या १८ मे पर्यंत कारण ह्या स्थानावर शनी + राहू ची दृष्टी येत आहे.

शनी ची १० वी दृष्टी आपल्या पत्रिकेच्या लाभ स्थानावर येत आहे. जिथे शनी ची धनु राशी ९ नंबर पहा.
लाभ स्थानावर जेव्हा शनी आपली दृष्टी धन/कुटुंब स्थानावर टाकत असल्यामुळे आणि हे स्थान आपल्या इच्छापूर्तीचे आणि लाभाचे असल्यामुळे कुटुंबाबद्दल च्या आणि आपल्या आर्थिक व्यवहारातल्या इच्छापूर्ती साठी आपण अग्रेसिव्ह व्हाल पण इथे जास्त धावपळ मात्र होणार आहे. जास्त घाई करू नये आणि थांबून राहिलात तर निश्चित फळ जास्त मिळेल. किंवा इच्छापूर्ती सर्वात शेवटी झाली तर खूप काही शनी महाराज साडेसाती मध्ये आपल्या इच्छापूर्ती करून जातील हे नक्की.

आपणास आणि आपल्या परिवारास शनीच्या मीन राशीतील साडॆसातीतील पहिले चरण व्यवस्थित जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना.

शनी ची हि वरील फळे फक्त जनरल आहेत तंतोतंत समजण्यासाठी आपल्या जन्म पत्रिकेचा शनी पहावा लागतो तो जन्माचा शनी कोणत्या स्थानात आहे. आपणास महादशा कोणती आहे. अष्टक वर्गात शनी किती गुण देत आहे. ह्यावरूनच एखादा ज्योतिषी आपणास आपल्याच कुंडलीचे निदान सांगू शकेल.

आता काही उपाय देतो.

शनी च्या साडेसातीत कुंभ राशीच्या व्यक्तींना ह्या साडेसातीच्या शेवटच्या चरणात धीरज हा एकाच उपाय उत्तम त्या बरोबर जर त्यांनी प्रत्येक शनिवारी शिवमंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा लावला तर निश्चित त्याचे चांगले परिणाम दिसतील. अगदीच अडचण येत असेल तर स्मशानात प्रत्येक अमावास्येला ह्या कालावधीत जाऊन तिथे शिव जलाभिषेक करावा आणि तेथे पिंपळाला पाणी घालावे. हे फक्त मोठ्या समस्या येत असतील तर नक्की करून पहा.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९

Leave a Reply