You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ कुंभ राशी / कुंभ लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ कुंभ राशी / कुंभ लग्न- RAHU/KETU TRANSIT FOR KUMBH RASHI / KUMBH LAGNA

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे कुंभ राशी आणि कुंभ लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२ कुंभ राशी / कुंभ लग्न

कुंभ राशी आणि कुंभ लग्न म्हणजे आपली राशी जरी कुंभ नसली पण लग्न कुंभ असेल तर किंवा आपले लग्न कुंभ नसले पण राशी कुंभ असली तरी खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

कुंभ राशी अणि कुंभ लग्नाच्या पत्रिकेत राहु पराक्रम/तृतीय स्थानी १८ महिने मेष राशीत असेल आणि केतू भाग्य/नवम स्थानी कुंभ राशीत असेल पराक्रम आणि भाग्य स्थानातील जी जी फळे आहेत ती ती फळे ह्या जातकांना मिळतील त्यांच्या प्रत्येक सुरु असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवहार आणि आचारविचार असतील.

विद्यार्थ्यांना — राहू पराक्रम स्थानातून भ्रमण करत असताना विद्यार्थ्यांना १८ महिन्यात आपल्या शिक्षणातील काही बदल करावेच लागतील. काही जणांच्या शिक्षणात कमर्शिअल शिक्षणाचे सोर्स पुढे येताना दिसत आहेत.

करिअर क्षेत्रातील वयातील जातकांना पराक्रम स्थानातील राहू उत्तम रित्या बरेच काही पराक्रम करण्याच्या नव-नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. केतूच्या भाग्य स्थानातील भ्रमणामुळे बरेच जण कुंभ राशी लग्न वाले आपल्या भाग्योदयाची सुरुवात करताना इथे दिसतील त्यासाठी काही आपल्या कार्यशैलीत बदल नक्की दिसतील.

राहू केतू नक्षत्रीय फळ

  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा इथे ह्या कालावधीत आपणास वैवाहिक जीवनातील फळे मिळतील. आधीपासून काही त्यात त्रास असतील तर त्रास वाढण्याचा किंवा त्यास उकरून काढण्याचा हा कालावधी असेल. काहीच नसेल तर वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष देणे भाग आहे. पैसा खर्च होईल.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. ह्या कालावधीत आपणास चतुर्थ स्थानाचे आणि भाग्य स्थानाचे फळ मिळेल. नवीन प्रॉपर्टी/ घर/ जागा घेण्याच्या प्रयत्नात असाल तर ते इथे होऊ शकेल. आईच्या तब्येतीकडे लक्ष देण्याचा कालावधी हा असेल. जर आधी काही त्रास असेल तरच.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या काळात पराक्रम स्थानातील फळे नक्की मिळतील. बऱ्याच जणांना कुंभ राशी किंवा लग्नाच्या व्यक्तींना इथे नवीन काही करण्याचे वाव मिळतील. काही तरी करावेसे नक्की वाटेल आणि करिअर मध्ये खूप धावपळ करण्याची तयारी दाखवाल. मात्र इथे भावंडाना हा कालावधी चांगला नाही.
  • केतू तूळ राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे कुंभ राशी/लग्न च्या व्यक्तींना बऱ्याच प्रकारचे लाभ दिसतील. हा कालावधी खूप प्रगतशील असेल. नवीन भाग्याच्या गोष्ठी घडतील.
  • केतू तूळ राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे कुंभ राशी लग्नाच्या व्यक्ती अग्रेसिव्ह होतील.इथे प्रॉपर्टी चे लाभ होतील. त्या संदर्भातील कामासाठी धावपळ होईल आणि मार्गी लागेल.
  • केतू तूळ राशीत २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. इथे कुंभ राशी किंवा लग्न वाल्याना अचानक बढती बदलीचे योग आहेत. मात्र नोकरी व्यवसाय बढती बदली मध्ये दिसली तरी लांब च्या ठिकाणी होण्याची चिन्हे आहेत.

उपाय –कुंभ लग्न आणि राशीच्या व्यक्तींनी राहू बदलासाठी उपाय म्हणून प्रत्येक शनिवारी पुरुषांनी पिंपळाला एक राई (मोहरी) च्या तेलाचा दिवा लावून यावे. व महिलांनी सकाळी असा दिवा लावावा पिंपळाला जल दिल्यावर.

धन्यवाद…..!

Leave a Reply