You are currently viewing मकर राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

मकर राशी/ लग्न — राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू-केतू राशी परिवर्तन : ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५

राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.

मकर राशी आणि मकर लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.

जर आपली राशी मकर असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न मकर असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.

वर दिलेली कुंडली इमेज हि मकर राशी किंवा मकर लग्नाची आहे. जर आपली मकर राशी नसली तरी जर मकर लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.

नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.

नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची ७ वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी कर्क राशीतून टाकत होता. आणि ते स्थान ९ वे (भाग्य) स्थान होते (जिथे जिथे ६ नंबर ची कन्या राशी असेल आपल्या पत्रिकेत) शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत मकर राशी आणि मकर लग्नाला ९ व्या (भाग्य) ह्या स्थानाचे फळ जरूर मिळाले असेल. ह्या स्थानातून आयुष्यातील मोठे केलेले चेंजेस जे भाग्याच्या डेव्हलोपमेंटसाठी असतात, वडिलांचे विषय, प्रवास, तीर्थ यात्रा, सन्यास, उच्च शिक्षण, गुरुवर्य पहिले जातात. ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेला असेल. आठवून पहा ह्याच विषयाच्या बाबतीत आपली धावपळ होती का?

आता पुढे …….ह्याचे काय परिणाम होईल ते पाहू.

दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या मकर राशी कुंडलीत किंवा मकर लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या ३ ऱ्या (त्रितिय) स्थानी येत आहे ह्या स्थानावरून पराक्रम करून दाखविणे, एखाद्या विषयात खूप धावपळ करून सक्सेस होणे, एखाद्या प्रॉपर्टीची विक्री करणे, एका शहरातून दुसऱ्या दुसऱ्या शहरात सतत जाणे, जास्त समाजाशी कम्युनिकेट (सोशिअल) होणे , लहान भावंडे हे विषय आपल्यासमोर नक्की येतील. आणि त्यात काही इशू असतील तर हिरहिरीने सोडवाल सुद्धा.

राहूची ७ व्या स्थानावर ५ वी दृष्टी

राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो सातव्या (सप्तम) स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. पत्रिकेत सप्तम स्थानावरून वैवाहिक सुख, विवाह च्या बाबतीत असलेले सर्व प्रश्न, वैवाहिक पार्टनर, बिझिनेस मधील पार्टनशीप, रोज मिळणारा पैसा, व्यापार ह्या सर्व गोष्टी पहिल्या जातात. मकर लग्नाच्या किंवा मकर राशीच्या व्यक्तींना ह्या कालावधीत जर कुणाचा विवाह होत नव्हता तो होईल पण कोणतीतरी परंपरा तोडूनच असेल असा विवाह. ज्यांच्याकडे व्यापार करण्याचा विषय असेल ते आता स्वतःचा व्यापार सुरु करू शकतील पण पार्टनर शिप करून करावा का हे आपल्या स्वतःच्या पत्रिकेतील योग सांगतील. विवाहातील काही विषय आधीचे पेंडिंग असतील ते आता सोडविण्यासाठी हा काळ उत्तम असेल.

राहु ची ९ व्या स्थानवार ७ वी दृस्टि

कुंडली इमेज मध्ये पहा राहु ३ ऱ्या स्थानातून नवव्या (भाग्य) स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे ह्या स्थानातून आयुष्यातील मोठे केलेले चेंजेस जे भाग्याच्या डेव्हलोपमेंटसाठी असतात, वडिलांचे विषय, प्रवास, तीर्थ यात्रा, सन्यास, उच्च शिक्षण, गुरुवर्य पहिले जातात. विद्यार्थी दशेतील मकर राशी किंवा मकर लग्नाच्या व्यक्तींना उच्च शिक्षणासाठी हा काळ जन्मस्थान पासून बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी उत्तम असेल. आई किंवा वडिलांच्या आरोग्याविषयी हा काळ काही धावपळ होण्याचे दाखवितो. आणि वरील बाकीचे विषय सुद्धा आपल्यासमोर येण्याचे योग आहेत.

राहू ची ११ व्या स्थानावर ९ वी दृष्टी

कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील अकराव्या (लाभ) स्थानावर दृष्टी टाकत आहे. जिथे ८ नंबर लिहिले आहे. मकर राशी किंवा मकर लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो. ह्याच स्थानावर शनी ची कुंभ राशीतून १० वी दृष्टी सुद्धा येत आहे त्यामुळे ह्या कालावधीत ह्या स्थानाची फळे व्यक्तीला १००% मिळू शकतील. हे कुंडलीचे लाभ स्थान आहे. इच्छापूर्तीचे स्थान आहे . मोठा भाऊ, सून आणि कान ह्या प्रकारचे विषय इथून पहिले जातात. ह्या १८ महिन्याच्या कालावधीत आपण ज्या ज्या इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत त्यात तुम्ही अग्रेसिव्ह व्हाल आणि त्यात जास्त प्रयत्न कराल.

वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण मकर राशीचे आहात किंवा मकर लग्नाचे असाल राहू च्या विषयी च्या कोणत्याही त्रासाबद्दल
आपण वरील १८ महिन्याच्या कालावधीत जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना सुरु ठेवा जसे शनिवारी शनी चे एखादे स्तोत्र किंवा मंत्र म्हणणे. शनिवारी शनी च्या मंदिरात जाऊन तेल चढविणे. आणि शनिवारी गरजू व्यक्तींना जास्तीत जास्त मदत करत राहणे आणि त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची सेवा (त्यांना खाऊ घालणे) हे उपाय करावेत.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply