You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ वृश्चिक राशी / वृश्चिक लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ वृश्चिक राशी वृश्चिक लग्न

वरील कुंडली हि वृश्चिक राशीची चंद्र कुंडली आहे आणि वृश्चिक राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली वृश्चिक राशी किंवा लग्न कुंडली वृश्चिक असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

वृश्चिक राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा चतुर्थ / चौथ्या स्थानी येत आहे. हे स्थान आपल्या मातृ स्थानाचे, आपल्या आपल्या प्रत्येक सुखाचे, आणि प्रॉपर्टीज चे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या चतुर्थ स्थानी चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या धन/कुटुंब स्थानी आहे. ह्या स्थानाचा मालक गुरु चौथ्या स्थानी भ्रमण करताना वरील सर्व मुद्यांवर आपल्याला चांगले अनुभव येतील.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या पंचम स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा मागील चौथ्या स्थानी भ्रमण करणार आहे म्हणून १४४ दिवसात आपल्याला ह्या दिवसात आपल्या स्किल बद्दल किंवा संततीबद्दल काळजी धावपळ होऊ शकेल. त्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा काही चांगले परिणाम मिळविण्यासाठी धावपळ होईल.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : तुला राशी/तुला लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान आपले हे स्थान पत्रिकेतील कर्म स्थान आहे. बऱ्याच प्रमाणात आपण आपल्याला करिअर बद्दल चांगले निर्णय घेता येतील. आपल्या स्किल चा भरपूर वाव आपल्याला ह्या दिवसात मिळेल. नवीन नवीन संधी मिळतील.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान हे स्थान अष्टम स्थान जे कष्ठाचे असते त्यावर आहे. जेव्हढी मेहनत ह्या दिवसात कराल त्याचे चीज होईल आणि तुम्ही सेफ असाल. कोणत्याही संघर्षामध्ये गुरु आपल्याला सहकार्य करेल. अचानक समोर आलेल्या संकटाना चांगले मॅनेज करू शकाल.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या पत्रिकेतील व्यय स्थान आहे. तसेच परदेश गमनाचे स्थान आहे. ज्या विद्यार्थाना बाहेर जाऊन काही स्टडी करायची असतील त्यांनी ह्या दिवसात प्रयत्न करायला हरकत नाही.

ज्यांना गुंतवणूक करायची असेल त्यांना सुद्धा खूप चांगला अनुभव येईल. वृश्चिक राशी / लग्न वाल्याना काही प्रमाणात ह्या दिवसांत खूप खर्च वाढतील पैसे हातातून जाईल पण तो इन्व्हेस्टमेंट किंवा चांगल्या कार्यासाठी लागेल.
तेव्हा हे सुरु ठेवण्यास काही हरकत नाही.

काळजीचे काही मुद्दे

वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.

गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या लाभ आणि इच्छापूर्तीचे आहे. त्यात आपल्याला थोडी प्रथम काळजी वाटेल. पण आपल्या हुशारीने काही प्रश्न सोडवू शकाल.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या तिसऱ्या स्थानी येत आहे. पराक्रम करण्यासाठी आपल्याला घरापासून किंवा जन्मस्थानापासून दूर जावे लागू शकेल.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान भाग्य स्थान आहे . त्यामुळे आपल्याला आपले नशीब आपल्या धावपळीचेच मिळेल. त्यात थोडी मानसिक / शारीरिक धावपळ केल्याशिया नशीब साथ देणार नाही.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण वृश्चिक राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक प्रथम स्थान आणि दुसरे षष्ठ स्थान. तेव्हा कुणाला जर आधीपासून शारीरिक पीडा असेल तर आजारांवर धावपळ ह्या दिवसात होईल. जॉब मधील एखादी ट्रान्सफर दिसेल. ती लांब असेल. आणि अचानक दिसू शकेल. एखादी नवीन जबाबदारी सुद्धा मिळेल असे दिसते त्यात तुम्ही अचानक खूप बिझी व्हाल.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे प्रथम स्थानातील मंगळ हा आपल्याला जास्त स्ट्रॉंग बनवेल. पण जरा अर्ग्युमेण्ट ला जपून राहा. अति धावपळ होईल. स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी हि वेळ अति उत्तम असेल. घरात सर्वांसाठी धावपळ करण्याचा खास आईच्या तब्येतीसाठी काळजी घेण्याचा किंवा प्रॉपर्टीज बद्दल मोठे निरयन घेण्याचा इथे विषय दिसेल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. वृश्चिक लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा सध्या सप्तमातून जात आहे. म्हणून हा काळ आपणास वैवाहिक सुखासाठी धावपळीचा दिसेल. ह्यात वादविवादांपासून दूर राहा. जे व्यापारी आहेत त्यांना पैसे मिळेल मात्र पार्टनर कडून अति सावधानता बाळगावी. पत्नीच्या किंवा पतीच्या आरोग्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागेल.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे इथे चतुर्थ स्थानातील फळे फार उत्तम मिळतील नोव्हेंबर पासून चे हाती घेतलेले जे जे कार्य असेल जे आपल्या प्रत्येक सुखासाठीचे असेल त्यात आपल्याला इथे समाधान मिळेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply