अधिक श्रावण | निज श्रावण
दिनांक १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रवणास सुरुवात होत आहे. १७ जुलै २०२३ ला दीप अमावस्या असेल. १८ जुलै ते १५ सप्टेंबर पर्यंत हे दोन्ही मास श्रावण म्हणूनच मानले जातील. (श्रावण मास 2023 मराठी)
मात्र यंदा अधिक मास येत असल्याने तब्बल दोन महिन्यांचा श्रावण असल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन महिन्याचा श्रावण असल्याने सोमवारीही आठ आले आहेत. मात्र श्रावणी सोमवार चारच आहेत, अधिक महिन्यात उपवास केल्यास उत्तमच.त्यात दिनांक १८ जुलै २०२३ पासून पहिला श्रावण मानून ८ सोमवार करायचे असतील.
चातुर्मासही पाच महिन्यांचा होणार आहे. दरम्यान अधिक महिना श्रावणात आल्याने श्रावण महिना हा 59 दिवसांचा असणार आहे.
अधिक मास दान
अधिक मासात दानाचे फार महत्व मानले गेले आहे. त्यामुळे आपण छत्री, कपडे, अन्न दान करू शकता. किंवा आपल्याला जे जे जमेल ते समाजात गरजू व्यक्तींना दान केल्याचे फळ ह्या अधिक मासात जास्त असेल.
अधिक मास आणि अध्यात्मिक साधना
ह्या अधिक मास मध्ये जप आणि अध्यात्मिक वाचन केल्याचे सुद्धा फळ हे व्यक्तीला जास्त चांगले मिळते. त्यामुळे आपण ह्या अधिक मासात गुरुचरित्र, स्वामी चरित्र, कुलदेवतेची उपासना, शिव उपासना किंवा मंत्र जप वगैरे केल्याने त्याचे फळ नक्की चांगले मिळते.
2020 मध्ये आश्विन, 2023 मध्ये श्रावण, तर 2026 मध्ये ज्येष्ठ हा अधिक मास असेल. यंदा नीज श्रावण मास 17ऑगस्टला सुरू होत असून, श्रावणात येणारे सण नीज श्रावणातच साजरे करावेत.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष