- एक असे स्तोत्र जे पत्रिकेतील ऊर्जा देणारा रवी ग्रह मजबूत करते.
- एक असे स्तोत्र जे करिअर सेटल करण्याची ग्यारंटी देते.
- एक असे स्तोत्र जे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी मदत करते.
- एक असे स्तोत्र जे डोळ्यांची निगा राखून दृष्टीत तेज निर्माण करते.
- एक असे स्तोत्र जे आयुष्यात जास्तीत जास्त पॉसिटीव्हिटी देते.
- एक असे स्तोत्र जे आयुष्यात कधीही मानहानी करू देत नाही सतत व्यक्तीचा मान सन्मान वाढविते.
- एक असे स्तोत्र ज्यात आयुष्याला लढण्याची शक्ती प्राप्त होते.
- एक असे स्तोत्र ज्यात आरोग्याच्या तक्रारी असतील तर दूर करण्याची शक्ती आहे.
- एक असे स्तोत्र कोर्ट केस मधून सुटका करते.
एव्हढ्या गोष्टी जर पत्रिकेत फक्त रवी (सूर्य) मुळे होत असतील जर तो स्ट्रॉंग असेल तर. पण जर तो स्ट्रॉंग नसेल तर वरील सर्व ऍक्टिव्हिटीज साठी व्यक्तीला भरपूर प्रमाणात मेहनत करावी लागते.
Table of Contents
पत्रिकेतील रवी ची स्थिती
- रवी + राहू किंवा रवी + केतू = ग्रहण दोष
- रवी ० ते ५ डिग्री किंवा २६ ते ३० डिग्री वर
- रवी ६/८/१२ व्या स्थानी
- रवी तूळेचा ७ नंबर बरोबर लिहिला असेल
- अमावास्येचा जन्म
वरील योगात निश्चित व्यक्तीला रवी पासून चांगली ऊर्जा मिळविण्यास त्रास होत असतो.
आणि हे जरी माहित नसेल तरी प्रत्येकाने सूर्या पासून मिळणारे चांगले सिम्टम्स मिळविण्यासाठी ह्या आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावेच.
आदित्य हृदय स्तोत्र केव्हा करावे
कोणत्याही शुक्ल पक्षाच्या रविवार पासून सुरु करून रोज किंवा रविवारी तरी करावे. सूर्य उगवताना ह्याचे पठण लाभप्रद जास्त असते. जरी हे जमले नाही तरी सकाळी १० पर्यंत तरी करावे.
कसे करावे
प्रथम पूर्व दिशेला आसन घालून बसावे आणि आचमन करावे म्हणजे उजव्या हातात पाणी तीन वेळा घेऊन खालील प्रमाणे म्हणून प्यावे. जसे ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः आणि चौथ्या वेळी असेच पाणी घेऊन ॐ गोविंदाय नमः म्हणून खाली सोडावे (हा एक शुद्धीकरण प्रोसेस आहे)
विनियोग
ह्यात ज्या विनियोगाच्या २ ओळी दिल्या आहेत त्यात उजव्या हातात पाणी घेऊन ह्या दोन ओळी म्हणून ते पाणी एका प्लेट किंवा वाटी मध्ये सोडावे. आणि स्तोत्राचे पठण करण्यास सुरुवात करावी.
ज्यांना न्यास येतात त्यांनी न्यास करून करावे ज्यांना ह्या बद्दल माहिती नसेल तरी केले नाही तरी सरळ स्तोत्र सुरु करावे विनियोग झाल्याबरोबर.
पौराणिक महत्व
हे स्तोत्र अगस्त्य ऋषी द्वारे वर्णित केले गेले आहे. श्री रामाला रावणाबरोबर च्या युद्धात बळ मिळण्यासाठी त्यांनी ह्या स्तोत्राची रचना केली आणि श्री रामाने रावणावर विजय मिळविला.
वाल्मिकी रामायणात ह्या स्तोत्राचे वर्णन मिळते.
आदित्य हृदय स्तोत्र
ॐ अस्य आदित्यह्रदय स्तोत्रस्य अगस्त्यऋषि: अनुष्टुप्छन्दः आदित्यह्रदयभूतो
भगवान् ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्माविद्यासिद्धौ सर्वत्र जयसिद्धौ च विनियोगः
ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम् । रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् ॥1॥
दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम् । उपगम्याब्रवीद् राममगस्त्यो भगवांस्तदा ॥2॥
राम राम महाबाहो श्रृणु गुह्मं सनातनम् । येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे ॥3॥
आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् । जयावहं जपं नित्यमक्षयं परमं शिवम् ॥4॥
सर्वमंगलमागल्यं सर्वपापप्रणाशनम् । चिन्ताशोकप्रशमनमायुर्वर्धनमुत्तमम् ॥5॥
रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतम् । पुजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम् ॥6॥
सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावन: । एष देवासुरगणांल्लोकान् पाति गभस्तिभि: ॥7॥
एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: । महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्यापां पतिः ॥8॥
पितरो वसव: साध्या अश्विनौ मरुतो मनु: । वायुर्वहिन: प्रजा प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥9॥
आदित्य: सविता सूर्य: खग: पूषा गभस्तिमान् । सुवर्णसदृशो भानुर्हिरण्यरेता दिवाकर: ॥10॥
हरिदश्व: सहस्त्रार्चि: सप्तसप्तिर्मरीचिमान् । तिमिरोन्मथन: शम्भुस्त्वष्टा मार्तण्डकोंऽशुमान् ॥11॥
हिरण्यगर्भ: शिशिरस्तपनोऽहस्करो रवि: । अग्निगर्भोऽदिते: पुत्रः शंखः शिशिरनाशन: ॥12॥
व्योमनाथस्तमोभेदी ऋग्यजु:सामपारग: । घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथीप्लवंगमः ॥13॥
आतपी मण्डली मृत्यु: पिगंल: सर्वतापन:। कविर्विश्वो महातेजा: रक्त:सर्वभवोद् भव: ॥14॥
नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावन: । तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन् नमोऽस्तु ते ॥15॥
नम: पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नम: । ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नम: ॥16॥
जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नम: । नमो नम: सहस्त्रांशो आदित्याय नमो नम: ॥17॥
नम उग्राय वीराय सारंगाय नमो नम: । नम: पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते ॥18॥
ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे । भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नम: ॥19॥
तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने । कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ॥20॥
तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे । नमस्तमोऽभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे ॥21॥
नाशयत्येष वै भूतं तमेष सृजति प्रभु: । पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभि: ॥22॥
एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठित: । एष चैवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणाम् ॥23॥
देवाश्च क्रतवश्चैव क्रतुनां फलमेव च । यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमं प्रभु: ॥24॥
एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च । कीर्तयन् पुरुष: कश्चिन्नावसीदति राघव ॥25॥
पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगप्ततिम् । एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ॥26॥
अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि । एवमुक्ता ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम् ॥27॥
एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोकोऽभवत् तदा ॥ धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान् ॥28॥
आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वेदं परं हर्षमवाप्तवान् । त्रिराचम्य शूचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान् ॥29॥
रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा जयार्थं समुपागतम् । सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधेऽभवत् ॥30॥
अथ रविरवदन्निरीक्ष्य रामं मुदितमना: परमं प्रहृष्यमाण: ।
निशिचरपतिसंक्षयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति ॥31॥
।। आदित्य हृदय स्तोत्र सम्पूर्ण ।।
नोट : ज्यांना संस्कृत जमत नसेल त्यांना हे जरा अवघड जात असेल तर त्यांनी यु ट्यूब वर सर्च करून त्याची प्रॅक्टिस करून घ्यावी हे उत्तम. पण जास्त चुकीचे शब्द उच्चार नकोत ह्यासाठी प्रथम बरेच दिवस असाच सराव करून नंतर सुरवात करावी असे माझे मत.
धन्यवाद…..!