You are currently viewing मंगळापासून कुटुंबाची किंवा पैशाची हानी केव्हा आणि कशी?
Mangal

आपल्या कुंटुंबातील कोणाच्याही पत्रिकेत जर खाली दाखविलेल्या पत्रिके सारखा मंगळ बसला असेल तर नक्की समजा त्या कुटुंबातील एक तरी सदस्य हा गैरहजर दिसला तर उत्तम त्यास कारणे वेगवेगळी असू शकतील. पण जर असे नसेल आणि ते पूर्ण कुटुंब एकत्र राहत असेल तर कुटुंबाची हानी म्हणजे मृत्यूने किंवा पैशाने होईल ह्यात शंका नाही. एक वेळ पैशाची झाली तरी चालेल असे मला वाटते. (ASPECT OF MARS IN THE FAMILY HOUSE)

कोणत्याही वरील प्रकाराने हानी होत नसेल तर उत्तम त्यास खालील विषय असू शकतील

समजा घरातील एकूण संख्या ४ आहे आई वडील आणि २ मुले — त्यातील कोणताही एक सदस्य घरात न राहता कुठेतरी बाहेरच्या शहरात ऍक्टिव्ह आहे.

नियम

  • ज्यांच्या पत्रिकेत मंगळाच्या दोन्ही पैकी एक तरी राशी कुटुंब स्थानी येते हे फक्त मीन लग्न किंवा तूळ लग्न असेल तरच होऊ शकेल म्हणजे मीन लग्न असेल तर मंगळाची मेष १ नंबरची राशी कुटुंब स्थानी असेल आणि तूळ लग्न असेल तर मंगळाची ८ नंबर ची वृश्चिक राशी असेल.
  • किंवा मंगळ कुटुंब स्थानीच बसला असेल
  • किंवा मंगळ पत्रिकेत सप्तम स्थानी किंवा अष्टम स्थानी किंवा लाभ स्थानी बसला असेल ह्या स्थानातूनच मंगळाची ४ थी दृष्टी कुटुंब स्थानावर येते.

ह्या वरील ३ नियमाच्या पत्रिका येथे देत आहे फक्त त्या सारखीच आकृती पाहून चेक करा कि आपल्या कुटुंबात आधी किती सदस्य होते आणि आता एकत्र किती आहेत. त्यात समजा कुणी सांगेल कि आमच्या पत्रिकेत वरील तिन्ही नियम आहेत पण आमचे आजोबा किंवा आजी आमच्या सोबत होते ते आता स्वर्गवासी झाले तर हा नियम लागू शकतो का ? त्यास उत्तर आहे लागू शकेल पण फक्त १२ वर्षासाठी नंतर पुन्हा त्या कुटुंबातून एक तरी सदस्य हा गैरहर दिसला पाहिजे. तर वरील नियमाची पूर्तता करून तुम्ही आपल्या कुटुंबाची पैशाची किंवा नंतर होणाऱ्या कुटुंबातील एखादी दुःखद घटना वाचवू शकता.

हेही वाचा :- मंगळ आणि त्याचा नक्षत्र विचार 

वरील नियम सर्व एका पत्रिकेला लागत असतील आणि काही हानी वगैरे चा विषय नसेल एकत्र राहताना तर दोन पैकी एक गोष्ट होत असताना दिसू शकेल ते कुटुंब एका घरात ५/६ वर्षे एकत्र राहातच नाहीत. किंवा कुटुंब स्थानावर गुरुची दृष्टी येत असेल किंवा गुरूच कुटुंब स्थानात असेल कोणाच्या तरी पत्रिकेत कुटुंबात. त्यासाठी गुरु पत्रिकेच्या अष्टम ८ व्या किंवा षष्ठ ६ व्या किंवा दशम १० व्या स्थानी लागेल. कुंडली ४ पहा.

हा नियम आपल्या पत्रिकेत असेल तर आपण कोणत्याही एका मुलामुलींचे शिक्षण कुटुंबा पासून दूर केल्यावर उत्तम परिणाम दिसतील
किंवा कोणताही एक सदस्य उदरनिर्वाहासाठी कुटुंबात नसेल तरी उत्तम. खास करून ज्याच्या पत्रिकेत वरील नियम लागतील त्यास कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. लहान मुलांसाठी हा नियम वयाच्या १२ किंवा १८ नंतर पाळावा.

मंगळाचा विचार करताना आम्ही मंगळाला सैनिक मानतो म्हणून हा नियम लागतो कि एकाच्या पत्रिकेत मंगळाचे कुटुंबात काय काम कारण मंगळ आम्हाला नेहमी त्याच्या लढाई साठी बॉर्डरलाच दिसला तर उत्तम. नाहीतर घरात तो वाद किंवा कुटुंबाची हानी करू शकेल.

खास उपाय

  • अशा सर्व नियमात पत्रिका असेल तर त्यापासून जास्त नुकसान होऊ नये म्हणून गणेश उपासना कोणत्याही पद्धतीने मंगळवारी उत्तम असेल.
  • मंगळवारी उपवास किंवा सिद्धिविनायक – उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन प्रत्येक मंगळवारी घेऊन तेथे लाल बुदीचे लाडू किंवा मोदक प्रसादाला चढविले तर उत्तम.
  • मंगळवारी घरात किंवा बाहेत कोणतेही जास्त लाल मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
  • मंगळवारी लाल वस्त्र परिधान करू नये
  • मंगळवारी गायीला लाल मसूर ची डाळ गुळाबरोबर देता आले तर उत्तम.
  • वरील पैकी उपाय करून आपल्या पत्रिकेत मंगळ बॅलन्स करून घेऊ शकता जेणे करून एकत्र कुटुंब आनंदात दिसू शकेल.

काही जणांच्या घरी २/४ मुली असतील तर लग्न करून त्या कुटुंबाची संख्या कमी होत असते पण फक्त ३ वर्षे वरील नियम लागणार नाहीत ४थ्या वर्षापासून त्या कुटुंबाची संख्या पुन्हा तेव्हढीच असता कामा नये. नाहीतर वरील हानी च्या नियमात ते कुटुंब येऊ शकेल.

हेही वाचा :- मंगळवार आणि तिखट

एक लक्षात घ्या मंगळ कुटुंब वाढवीत नाही कमी करतो पण पत्रिकेच्या कुटुंब स्थानातूनच पैसा पहिला जातो म्हणून वरील नियम ज्याच्या पत्रिकेत बसतात त्यांच्या पत्रिकेत पैसा खूप मिळविण्याचा योग असतो पण कुटुंबापासून लांब जाऊनच. म्हणून आपण आपली मुलगी दुसऱ्याचे कुटुंब वाढविण्यासाठी लग्न करून देत असतो त्यामुळे मुलींचे लग्न करताना त्या पत्रिकेत मंगळाचा विचार जरूर करावा. नाहीतर मुले होण्यास किंवा पैसे कामविण्यास त्रास होऊ शकेल मुलीला.

वरील नियम समजत नसेल तर नक्की एकदा आपली पत्रिका निष्णात ज्योतिषांकडून चेक करून घ्या मंगळ कसा आहे तो.
वरील लेख हा आपणास चिंता करण्यासाठी देत नाही चिंतन केले तर उत्तम

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519

Leave a Reply