Table of Contents
मिथुन राशी/ लग्न : राहू परिवर्तन ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५
राहू चे १८ महिन्याचे मीन राशीतून जे भ्रमण होत आहे त्याचे टाइम टेबल वरील लिंक मध्ये वाचून घ्या.
मिथुन राशी आणि मिथुन लग्न साठी हे मीन राशीतून होणारे भ्रमण पुढे देत आहे.
जर आपली राशी मिथुन असेल किंवा आपली राशी दुसरी कोणतीही असेल पण जर आपले लग्न मिथुन असेल तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
वर दिलेली कुंडली इमेज हि मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाची आहे. जर आपली मिथुन राशी नसली तरी जर मिथुन लग्न असेल तर आपली लग्न कुंडली हि अशी असू शकेल.
नोट — मी इथे चांगले आणि वाईट दोन्ही बाजू मांडेन. आपल्याला राशी कुंडली आणि लग्न कुंडली दोन्ही चेक करावी लागेल. ह्यासाठी आपली राशी कोणती आणि आपले लग्न कोणते हे आपणास माहित हवे. आपण दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर (आपले लग्न आणि आपली राशी) जर राशी कुंडलीत आणि लग्न कुंडलीत एखादा विषय हा दोन्ही ठिकाणी चांगला असेल तर ती गोष्ट पॉसिटीव्ह समजावी आणि दोन्ही ठिकाणी वाईट असेल तर काळजी घ्यावी लागेल. तरी सुद्धा आपल्या मूळ कुंडलीत राहू जिथे जन्माच्या वेळी आहे ते पाहूनच फायनल डिसिजन घ्यावे हि विनंती. जे विषय इथे मांडण्यात येतील त्या घटना घडण्यासाठी आपली परिस्थिती आणि आपले वय त्यास सूट होत असतील तरच त्या घडतील नाहीतर घडणार नाही.
नोट — २५/३/२००५ ते १२/१०/२००५ ह्या कालावधीत राहु १८ वर्षापूर्वी मीन राशीतून भ्रमण करत होता त्यावेळी शनी कर्क राशीतून भ्रमण करत होता — राहू ची 7 वि दृष्टी ज्या स्थानावर येत होती तिथेच शनी आपली ३ री दृष्टी टाकत होता. आणि ते स्थान ४ थे वे स्थान होते जिथे शनी आणि राहू दोघे एकदम पाहत होते त्या स्थानाला. २५/३/२००५ पासून च्या १८ महिन्याच्या कालावधीत मिथुन राशी आणि मिथुन लग्नाला ४ थ्या स्थानावरून घरातील वातावरण , मातृ सुख, जन्म स्थान, सर्व पर्सनल सुखे , प्रॉपर्टीज, वाहन – ह्यातील एक तरी विषय खूप चांगला किंवा खूप वाईट गेलाच असेल आठवून पहा. आणि शक्य झाले तर कॉमेंट करा.
आता पुढे …….चांगले चांगले काय होईल ते पाहू
दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ते १८ मे २०२५ पर्यंत राहू मीन राशीत आहे आणि आपल्या मिथुन राशी कुंडलीत किंवा मिथुन लग्न कुंडलीत मीन राशी हि कुंडलीच्या १० व्या (कर्म स्थानी येत आहे) ह्या स्थानावरून पत्रिकेत करिअर, आपले प्रोफेशन आणि आपले सर्व कर्मे पहिले जातात. ह्यात जेव्हा १८ महिन्यासाठी राहू येत आहे तेव्हा हे विषय आपल्या समोर असू शकतील. मागील काही महिन्यात ज्या इच्छा पेंडिंग असतील त्यांना हा विषय सुटू शकेल.
मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाच्या व्यक्तींना ह्या कालावधीत वरील विषयी अनेक संधी प्राप्त होतील त्यात आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता अति अग्रेसिव्ह असतील. उदाहरणार्थ – जर आपण आपल्या करिअरच्या विषय मोठे निर्णय अजून पर्यंत घेत नव्हता ते आता घ्याल. ज्यांना आपल्या करिअरची ची नवीन सुरुवात करायची असेल त्यांना आता चांगली संधी मिळेल. जे आपल्या प्रोफेशन मध्ये स्वतःची प्रॅक्टिस करत आहेत त्यांना आता मोठ्या संधी चालून येतील.
राहूची २ ऱ्या स्थानावर ५ वि दृष्टी
राहू वरील दिलेल्या कालावधीत मीन राशीत असताना कुंडली इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे तिथून तो दुसऱ्या स्थानाला पाहणार आहे. म्हणजे जिथे ४ नंबर लिहिले आहे. म्हणजे हे स्थान आता आपले ऍक्टिव्हेट राहू करणार. चांगले असे होईल कि ह्या स्थानाबद्दलचे जे जे विषय असतील जे आधी पेंडिंग होते ते सर्व सुटतील. जसे ह्या स्थानाचे विषय — पैसा, वाणी, कुटुंब.
मागील काही कालावधीत पैशाने जी जी कामे अजून पेंडिंग होती ती आता होऊ शकतील. पैसे कमविण्यासाठी आता जास्तीत जास्त अग्रेसिव्ह राहाल. त्यासाठी कुटुंबाला फार कमी वेळ देता येईल कारण राहू साठी हे तुमचे कुटुंब स्थान सुद्धा आहे जे त्याला आवडत नाही. म्हणून कुटुंबातील मोठे विषय आपल्या समोर ह्याच कालावधीत येतील. त्यामुळे वाणी सुद्धा पैसे आणि कुटुंब ह्यासाठी चालेल. तेव्हा सांभाळून राहावे कारण इथे वाणी ला दोष लागू शकतो म्हणजेच बोलताना जरा जपून. ह्यासाठी जास्तीत जास्त कुटुंबात मन न रमवता पैसा कमाविण्यासाठी वेळ दिलेला बरा हा सल्ला समजा. ज्यांच्या जन्मपत्रिकेत जन्माचा राहू जास्त चांगला नाही आणि जर तो कुटुंब स्थानाशी जरासुद्धा कनेक्ट असेल (दृष्टीने किंवा तिथेच असेल तर) ह्या कालावधीत पैसा मिळणारच आहे पण तो कुटुंबासाठी खर्च होऊ शकेल ह्याची काळजी घ्या. जर राहू चांगला असेल जन्माच्या वेळी तर असे काही होत नाही तुम्ही मिळविलेल्या पैशाचा राहू आनंद देईल.
राहु ची ४ त्या स्थानवार ७ वी दृस्टि
कुंडली इमेज मध्ये पहा राहु १० व्या स्थानातून ४ थ्या स्थानवार आपली ७ वी दृस्टि देत आहे जिथे ६ नंबर लिहिले आहे ज्या स्थानावरून पत्रिकेत घरातील वातावरण , मातृ सुख, जन्म स्थान, सर्व पर्सनल सुखे , प्रॉपर्टीज, वाहन. हे विषय आपल्यासमोर नक्की येतील. आणि त्यास काही इशू असतील तर हिरहिरीने सोडवाल सुद्धा. ह्याच कालावधीत काही जण आपले घर किंवा वाहन खरेदी करू शकतील. सर्व पर्सनल सुखासाठी आपण ऍक्टिव्ह व्हाल. पण आपण जर जन्म स्थानातच राहून करिअर पैसा आणि वैवाहिक जीवन जगत असाल आणि आपल्या पत्रिकेत जन्मस्थानाचा राहू बरोबर नसेल तर मात्र हा विषय त्रासाचा सुद्धा होऊ शकेल. आईच्या सुखासाठी धावपळ दिसते. तिच्या तब्येतीसाठी काळजी घ्यावी लागेल असा कोणताही विषय आपल्या समोर नसेल तर तिच्याबरोबरच्या रिलेशन मध्ये काहीतरी कटुता दिसेल.
राहू ची ६ व्या स्थानावर ९ वी दृष्टी
कुंडली इमेज मध्ये राहू जिथे आहे तिथून तो पत्रिकेतील सहाव्या स्थानावर दृष्टी टाकत आहे. मिथुन राशी किंवा मिथुन लग्नाच्या व्यक्तींसाठी पुढील १८ महिने हे ह्या स्थानावरील घटनांचा जास्तीत जास्त परिणाम दिसू शकतो ह्याचे कारण कि ह्या स्थानावर शनी सुद्धा नवम (भाग्य) स्थानातून सहाव्या स्थानावर १० वी दृष्टी देत आहे. दोन दोन पाप ग्रह जर एकाच स्थानावर ठराविक कालावधीसाठी ऍक्टिव्ह असतील तर त्याचे परिणाम हे बोल्ड दिसून येतात.
पत्रिकेत ह्या स्थानावरून आपले जॉब,कर्ज,आरोग्य बाबतीतले रोग, स्पर्धा, मामा पाहतात. ह्यापैकी एकतरी विषय आपल्या आयुष्यात ह्या १८ महिन्यात होणार हे नक्की. ज्यांना आधीच जॉब स्विच करायचा असेल आणि नवीन ठिकाणी प्रयत्न करायचा असेल तर हा कालावधी उत्तम आहे. आपल्या जन्मस्थानापासूनच्या जास्तीत जास्त लांब असलेल्या संस्थेत किंवा बाहेरील कंपन्यांमध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. येथे आजारपणाचा असा विषय आहे कि आधीपासून जर कोणत्या आजारपणाने आपण त्रस्त असाल तर त्यावर चांगले उपाय कराल. आता नवीन सर्व्हिसेस देण्याचा सुद्धा प्रयत्न कराल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असेल. कर्ज घेताना मोठा विचार करून कर्ज घ्याल. पण जरा सांभाळून एकदम मोठी जम्पिंग नको कारण पुढे राहू बदल झाल्यावर २ वर्षानंतर त्रास होऊ शकेल. लगेच फिटणारे शॉर्ट टर्म कर्ज किंवा EMI हप्ते सुरु करा.
वरील सर्व बॅलन्स करण्यासाठी उपाय — आपण मिथुन राशीचे आहात किंवा मिथुन लग्नाचे आहात म्हणून राहू आणि शनी हे आपणास पूर्ण लाईफ साठी जास्त ऍक्टिव्हेट चांगल्या गोष्टीने करतील हे नक्की. पण जर आपल्या पत्रिकेत ह्याची स्थिती उत्तम नसेल आणि वरील सर्व विषय हे आपणास कठीण वाटत असतील तर त्यासाठी प्रत्येक बुधवारी गणेश अथर्वशीर्ष वाचणे, गणेशाला दुर्वा वाहणे, पक्षांना भिजविलेले हिरवे मूग घालणे, माशांना खाऊ घालणे, आणि गायीला बुधवारी चारा देणे हे उपाय करू शकता.
एक लक्षात घ्या कि राहू मिथुन राशी आणि मिथुन लग्नाच्या व्यक्तींना हे १८ महिने खूप पॉसिटीव्ह आहेत तेव्हा ज्या ज्या समस्या आपल्या वरील स्थानांच्या असतील त्या सोडवायला घ्या नक्की फायदा होईल.
जर एकदम आपल्या स्वतःच्या जन्मपत्रिकेवरून ह्या राहूचे १८ महिन्याचे फळ जाणून घ्यायचे असेल तर निष्णात ज्योतिषांची मदत जरूर घ्या.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९