Table of Contents
काय आहे लोशू ग्रीड (Lo Shu Grid)
श्री अंकवेद मध्ये आपण प्रथम लोशू ग्रीड बद्दल जाणून घेणार आहोत.
आपणास प्रथम हे लोशू ग्रीड जरी चीन मध्ये प्रस्थापित झाले असले तरी त्या अंकशास्त्राचा उगम हा भारतातूनच झाला आहे. ह्याचे
उदाहरण म्हणजे वरील जे लोशुग्रीड चे यंत्र दाखविले आहे तेच चित्र आपल्या (महालक्ष्मी) वैभव लक्ष्मी च्या व्रताच्या पुस्तकावर सुद्धा दाखविलेले असते. ह्याचा अर्थ असा होतो कि पूर्वीच्या काळापासूनच ह्या यंत्राचा उपयोग आपल्या इथे करण्यात येतच होता कुठेतरी ह्याची संकल्पना इथूनच उदयाला आली.
प्रचलित कथेप्रमाणे चीनमध्ये एक महान संत होऊन गेले त्यांनी जनकल्याणासाठी लोशू नदीच्या किनारी खूप मोठी तपस्या केली तेव्हा त्याची प्रचिती त्यांना मिळाली ती अशी कि त्या नदीतून एक कासव बाहेर आले आणि त्याच्या पाठीवर वर दाखविलेले यंत्र होते. तेथूनच ह्या लोशू ग्रीड चा वापर त्याने जनकल्याणासाठी करण्यास सुरुवात केली.(lo shu grid numerology)
वरील यंत्रात जर आपण पहिले तर कुठूनही बेरीज केली असतात त्याची संख्या हि 15 वर येते म्हणून ह्या यंत्राला 15 चे लक्ष्मी यंत्र सुद्धा म्हणतात
कसा तयार करावा आपल्या जन्म तारखेचा वापर ह्यात?
जिथे वर दाखविलेल्या लक्षमी यंत्रात (लोशू ग्रीड मध्ये) जे जे अंक दिले आहेत त्याच ठिकाणी आपले अंक लिहत जावे जे आपल्या जन्म तारखेत आहेत.
उदाहरण जर आपली जन्मतारीख 27/05/1963 असेल तर प्रथम जिथे 2 लिहिले आहे तिथे 2 -7 -5 -1 -9 -6 -3 जिथे जिथे दाखविले आहेत तिथे तेच अंक लिहून घ्यावेत. (lo shu grid predictions)
हे ह्यात मांडल्यानंतर आपल्या जन्मतारखेनुसार आपल्याला खालील माहिती हवी असते.
- मूलांक
- भाग्यांक
- कुआ नंबर
काय आहे मूलांक
आपण महिन्याच्या ज्या तारखेला जन्म घेतला त्याची बेरीज करून जो एक अंकी अंक असेल तो आपला मूलांक होतो. जर हा अंक जर एक अंकी असेल तर तोच नंबर आपला मूलांक असेल.
उदाहरण
वरील जन्म तारखेत 27 तारखेला जर त्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक 2 +7 हा 9 असेल.
जर त्या व्यक्तीचा जन्म 1 ते 9 मधील कोणत्याही तारखेला झाला असेल तर त्यात कोणतीही बेरीज करावी लागत नाही एक अंकी नंबरच त्याचा मूलांक असेल.
काय आहे भाग्यांक
पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून त्यातून जो एक अंकी नंबर येईल त्याला भाग्यांक म्हणतात.
उदाहरण
वरील जन्मतारीख 27-5-1963 असेल तर त्याच्या जन्मतारखेत 2 +7 +5 +1 +9 +6 +3 ची बेरीज हि 33 येते पून्हा 3 +3 केले तर एक अंकी संख्या हि 6 येते म्हणून 6 हा त्या व्यक्तीचा भाग्यांक झाला.
जर आपली जन्मतारीख हि — 1 -1 -2003 असेल तर आपला भाग्यांक हा 7 होईल.
काय आहे कुआ नंबर ?
आपण ज्या वर्षात जन्म घेतला आहे त्याची बेरीज केल्यानंतर जी एक अंकी संख्या येते तो आपला कुआ नंबर असतो.
उदाहरण
वर दिलेल्या जन्मतारखेत त्या व्यक्तीचा जन्म 1963 ह्या वर्षात झाला आहे म्हणून 1963 ची बेरीज 1+9 +6 +3 =19 **10 **1
म्हणून एक अंकी संख्या हि १ आहे. आता जर पुरुष असेल तर नेहमी 11 मधून वर आलेली संख्या वजा करतात — आणि स्त्री असेल तर आलेल्या संख्येत 4 अधिक करतात असा नियम आहे. म्हणून इथे कुआ नंबर पुरुष मानला तर 11-1= 10 म्हणून 1 मानला जाईल.
वरील आपल्या लोशू ग्रीड मध्ये हे सुद्धा नंबर पुन्हा लिहिले जातील.
मूलांक 9
भाग्यांक 6
कुआ नंबर 1
खालील प्रमाणे आपले लोशू ग्रीड हे अंतिम असेल
9 6 आणि १ हे नंबर पुन्हा आल्यामुळे इथे दोनदा आले आहेत.
नोट — जर आपला मूलांक एक अंकी असेल जसे 1 ते 9 आणि 10 20 30 ज्या तारखांना कोणतीही बेरीज करावी लागलेली नसते मूलांक काढण्यासाठी तेव्हा तो मूलांक पुन्हा लोशू ग्रीड मध्ये घेऊ नये.
उदाहरण 5-2-2001 ह्या तारखेत ५ मूलांक झाला म्हणून ५ हा अंक लोशू ग्रीड मंधे पुन्हा येणार नाही कारण त्यात मूलांक काढताना कोणतीही बेरीज करावी लागली नाही.
वरील सर्व माहिती वाचून आताच लगेच आपला लोशू ग्रीड तयार करा तो आपल्या समोर नेहमी ठेवा त्यात आपल्याला खालील प्रश्नांची जरूर उत्तरे मिळतील.
१) कसे आहेत आपले मूलांक आणि भाग्यांक — हे दोघे मिळून काय आपली बस डेस्टिनी ला पोहोचेल ?
२) आपल्या लोशू ग्रीड मध्ये प्रत्येक नंबर काय देत आहे आपल्याला?
३) आपल्या लोशू ग्रीड मध्ये एक नंबर २ वेळा आल्यामुळे काय इफेक्ट होत आहे आपल्या जीवनात
४) आपल्या लोशू ग्रीड मध्ये जे नंबर मिसिंग (गहाळ) आहेत त्याने आपल्या जीवनात कशाची कमतरता आहे.
५) आपल्या लोशू ग्रीड मध्ये कोणते प्लॅन पूर्ण होत आहेत जे पुढे ८ प्लॅन दिले आहेत आणि ती किती टक्के बसतात. त्याचा काय फायदा होईल?
६) आपल्या लोशू ग्रीड मध्ये आपल्या करिअर मध्ये कोणते नंबर सपोर्ट करत आहेत ?
७) हेल्थ साठी आपला लोशू ग्रीड कसा आहे ?
८) वैवाहिक जीवन कसे असेल , संतती विवाह वगैरे कसे असेल ?
९) आणि प्रॉपर्टीज पैसा असे सर्व प्रश्न आपल्या जीवनात कसे असेल?
तर मग तयार रहा आपल्या लोशू ग्रीड ची संपूर्ण माहिती घेण्यासाठी.
धन्यवाद…..!
श्री अंकवेद
देवेंद्र कुणकेरकर – नुमरॉलॉजिस्ट.
यामध्ये जे अंक आहेत त्या प्रत्येक अंकाचा ज्योतिष शास्त्रानुसार काय अर्थ आहे?
उदा. 2 या अंकाचा ज्योतिषीय अर्थ काय आहे? आणि 2 अंक टेबलमध्ये असेल तर, आणि हा अंक टेबलमध्ये नसेल तर याचा आपले ज्योतिषावर काय परिणाम होईल?
२ अंक हा चंद्राचा आहे, मातृत्वाचा आहे, पैसा सुद्धा २ वरून पहिला जातो, मनावर आणि शरीरावर मानसिक दृष्ट्या काय काय परिणाम होणार आहेत हे ह्या अंकावरूनच समजते. प्रत्येक प्लान जे लोशू ग्रीड मध्ये येतात त्यात २ अंकाचा रोल हा वेगवेगळा असू शकतो.
त्यावरील माझी **लोशु ग्रीड मधील ८ महत्वाचे प्लान** हि पोस्ट वाचा.