You are currently viewing शुक्र राहू युती दृष्टी चे 100% परिणाम

शुक्र राहू युती दृष्टी चे 100% परिणाम

ह्यात शुक्रासमोर राहू किंवा राहू समोर शुक्र ७ व्या स्थानी असावा.

वरील पहिल्या पत्रिकेत शुक्र राहू प्रत्येक स्थानात लिहिले आहेत आपल्या लग्न कुंडलीत हे कोठेही असू शकतील.

आणि दुसऱ्या पत्रिकेत राहू शुक्र हे कोणत्याही स्थानी समोरासमोर असू शकतील असे दाखविले आहे.ते बाणाने एकमेकांच्या दृष्टीत असतील असे दाखविले आहे. (जर कळले नाही तर आपण आपल्या शुक्रापासून राहू किंवा राहू पासून शुक्र हे ७ व्या स्थानी लिहिले आहे का ते पाहावे)

आपल्या मुलांच्या किंवा आपल्या स्वतःच्या पत्रिकेत हि युती कोणत्याही स्थानी असेल तर आपल्याला कशी फळे मिळतील ह्या बद्दल जाणून घ्या. हि फळे येथे कॉमन लिहीत आहे त्यातील जरा जरी फळे आपल्याला ह्या आधी मिळाली असतील किंवा त्याचा इफेक्ट जरा जरी जाणवत असेल तर नक्की ह्याबद्दल एखाद्या तद्न्य ज्योतिषांचा सल्ला घ्या.

हि युती आपल्या ग्ल्यामर बद्दल खूप चांगली आहे. आपल्याला मिळणाऱ्या सुखवस्तू इथे आपल्याला सुखात भर टाकतील. चांगले खाणे पिणे, कपडेलत्ते, चांगल्या वस्तूंचा उपभोग आपल्याला मिळेल ह्यात काही शंकाच नाही.

काळजी फक्त इथे एव्हढीच आहे कि आपल्याला वैवाहिक सुख मिळते का ह्याची. त्यात स्त्री आणि पुरुष चा भेद केला तर काही विषय इथे देण्याचा प्रयत्न करतो.

पुरुषांबद्दल

जर आपण पुरुष असाल तर अशा पुरुषांना संतती निर्माण करण्यासाठी त्रास होऊ शकेल. काही त्रुटी ह्या निर्माण होतील संतती निर्माण करण्यासाठी. आपल्या शारीरिक सुखात व्यत्यय येऊ शकतील तर त्यासाठीची धावपळ होऊ शकेल.

जर हा विषय ज्या पुरुषांकडे नसेल तर काहींना आपल्या पत्नी साठी मेडिकल खर्च जास्त करावा लागतो असे सुद्धा अभ्यासात आले आहे. म्हणजे आपल्या कमाईचा काही भाग निदान ५०% च्या वर हा खर्च करावा लागतो.

जर हा हि विषय एक पुरुष म्हणून आपल्याकडे नसेल तर आपले वैवाहिक सुख आपणाकडून बाहेर कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो ज्यात कॅरॅक्टरलेस म्हणून आपली ओळख समाजात होऊ शकेल. लक्ष द्या.

स्त्रियांबद्दल

स्त्रियांच्या पत्रिकेत हि युती वैवाहिक पर्सनल सुखासाठी चांगली फळे देणारी नव्हेत. आपल्या सुखात काहीतरी त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. शारीरिक सुखासाठी सुद्धा हि युती चांगले फळ देणारी नव्हे जरी असे होत नसेल तरी आपण आपल्या तब्येतीकडे काळजी घेणे गरजेचे ठरते आणि शेवटी जरी ह्या दोन्ही गोष्टी नसतील तरी पुरुषांच्या पत्रिकेत जो शेवटचा भाग मेरीटल अफेअर्स चा लिहिला आहे त्यापासून आपण नक्की सावधान राहा.

  • हे विधान खोटे कसे ठरेल जेव्हा आपल्या पत्रिकेत गुरु चंद्र युती किंवा गुरु ह्या शुक्र राहू वर दृष्टी टाकत असेल कोणत्याही स्थानातून तर.
  • हे विधान खोटे केव्हा ठरेल जेव्हा आपल्या लग्न स्थानावर गुरु ची दृष्टी पडत असेल तर. किंवा गुरु आपल्या पत्रिकेत स्ट्रॉंग असेल.

ह्या विधानात कमी पण केव्हा येईल जर आपण धनु किंवा मीन राशीचे असाल तर.

पण इथे मीन राशीबद्दल खास लिहावेसे वाटेल कि वरील सिम्टम्स जरी आपल्याला दिसले तरी समाजात आपले नाव येत नाही त्याबद्दल आपण सेफ असता. तरी सुद्धा जपून राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

वरील सर्व विषय हे वयात येणाऱ्या मुलामुलींच्या पत्रिकेत हमखास दिसत असतील तर त्यांनी ज्योतिषांचा सल्ला आणि उपाय जरूर करावेत. हा नाजूक आणि वादाचा विषय असला तरी तो आपल्यासमोर अभ्यासाने आणला आहे राग मानू नये

घटना केव्हा घडण्याचे चान्सेस जास्त असतील

  • जर आपल्या पत्रिकेत शुक्र किंवा राहू महादशा किंवा अंतर्दशा असेल.
  • जर आपल्या पत्रिकेत शुक्र हा नीच राशीचा ६ नंबर बरोबर लिहिला असेल.
  • राहू ९ नंबर मध्ये किंवा आणि शुक्र समोरील स्थानी ३ नंबर मध्ये असेल.
  • राहू शुक्र हि युती सहाव्या स्थानी आठव्या स्थानी किंवा बाराव्या स्थानी असेल.

वरील पैकी पहिली पत्रिका हि दुसऱ्या पत्रिकेपेक्षा जास्त स्ट्रॉंग असेल रिझल्ट देण्यासाठी.

हि युती किंवा शुक्र राहू ची एकमेकांवर दृष्टी ह्यात आपल्याला न पटणारे विषय मांडतो

हि युती आपल्या कुणाच्या पत्रिकेत असेल तर आत्याचा संसार कधीही खास गेलेला नसतो किंवा तसे नसेल तर तिला शारीरिक त्रास तरी असतोच. ह्यात घराण्यातील स्त्रियांना त्रास झालेले पाहण्यात आले आहेत. किंवा स्वतःच्या घरातील एखाद्या स्त्रीचा त्रास इतरांना झालेला पाहण्यात येतो.

मागील जन्मी एखाद्या स्त्री चा किंवा पुरुषाचा वाईट उपयोग करून जो त्रास दिला असेल त्यातील हा विषय ह्या जन्मी भोगावा लागतो असे माझ्या वाचनात आले आहे. ह्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच असेल पण ह्या युतीमुळे जे जे आपल्यासमोर असेल त्यांना नक्की ह्याचा अनुभव सुद्धा येतो असे सुद्धा निदर्शनास आले आहे.

माझ्या अभ्यासात ह्यांच्या पायाचा अंगठा आणि त्या बाजूचे बोट ह्यात फार अंतर असते जेव्हा पाय जमिनीवर असतो तेव्हा हि दोन्ही बोटे एकमेकांपासून फार लांब असतात असे सुद्धा दिसले आहे. पण ह्यावर मी १००% ठाम नाही अजून. ह्याबद्दल चा अभ्यास अजून बाकी आहे समजा. तुम्ही त्यात जरूर मदत कराल अशी अपेक्षा आहे ज्यांनी वरील विषय हि युती किंवा दृष्टीत अनुभवले असतील.

नोट — जर वरील काहीच आपल्याशी घडत नसेल किंवा घडण्याचे कोणतेही परिणाम समोर दिसत नसतील तर आपण ज्या घराण्यात ज्या वातावरणात असाल तेथे झालेले उत्तम संस्कार आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई किंवा मागील जन्माचे पुण्य इथे हमखास आपल्याला चांगले फळ देते आहे असे समजण्यात येते.

धन्यवाद…..!

Leave a Reply