खालील सर्व वस्तू ह्या शनी च्या अधिपत्यात येतात.
- काळामिरी
- काळी राई
- कोळसा
- राई तेल
- काळी अक्खी / अर्धी उडीद
- गूळ
- काळे कपडे
- कोणत्याही प्रकारचे ब्लँकेट
- चामडी बूट / चपला / छत्री
- सर्व प्रकाच्या लोखंडी वस्तू
- सर्व प्रकारच्या चामडी वस्तू
- घोडयाची काढलेली नाल
ह्या वस्तूंचा उपयोग शनिवारी दान करण्यासाठी होतो. ह्या वस्तू शनिवारी घरात आणू नयेत. ह्या वस्तू स्वतःजवळ आपल्या वापरासाठी जास्त साठवून ठेऊ नयेत. गरज असतील तेव्हढ्याच घ्याव्यात. ह्या वस्तूंचा व्यापार शनी ची कृपा असल्याशिवाय करता येत नाही.
आपल्याला एक लक्षात आले असेल की ह्या वस्तू निर्माण करणासाठी त्याला आकार देण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. ह्या वस्तू सुगंधीत नाहीत ह्या वस्तूंचा वापर अती करू शकत नाही. त्या त्या प्रांत आणि वातावरण पाहून त्याचा उपयोग होतो.
वरील सर्व गुणधर्म हे शनीचा अंमल असल्यामुळे आहे. कोणतेही शनी चे दान सूर्यास्त झाल्यावर करावे. शनी ची दिशा पश्चिम आहे त्यामुळे पश्चिम दिशेला मुख करून शनी मंत्र म्हणावा.
शनी च्या कोणत्याही उपासनेत भक्तीत ग्ल्यामर शो बाजी करू नये त्रास होतात. जाहिरात बाजी शनीला आवडत नाही.
शनिवारी ज्या वस्तू दान करायाच्या असतील त्या वस्तू शुक्रवारी विकत घ्याव्यात आणि शनिवारी दान कराव्यात. कपडे , बूट छत्री अशा वापरायच्या वस्तू शुक्रवारी खरेदी करून एक आठवडा तरी त्याचा उपयोग करून गरिबांना द्याव्यात. शक्यतो ह्या वस्तू जास्त डम्प करून ठेऊ नयेत.
ज्यांना साडेसाती , अडीचकी
मकर कुंभ मीन- साडेसाती
कर्क वृश्चिक – अडीचकी
आणि ज्यांना शनी ची 19 वर्षाची महादशा आहे.
त्यांना हा लेख जास्त उपयोगात येईल.
धन्यवाद…..!