You are currently viewing शीघ्र गर्भधारण संस्कार I बाळ होण्यासाठी नक्की वाचा


हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी गर्भधारण हा सुद्धा एक संस्कार आहे. पूर्वीच्या वेळी योग्य संतान ला जन्म देण्यासाठी ह्या संस्काराचे नियम पाळत होते. सध्या च्या युगात ह्यावर साधा विचार सुद्धा केला जात नसल्यामुळे आलेल्या सर्व बाळांना कदाचित भरपूर गोष्टींचा सामना करावा लागत आहे असे माझे स्वतःचे मत आहे.

ज्या स्त्रियांना विवाह होऊन ३ पेक्षा जास्त वर्षे झाली असतील त्यांनी खाली दिलेला लेख नक्की वाचून मार्गदर्शन मिळवा.
नोट — हे लिखाण त्या स्त्रियांसाठी असेल ज्यांना संतती होण्यासाठी मेडिकल चा काहीहि इशू नाही दोघांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आणि शरीर संबंध ठेऊन संतती निर्माण करण्याची इच्छा आहे.

आपणा सर्व विवाहित स्त्री पुरुषांना माहीतच असेल कि विवाहा नंतर जर संतान प्राप्ती करून घ्यायची असेल तर स्त्री चा मासिक धर्म हा सुरळीत असणे फार महत्वाचे आहे. आणि असेल तर पती पत्नीने स्त्रीच्या मासिक धर्माच्या ६ व्या दिवसापासून ते १६ व्या रात्रीपर्यंत संबंध ठेवले तर कन्सिव्ह होण्यास मदत होते.

जाणून घ्या ऋतू स्नानाच्या दिवशी चे महत्वाचे नक्षत्र

जेव्हा विवाहित स्त्री ला मासिक धर्म येतो आणि तिच्या ५ व्या दिवशी किंवा ६ व्या दिवशी ती ऋतू स्नान करते अशा वेळी खालील नक्षत्र त्या दिवशी सूर्योदयाला असतील तर येणाऱ्या १६ रात्रीपर्यंत संबंध ठेवले तर अशा स्त्रीला कन्सिव्ह होण्याचे प्रमाण हे खालील प्रमाणे टक्केवारी प्रमाणे मांडले आहे .

ऋतुस्नानाच्या वेळी असणारी नक्षत्रे
१) हस्त — ९० %
२) स्वाती — ९० %
३) अश्विनी — ९० %
४) मृगशीर्ष — ९५ %
५) अनुराधा — ९० %
६) धनिष्ठा — ९५ %
७) रेवती — ९५ %
८ रोहिणी — ९५ %

मृगशीर्ष, धनिष्ठा, रेवती आणि रोहिणी हि महत्वाची ४ नक्षत्रे असतील तर त्या सायकल मध्ये अधिक प्रयत्न सुरु ठेवावा.

वार सुद्धा महत्वाचे

वरील नक्षत्राच्या दिवशी जर रविवार, मंगळवार, गुरुवार आले तर आणि त्या स्त्रीचे ऋतु स्नान त्याच दिवशी असेल तर हे ९९% प्रमाण होते.

ऋतू स्नान कधीही पंचक नक्षत्री करू नये जेव्हा संतती साठी आपण प्रयत्न करीत आहात.

पंचक नक्षत्रे खालील प्रमाणे आहेत

  • धनिष्ठा — ह्यात प्रथम २ चरणात स्नान करू शकता ३ ऱ्या आणि ४थ्या चरणात स्नान वर्जित असेल
  • शततारका पूर्ण
  • पुर्वाभाद्रपदा पूर्ण
  • उत्तराभाद्रपदा पूर्ण
  • रेवती — पहिले २ चारणे सोडून द्या ३ आणि ४थ्या चरणावर स्नान करू शकता.

अशा वेळी हे नक्षत्रे सोडून पुढे स्नान करावे.

संबंध करताना गर्भधारणा (कन्सिव्ह) होण्यासाठी आधी आणि नंतर काय करावे ?

हा प्रोसेस अगदी आनंदात करावा. ज्या वेळी हा प्रोसेस करायचा असेल तेव्हा पती आणि पत्नी ने दोघांनी मिळून देवापुढे आपल्या समस्येबद्दल हाथ जोडून प्रार्थना करावी. नंतर आपल्या पितरांची आठवण करून त्यांची माफी मागावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी विनंती करावी. नंतर आपल्या कुलदेवतेला सुद्धा आठवण करून प्रार्थना करावी. नंतर संबंध करण्यासाठी जावे.

जिथे आपण हे करणार आहोत तिथे स्वच्छता असावी कोणतीही अडगळ असता काम नये. बेड शीट हि काळ्या-निळ्या रंगाची नसावी. बेड खाली कोणतेही लोखंडी सामान नसावे. लोखंडी बेड शक्यतो वापरू नये.

आपल्या बेड समोर दिसेल असे एखादे रांगत्या बाळाचे चित्र लावावे.

सर्व स्त्रियांनी आपल्या अंतर्वस्त्रात निळा आणि काळा रंग वर्जित करावा.

आपल्या माहितीसाठी सांगतो — ज्या मुलींना पहिली पाळी हि तिने घातलेल्या निळ्या अंतर्वस्त्रावर येते तेव्हा अशा सर्व मुलींना विवाह आणि संतती ह्याचा त्रास होतो. म्हणून जेव्हा मुली वयात येतात तेव्हा शक्यतो हा रंग वापरू नये.

संबंध करताना मुलाची स्वाश नासिका हि उजवी आणि मुलीची डावी सुरु असताना उत्तम परिणाम येतात. हा एक प्रोसेस शिवसरोदय शास्त्राचा आहे. १५ दिवसात सकाळी उठताना सुद्धा हे साध्या सरावाने कळते हि कोणती नाडी सुरु आहे. व्यक्तीच्या दोन्ही नाकपुड्या ह्या साधारण ९० मिनिटात नंतर फक्त ७ मिनिटासाठी ओपन होतात. त्यावेळी सुषुम्ना नाडी सुरु आहे असे त्याला म्हणतात. बाकीच्या २ सूर्य आणि चंद्र नाडी असतात उजवी आणि डावी.

संबंध केल्यावर पुढील मासिक धर्माची तारीख असे पर्यंत मुलीने जास्त तिखट अथवा बाहेरचे खाऊ नये.

हेही वाचा :- बाळासाठी प्रयत्न करताय ? मग हे करूच नका

अध्यात्मिक उपाय

संतान बाळ गोपाळ मंत्र जप ह्यात आपल्याला जरूर मदत करेल. कृष्ण सेवा नारायण सेवा सुद्धा आणि त्याबरोबर कुलदेवतेची उपासना करत राहावी. घराण्यात पितृदोष किंवा पत्रिकेतील कोणत्याही दोषांमुळे जर संतती बाधा होत असेल तर सरळ रोज गौ सेवा करावी. गौ सेवेत रोज गायीला घरातील पहिली चपाती गुळाबरोबर देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

आपल्या वास्तू मधील नॉर्थ ची सर्व बाजू हि स्वच्छ आणि हलकी ठेवावी. जर इथे टॉयलेट किंवा किचन चे बेसिन असेल किंवा काही वस्तू डम्प केल्या असतील तर मात्र वास्तू मधील ह्या प्रकारचा दोष भयंकर मानण्यात आला आहे त्याचा उपाय करणे महत्वाचे असेल.

ज्या जोडप्यांचा काही शारीरिक दोष असेल आणि मेडिकल ची कोणतीही मदत घेऊन संतान उप्तत्ती करण्याचा प्रयत्न करत असाल तर वरील ऋतुस्नानाची माहिती उपयोगात आणावी आणि त्या महिन्यात जरूर प्रयत्न करावा.

अशा सर्व विवाहित जोडप्याना पत्रिका पाहून श्री दत्तगुरु ज्योतिष तर्फे संबंधांच्या वेळा देण्यात येतात फक्त ६ महिने पाळून पाहाव्यात. अधिक चौकशी साठी व्हाट्सअँप वर विनंती टाकावी अधिक माहिती दिली जाईल.

पुढील लेखात संतती न होण्याचे योग देणार आहे तेव्हा आपल्या पत्रिकेत तसेच योग आहेत का ते पाहून योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्या.

धन्यवाद…..!

Leave a Reply