You are currently viewing शनिवार आणि चतुर्थ श्रेणी

शनिवार आणि चतुर्थ श्रेणी- शनिवार हा शनी चा वार असल्यामुळे शनी हा आपल्या कर्माचा ग्रह असतो पत्रिकेत. कुंडलीत १० वे स्थान आणि ११ वे स्थान कर्म स्थान आणि लाभ स्थान म्हणून ओळखले जाते. व्यक्तीला आपल्या कर्मापासून लाभ मिळणार कि नाही हे पत्रिकेत ह्या दोन्ही स्थानावरून पहिले जाते.

कोणाच्याही पत्रिकेत जिथे १० नंबर असेल तर त्या स्थानातून जे जे मिळेल त्यात अति श्रम असतात. कारण शनी देव हे श्रमाचे अति मेहनतीचे देव – कर्माचे देव म्हणून ओळखले जातात.

म्हणून सर्वाना एक सल्ला देण्यात येतो कि आपल्या पत्रिकेत शनी जरा जरी बिघडला असेल तर आपल्या मेहनतीचे फळ मिळण्यास त्रास होतो.

> हेही वाचा :- शुक्रवार आणि आंबट

जरी तुम्ही पत्रिका चेक केली नसेल तरी खालील उपाय हा प्रत्येक शनिवारी करावाच.

  • श्रमिक लोकांना मदत करणे हा उपाय वरील सर्व प्रॉब्लम्स मधून तुम्हाला बाहेर काढेल.

आता श्रमिक कोण — तर अशा सर्व व्यक्ती ज्या चतुर्थ श्रेणीत येतात. जसे स्वीपर , बांधकाम कामगार वगैरे.
ऑफिस मधील सोसायटी मधील कोणत्याही व्यक्ती ज्या तुमच्या रोजच्या संपर्कात असतात ज्या तुमच्या ऑर्डर चे पालन करतात अशा व्यक्तींना तुम्ही केलेली मदत हि तुमच्या अडकलेल्या कार्यात सुलभता येऊन किंवा तुमच्या सर्व कामात प्रॉफिट देऊन जाईल ह्यावर विश्वास ठेवा.

म्हणून प्रत्येक शनिवारी आपल्या सोसायटी च्या किंवा ऑफिस मधील खालच्या दर्जाच्या व्यक्तींना निदान चहा पाण्यासाठी काही पैसे देणे किंवा भेट वस्तू देणे हा एक उपाय शनी ची कृपा मिळविण्यासाठी लाभदायक ठरेल.

हा प्रयोग करून त्याची प्रचिती घेतल्यानंतर आपणास हे लिहीत आहे ह्यावर विश्वास ठेवा.
साडेसाती वाल्यानी जरूर हे करावेच.

जर अशा व्यक्तींबरोबर जर तुमचे वाद होत असतील कारणे काहीही असू शकतील तर पत्रिकेत शनी चांगले फळ देणार नाही हे सुद्धा लक्षात असू द्या.

धन्यवाद…..!

Leave a Reply