You are currently viewing राहू केतू राशी परिवर्तन २०२० : वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न

राहू केतू राशी परिवर्तन २०२० खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी हे वाचून नंतर खालील आपल्या राशीचे आणि लग्न स्थानाचे फळ वाचावे हि विनंती.

राहुचा वृषभ राशीत आणि केतूचा वृश्चिक राशीत प्रवेश

https://shreedattagurujyotish.com/rahu-aani-ketu-bhraman-23-september-2020/

२३ सप्टेंबर २०२० ते पुढील १८ महिने वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नाला राहूचे भ्रमण हे पत्रिकेच्या सप्तम स्थानी (पत्रिकेचे ७ वे स्थान) आहे जिथे ऋषभ राशी आहे क्रमांक २ आणि केतू चे भ्रमण पहिल्या स्थानी आहे जिथे ८ वृश्चिक राशी आहे.

वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न
ज्यांची राशी वृश्चिक आहे त्यांची हि चंद्र कुंडली आहे आणि खालील राहू केतू चे भ्रमण ह्यावर केलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे.
आणि ज्यांची कोणतीही राशी असली तरी आपली जर लग्न कुंडली वरील कुंडली प्रमाणे असेल जिथे ८ ने सुरुवात होते तर खाली दिलेले विवेचन हे आपल्यासाठी आहे. तुमच्या मूळ लग्न कुंडलीत येथे राहू नसला तरी आणि असला तरी लग्न कुंडली अशीच असेल तरी हे लिखाण वाचून घ्यावे.

राहू जिथे वृषभ राशीत आला आहे ते पत्रिकेचे वैवाहिक स्थान आहे आणि जेव्हा एखादा पाप ग्रह ह्या स्थानी गोचरीने येतो आहे तर वृश्चिक राशीला/लग्नाला इथे आपल्या वैवाहिक सुखात सावधानता बाळगावी लागेल. जर आधीपासून ह्या सुखात काही वाद झालेले असतील तर ते विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसे काही आधी झाले नाही तर उगाच चिंता न करता १८ महिने गपचूप राहावे.

हे पार्टनर शिप चे सुध्दा स्थान आहे जर तुम्ही व्यवसायिक असाल तर इथे राहू आपल्या पार्टनर संबंधित चीटिंग चे विषय येतील.

जे आत्ताच व्यवसायात आले आहेत त्यांचा जर डेली पैसे मिळविण्याचा व्यवसाय असेल तर मात्र राहू इथे रोज पैसे देणाऱ्या व्यवसायात उत्तम फळे देईल.

राहू ची ७ वी दृष्टी

राहू ची ७ वी दृष्टी पत्रिकेच्या पहिल्या स्थानावर जिथे ८ लिहिले आहे जिथे केतू सुध्दा आला आहे त्यावर आहे त्यामुळे आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त स्ट्रॉंग व्हाल तुम्ही. हातात बरीच कामे आणि धावपळी सुद्धा होतील. चार पाच प्रकाची कामे एकत्रित केल्यामुळे कॉन्फयुज्ड व्हाल काय करावे ते सुचणार सुद्धा नाही. काही जण फार अग्रेसिव्ह होतील कामात. काही जणांना जर आरोग्याचे त्रास आधीपासून असतील तर सावध राहावे त्रास होऊ शकतो त्यात.

राहू ची ९ वी दृष्टी

राहू ची ९ वी दृष्टी हि पराक्रम स्थानावर येत आहे जिथे १० लिहिले आहे. इथे शनी ची मकर राशी आहे. आपल्याला आपल्या पराक्रमात फार धावावे लागेल. काही जणांना भाऊ बहिणी हा विषय त्रास देऊ शकतो किंवा त्यांना त्रास होऊ शकतो त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये.

राहू ची हि दृष्टी आपल्याला डेरिंग देते आणि इकडून तिकडे धावपळ करून तुम्ही काही तरी आपल्याला प्रेजेंट कराल ह्या १८ महिन्यात.

राहू ची ५ वी दृष्टी

राहू ची ५ वी दृष्टी लाभ स्थानावर जिथे ६ लिहिले आहे त्यात येत आहे प्रत्येक प्रकारच्या लाभासाठी तुम्ही प्रयत्न कराल. हे इच्छा स्थान सुद्धा आहे म्हणून मोठ्या इच्छा निर्माण होतील आणि काही तरी वेगळे करून लाभ मिळविण्याची इच्छा होईल.

ह्या १८ महिन्यात मित्रांवर अवलंबून राहू नका ते तुमच्या कमी मदतीला येतील. काही जणांना आपल्या लाभासाठी वेगळ्या शहरात जावे लागेल. जे जॉब करत आहेत त्यांना जास्त मेहनत करून आत्तापर्यंत काहीच मिळाले नसेल अशाना हा काळ काही तरी देऊन जाईल. मात्र स्थान बदल होऊन ते मिळेल असे दिसते.

केतू आणि केतूच्या दृष्ट्या

केतू जिथे आहे ते प्रथम स्थान आहे आणि केतू इथे आला तर राहू च्या ७ व्या दृष्टीचे फळ समजावे मात्र इथे आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा पुन्हा एकदा सल्ला दिला जातो. केतू ची ७ वी दृष्टी चे फळ सुद्धा राहू प्रमाणेच असेल.

केतू ची ५ वी दृष्टी हि ज्ञान स्थानावर, संतती स्थानावर, शिक्षण स्थानावर येत आहे जिथे गुरु ची मीन राशी आहे १२ नंबर ची. विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागेल वृश्चिक राशी आणि लग्न असलेल्याना. कन्फुझन वाढेल कुठे काय करू ते समजणार नाही ह्यात मोठ्यांचा सल्ला घ्या.

संतान विषयक इथे त्रास जाणवतो ज्यांना संतान च्या काही काळज्या असतील तर त्या १८ महिन्यात धावपळीच्या होईल. ज्यांना संतान प्रोसेस करायचा असेल तर त्यांना वेगवेगळे प्रयत्न करून हे करावे लागतील. पण त्यात यश किती मिळेल शंका आहे. ज्यांना आधीच ह्या विषयी २/५/७ महिने झाले आहेत अशा सर्व स्त्रियांना संतान प्रोसेस मध्ये फार जपावे लागेल.

उपाय

राहू केतू च्या भ्रमणामुळे आपल्याला जास्त त्रास होऊ नये ह्यासाठी काही उपाय खाली देत आहे

  • रोज एक माळा ॐ दूँ दुर्गाय नमः चा जप सुरु करा मंगळवार पासून.
  • गणेशाला रोज दुर्वा वहा.
  • कपाळावर नेहमी हनुमानजींच्या उजव्या पायाचे सिंदूर लावून बाहेर पडा.

ह्याने राहू केतूची निगेटिव्हिटी चा सामना करताना जास्त त्रास होणार नाहीत वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न वाल्याना.

नोट : वरील सर्व आपली जन्मपत्रिका न पाहता आणि इतर सर्व ग्रहांची स्थिती न पाहता एक विवेचन आहे अधिक शुक्ष्मता हि आपली स्वतःची पत्रिका सांगू शकेल एखाद्या तद्न्य ज्योतिषाकडून. तेव्हा हे सर्व वृश्चिक राशीच्या आणि वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेवरील कॉमन भाकीत समजावे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply