मला समजलेला शिव तुमच्या मनातला ह्या मागील पोस्ट मध्ये मी शिवलिंग घरात पुजायचे असेल तर कोणते आणि कसे ह्याबद्दल लिहिले आहे. आपण ह्या लेखात पारद शिवलिंग बद्दल जाणून घेऊया.
जर घरात शिवलिंग ठेवायचे असेल तर सर्वात उत्तम शिवलिंग हे पारद शिवलिंग मानले गेले आहे ह्यावर प्रकाश पाडू. पण त्या अगोदर तुम्ही पुन्हा मागील पोस्ट वाजून घ्या कारण शिवलिंग घरात ठेवणे हा विषय सोपा नाही. तसा हा कठीण सुद्धा नाही कसा ह्याचा विचार करू.
>हे वाचा…..मला समजलेला तुमच्या घरातील अणि मनातील शिव
आत्ता सध्या श्रावण मास सुरु आहे. आणि ह्या महिन्यात घरात पारद शिवलिंग स्थापना कोणत्याही सोमवारी करण्यास हरकत नाही.
माझ्या मते तुम्ही जर ह्या महिन्यात स्थापन केलेत किंवा जुने कोणतेही घरात असलेले शिवलिंग बदलून पारद शिवलिंग ठेवलेत तर एखादा मोठा विधी करण्याची गरज नाही. तुम्ही भक्तिभावनेने त्या शिवलिंगाला देवघरात स्थान देऊ शकता.
श्रावण सोडून इतर कोणत्याही वेळी ह्याची स्थापना विधी विधानाने करावी लागेल असे माझे मत आहे.
काय आहे पारद शिवलिंग?
पारा धातू पासून पारद शिवलिंग तयार केले जाते. हा एक द्रव पदार्थ आहे आणि त्यात तांबे ,कांसे, आणि इतर जडीबुटी मिसळून ह्या शिवलिंगाला आकार दिला जातो. तांबे हे पार्वतीचे रूप मानले जाते.
मानव शरीराचे तापमान हे पाऱ्यावरच मोजण्याची पद्धती आहे कारण सामान्य परिस्थितीत हा धातू आपले द्रवरूप सोडत नाही.
पारद आणि शिवाचा संबंध
अशी आख्यायिका मिळते कि समुद्र मंथनाच्या वेळी मोहिनी रूपातल्या स्त्री रुपी विष्णू ला पाहून शिव मोहित झाले आणि त्यांच्या मैथुन क्रियेतून पारा रुपी द्रव उत्त्पत्तीत आला. त्यामुळे त्यात शिवाचा वास असल्याने जे जे संसार रुपी मानव आहेत त्यांनी पाऱ्याच्या शिवलिंगाची उपासना करावी असे त्यात म्हटले आहे.
रुद्र संहिता , पारद संहिता , ब्रम्हपुराण , शिव पुराण , उपनिषद , अशा अनेक ग्रंथात पारद शिवलिंगाचे वर्णन दिले गेले आहे.
पारद शिवलिंगाचे लाभ
ज्या घरात पारद शिवलिंग असेल तेथे कोणताही वास्तू दोष जास्त निगेटिव्ह फळे देत नाही. ज्या घरात पारद शिवलिंग असेल तेथे धन धान्य, आरोग्य ,पद प्रतिष्ठा , सुख , भरभराटीचे असते.
१२ ज्योतिर्लिंगाचे पूजन केल्याचे जेव्हढे फळ आहे ते एकट्या पारद शिवलिंगच्या पूजेत सामावलेले आहे. पारद शिवलिंग ज्या घरात असेल तेथे अकाल मृत्यू चे भय राहत नाही.
१०० अश्वमेघ यज्ञ , चार धाम यात्रा , एक लाख गायीचे दान , केल्याने जे फळ मिळते ते एकट्या पारद शिवलिंगाच्या पूजनाने मिळेल.
ह्या जन्मी पारद शिवलिंगाची पूजा केल्याने मागील जन्मो जन्मी ची सर्व पापे दूर होऊन ह्या जन्मी ची सुद्धा कष्ट मिटविण्याची शक्ती पारद शिवलिंगामंध्ये आहे.
अध्यात्माबद्दल जरा जरी आकर्षण असलेल्या व्यक्तीला पारद शिवलिंगाची उपासना केलीच पाहिजे असे माझे मत आहे.
ज्या घरात पारद शिवलिंगाची पूजा केली जाते त्या घरात पारिवारिक तंटे , बाधा , मानसिक टेंशन , इतर कोणतेही त्रास जास्त प्रमाणात त्रासदायक नसतील.
पारद शिवलिंगाची रोज पूजा केल्याने वाकसिद्धी प्राप्त होते , समाजात खुलून बोलण्याची शक्ती निर्माण होते. लोक त्याला संमोहित होतात.
प्रदोष च्या वेळी पारद शिवलिंगा वर शिव महिमा स्तोत्र ने अभिषेक करून कोणत्याही आर्थिक स्थिती चे टार्गेट पूर्ण करता येते. किंवा आर्थिक संकटे दूर करता येतात.
शिव अभिषेक आणि रोज चे पूजन
रोज साध्या पाण्याने किंवा सुविधा असेल तर गंगाजल च्या पाण्याने अभिषेक करावा.
नंतर गायीचे कच्या दुधाने अभिषेक करून पुन्हा गंगाजल ने अभिषेक करावा.
असे झाले कि एका प्लेट मध्ये सफेद कापड ठेऊन त्यावर शिवलिंगाची स्थापना करावी.
त्यावर चंदन पावडर चा लेप करावा, शक्य असेल तर रोज एक बेल जरूर ठेवावा , अक्षता अर्पित करावी , आणि तुपाचा दिवा लावून कपूर पेटवून आरती ओवाळावी.
नैवेद्यात भाताची खीर रोज जमली नाही, सोमवारी तरी ठेवावी.
वरील पद्धतीने रोजची पूजा करू शकता पण पहिल्या दिवशी स्थापन करताना जो पहिला अभिषेक असेल तेव्हा पंचामृताने अभिषेख करावा नंतर ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं किंवा नमः शिवाय ने १०८ बेल शिव पिंडीवर अर्पित करावा त्यावर प्रत्येक वेळी बेलावर चंदन लावून हा अर्पण करावा थोडा वेळ लागला तरी चालेल.
अभिषेक मध्ये तुप , पाणी , गंगाजल , मध, (पाच वस्तूने बनविलेले पंचामृत) , वापर करू शकता.
रोज अभिषेक करताना नमः शिवाय मंत्र म्हणावा ,
शिवलिंगावर घरात सतत पाण्याची धार लावणे हे शक्य नसते म्हणून त्यावर चंदन पावडर गंगाजल मध्ये मिक्स करून लेप करून ठेवावा.
एक विशेष — वरील लेख वाचल्यानंतर आपल्याला जर शिवलिंग सथापन करण्याचा मोह आवरता आला नाही तर कृपया रोज १५ मिनिटे शिवपुजनात देण्याची तयारी असेल तरच सथापन करा.
काही जण शिवपिंड ठेवतात आणि १२ तास बाहेर असतात पण घरातल्या पिंडीवर साधे पाणी सुद्धा अर्पण करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही.
विशेष ह्याने त्रास होतात लोकांना. म्हणून नीट विचार करून जर देवाला वेळ देता आला तरच पुढील क्रिया करा नाहीतर हा लेख फक्त माहिती म्हणून वाचल्याचे समाधान असू द्यात.
क्षमा असावी चूकभूल माफ करावी.
पुढील लेखात शिव अभिषेख ची अजून माहिती सादर करेन.
आपल्या चांगल्या कमेंट ची वाट पाहत आहे. पण जे काही असेल ते फक्त इथेच खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा.
धन्यवाद……!
खुपच मस्त गुरुजी
Very very important and good information .. Thankyou …. 👌🙏 Om Namah Shivay 🙏🙏🙂💐
धन्यवाद .