लोशू ग्रीड मध्ये अंक आणि घटक- खालील इमेज मध्ये लोशू ग्रीड मध्ये त्या त्या अंकांचे घटक तत्वे दाखविण्यात आली आहेत. (Numbers of Elements in Loshu Grid)
आपल्या जन्मतारखे प्रमाणे काही अंक मिसिंग असतील ते ते घटक आपल्या जीवनात कमी परिणामकारक ठरतील असा नियम आहे. किंवा जर काही अंक हे खूप वेळा सुद्धा येत असतील तर त्या घटकाचा केव्हा केव्हा वाईट परिणाम सुद्धा पाहण्यात आला आहे.
मात्र जे जे घटक खूप चांगले आहेत त्याचा आपल्या जीवनात खूप चांगला उपयोग सुद्धा करून (ह्या बद्दल ची माहिती पुढील काही पोस्ट मध्ये देण्यात येईल)
उदाहरण —
एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख २-२-२००२ असेल.
मूलांक -२
भाग्यांक- ८
कुआ नंबर –७ (जर पुरुष असेल) २००२=४ =(११-४=७)
वरील जन्म तारखेत ४ कुआ नंबर ८ भाग्यांक घेतला आहे. मूलांक २ हा पुन्हा घेतला नाही कारण तो सिंगल नंबर आहे. म्हणून इथे २ हे ४ वेळाच लिहिले आहे जे जन्म तारखेत आहेत.
मुद्दा असा आहे जिथे जिथे X फुल्ली आहे तिथे तिथे ते ते घटक गुणधर्म मिळताना त्रास होतील.
जसे सर्वात वर ज्या ज्या अंकांपासून घाटातक आहेत ३ चा वूड ५ चा अर्थ आणि ७ चा मेटल म्हणून ह्या व्यक्तीला ३/५/७ हे नंबर नसल्यामुळे आणि इतर १/६/९ नसल्यामुळे त्याचे सुद्धा घटक मिळविताना त्रास होतील.
हेही वाचा :- जाणून घ्या काय आहे लोशू ग्रीड
Table of Contents
कोणते घटक काय काम करतात?
वूड एलिमेंट (Wood Element)
नंबर ३ आणि ४ लाकूड म्हणजेच जर झाड समजले तरी ते जसे कोणत्याही वातावरणात स्वतःला उभे ठेवण्याचा प्रयत्न करते तसा तो व्यक्ती सुद्दा जर त्याच्याकडे ३/४ हे दोन्ही वूड एलिमेंट असले तर आलेल्या परिस्थितीशी सामना करतो. लाकूड एक फर्निचर चा शुद्ध पार्ट आहे म्हणून अशा व्यक्ती च्या जीवनात नवीन नवीन युक्त्या, आणि कलात्मक विचार जरूर असतात. सतत तो व्यक्ती आपले विचार इतर व्यक्तींच्या समोर मांडतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
अर्थ एलिमेंट (Earth Element)
इथे अर्थ म्हणजे जमीन माती — पृथ्वी तत्व — हे व्यक्तीला चिकाटी देते, मातीशी जुळवून घेतो व्यक्ती , त्याच्याकडे कल्पना आणि त्याच्या कृतीची स्थिरता पाहावयास मिळते म्हणून ज्याच्याकडे ८/५/२ हे तीनही अंक असतात त्यांच्याकडे अर्थ एलिमेंट भरपूर असल्यामुळे अशा व्यक्ती आपल्या जीवनात भरपूर प्रॉपर्टी मिळविताना दिसतात अथवा प्रॉपर्टी चे व्यवसाय करतात
फायर एलिमेंट (Fire Element)
(आग घटक) लोषु ग्रीड मध्ये नंबर ९ हा एकच फायर एलिमेंट चा नंबर आहे आणि हा नंबर आपल्या जन्म तारखेत असला तर आपल्याकडे उत्साह प्रेरणा ह्याची जीवनात कमतरता भासत नाही. सतत फाईट करण्यासाठी हा नंबर उत्तेजित करतो आणि म्हणून १९०० पासून १९९९ पर्यंत च्या २० व्या शतकात सर्वाना हा ९ आकडा आपल्या जन्म तारखेत लाभला आहे. म्हणून जसे १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला हे ९ ची कमाल मानावी लागेल. ९ नंबर हा मंगळाचा आहे आणि ज्योतिष शास्त्रात मंगळाला सैनिक मानलेला आहे.
मेटल एलिमेंट (Metal Element)
अंक ७ आणि अंक ६ हे ह्यात मोडतात म्हणून मेटल हा घटक असेल तर स्वतःची क्षमता स्वतःचे वजन दाखविण्याची कला इथे तो देतो. ७ मेटल हा सिल्वर आहे आणि ६ गोल्ड आहे म्हणून तो इथे व्यक्तीत सौंदर्य खुलवितो. स्वतःसाठी उभे राहण्याची क्षमता तो देतो व्यक्तीला.
वॉटर एलिमेंट (Water Element)
(जल तत्व) — १ नंबर हे लोशू ग्रीड मध्ये जलतत्वात मोडते म्हणून हे तत्व ज्याच्याकडे असेल तो व्यक्ती प्रसिद्धी करिअर मिळवितो . मागील लेखात १ अंकावर जे जे लिहिले आहे ते सर्व व्यक्तीला आपल्या जीवनात मिळते.
म्हणून काही नंबर व्यक्तीच्या जन्मतारखेत मिसिंग असतात आणि म्हणून व्यक्ती त्यात त्या घटक तत्वाशी सतत झगडत असतो आपल्या जीवनात.
जर जन्मतः हे जर जन्मतारखेवरून आपल्याला कळले कि आपल्या आयुष्यात कोणत्या तत्वांसाठी आपल्याला सामना करावा लागेल तर ते घटक आपण आधीपासून मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो.
नोट — काही घटक तत्वे हे भारतीय ज्योतिष अंकाशी जुळणार नाहीत जसे १ अंक आपण अग्नी चा मानतो. आणि इथे तो जल दाखविला आहे. काही काळजी करू नका कारण हे लोशू ग्रीड चे नियम आहेत.
धन्यवाद…..!