वर्षभराच्या २४ एकादशी मधील सर्वात कठीण व्रत निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi 2021) चे व्रत म्हणून ह्याची ओळख आहे. जेष्ठ मासातील शुक्ल पक्षात येणारी हि एकादशी सर्व मनोकामना पूर्ण करणारी असते त्यामुळे श्री हरी विष्णू किंवा त्याच्या अवताराचे हे व्रत केल्याने व्यक्ती ची जाणते पणाने किंवा न जाणता केलेली पापे नष्ट होतात आणि व्यक्ती वैकुण्ठ प्राप्ती नक्की करतो.
Table of Contents
निर्जला एकादशी मुहूर्त (Nirjala ekadashi 2021 date)
- एकादशी तिथी प्रारंभ – २० जून २०२१ सायंकाळी ४:२१ पासून
- एकादशी तिथि समाप्त – २१ जून २०२१ दुपारी १:३१ पर्यंत
- एकादशी पारण (उपवास सोडणे) – २२ जून २०२१ सकाळी ६:०२ ते ८:४१ पर्यंत.
कसे करावे हे व्रत
एकादशी च्या सर्व व्रताप्रमाणेच हे व्रत असते जसे एकादशीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे दशमी च्या रात्री पासून ह्याचे पालन करून उपवास सुरु होतो आणि द्वादशी पहिल्या प्रहरात ह्याचे पारण होते. (उपवास सोडला जातो).
पण ह्या एकादशीच्या नावाप्रमाणे ह्याचे पालन हे जरा वेगळ्या स्वरूपाचे असते नीर अर्थात पाणी म्हणून पाण्याचा एकही थेम्ब एकादशीच्या उपवासात न करण्याची परंपरा आहे. अर्थात एकादशी च्या सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत हा नियम पाळावा लागतो.
सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्याला अर्ध्य द्यावे आणि संकल्प करावा कि ह्या ह्या मनोकामने साठी मी आज एकादशीचे व्रत करत आहे. आणि रोजच्या पूजेत घरातील कृष्णाला पंचामृताने स्नान घालावे. पिवळे वस्त्र पिवळी फुले आणि तुळशी अर्पण करावी लोण्याचा नैवेद्य दाखवावा. आणि दिवसभर कृष्ण, विठ्ठल, विष्णू ह्यांचा मानसिक नामजप करत राहावा.
जसे विठठल विठ्ठल, कृष्ण कृष्ण, नारायण नारायण किंवा गोविंद गोविंद जो नामजप आपल्याला आवडेल तो करत राहावा. संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा.
सर्व एकदशीच्या रात्री फलाहार काण्याची पद्धती आहे पण ह्या एकादशी मध्ये तसे करता येत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी द्वादशीला दिलेल्या मुहूर्तावर ह्या व्रताचे पारण करावे. (Nirjala ekadashi vrat vidhi)
एकादशी चे इतर नियम, व्रत ह्याची संपूर्ण माहिती खालील काही लिंक वर अधिक वाचन करून मिळवू शकता.
कशी करावी एकादशी , काय करावे काय करू नये
https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi
एकादशी टिप्सhttps://shreedattagurujyotish.com/rama-ekadashi-wednesday-11-november-2020/
निर्जला एकादशी चे महत्व
जर कुणाला वर्षभराच्या सर्व एकादशीचे पालन करता येत नसेल तर ह्या एकाच व्रताचे पालन करून संपूर्ण एकादशीचे फळ प्राप्त करून भगवान विष्णू चा आशीर्वाद प्राप्त करता येतो. ह्याने आपल्या कडे येणाऱ्या संकटाना सामना करण्याची एक वेगळी शक्ती प्राप्त होते किंवा सगळी संकटे दूर होतात. (Nirjala Ekadashi 2021 importance)
निर्जला एकादशी ची कहाणी
एकदा भीम महर्षी व्यासमुनी जवळ आले आणि व्यासमुनीं जवळ ते बोलू लागले कि हे पितामह! – भ्राता युधिष्ठिर, माता कुंती, द्रोपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्व मला एकादशी च्या व्रताचे पालन करायला सांगत आहेत. पण माझ्याकडे तेव्हढे धाडस होत नाही कि मी पूर्ण दिवस अन्नावाचून राहू शकेन. आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशी चे व्रत करणे हे माझ्याकडून होणार नाही. काय करू तुम्हीच मार्गदर्शन करा. (Nirjala Ekadashi vrat katha)
तेव्हा व्यासमुनी भीमाला म्हणाले हे बघ एकादशीचे व्रत हे प्रत्येक मन्युष्याने केलेच पाहिजे कारण जाणते पणाने किंवा न जाणता मनुष्य कधी ना कधी पाप करीत असतो त्या पापाचा परिहार करण्यासाठी मनुष्याने एकादशीचे व्रत करणे आवश्यक असते. त्यात अन्नाचा एकही कण न खाता ह्या व्रतात भगवान विष्णूच्या सेवेत राहून व्रताचे पालन करण्याऱ्या मनुष्याला त्याच्या मरणोपरांत त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते आणि जो मनुष्य ह्या व्रताचे पालन करत नाही त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून तू सुद्धा ह्याचे पालन करणे अति आवश्यक आहे.
हे ऐकून भीमाला दुःख झाले आणि तो विचार करू लागला कि आपल्याला तर भूक अजिबात सहन होत नाही मग मी काय करू. त्याची हि चिंता पाहून व्यासजीनी भीमाला सांगितले कि ह्यावर एक उपाय आहे. जेष्ठ मासातील शुक्ल पक्षातील जी एकादशी असते त्याला निर्जला एकादशी म्हणतात. मला खुद्द नारायणांनी सांगितले आहे कि जो मनुष्य निर्जला एकादशी चे व्रत करेल त्याला वर्षभरातील सर्व एकादशीचे फळ मिळेल आणि त्याबरोबर तो सर्व पापातून मुक्त होईल.
म्हणून तू जर सर्व एकादशी करण्यास असमर्थ असशील तर तू ह्या निर्जला एकादशी चे व्रत जरूर कर पण त्यात एकदशीच्या सूर्योदय पासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न पाणी वर्जित करून राहावे आणि ॐ नमो भागवते वासुदेवाय नमः चा मानसिक जप करत राहावा. हे ऐकून भीमाने त्या दिवसापासून निर्जला एकादशी व्रत सुरु केले आणि तेव्हापासून ह्या एकादशीला भीमसेनी एकादशी (Bhimseni Ekadashi 2021) सुद्धा म्हणतात.
धन्यवाद।