कसा होईल माळा योग?
मागील लेखात सर्प माळा योग दिला होता त्याच्याच विरुद्ध हा योग अति सुंदर होतो जर कोणत्याही स्थानापासून चौथ्या सातव्या आणि दहाव्या स्थानी शुभ ग्रह एक एक लिहिले असतील तर त्या स्थानाला एक विशेष महत्व प्राप्त होते त्या स्थानाची शुभ फळे व्यक्तीला मिळतात.आधी हा योग केंद्र स्थानातूनच पहावा नंतर कोणत्याही स्थानातून होत आहे का पहावा कारण केंद्र स्थानातून झालेला योग हा १००% शुभ असेल.
केंद्र स्थाने –प्रथम स्थान चतुर्थ स्थान सप्तम स्थान आणि दशम स्थान.
शुभ ग्रह — चंद्र बुध गुरु शुक्र.
वरील कोणत्याही स्थानापासून ४थ्या — ७ व्या — आणि १० व्या स्थानी जर एक एक शुभ ग्रह लिहिले असतील तर ज्या स्थानापासून हा माळा योग होतो त्या स्थानाच्या गळ्यात एक सुंदर माळ दिसेल. जी फळे मिळतील ती व्यक्तीला फार सुंदर मिळतील.
१) उदाहरण — जर प्रथम स्थानापासून ४थ्या — ७ व्या — आणि १० व्या स्थानी एक एक शुभ ग्रह लिहिले असतील तर प्रथम स्थान हे व्यक्तीचे लग्न स्थान आहे त्याच्या देहाचे त्याच्या ऍक्टिव्हिटीचे हे स्थान आहे त्यामुळे तो जिथे जिथे आपले प्रेसेंटेशन करेल त्यात त्याला यश येईल अशा व्यक्तीला आपली प्रत्येक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही. तो प्रत्येक गोष्टीत पॉसिटीव्ह असेल.—–कुंडली क्रमांक १ पहा.
२) उदाहरण — जर हा योग ४थ्या स्थानापासून असाच झाला असेल तर प्रॉपर्टीज चे सुख आईचे सुख घरातील सुख , पर्सनल सुख ह्यात व्यक्ती फार नशीबवान असेल जण माणसात असा व्यक्ती फार चांगल्या पद्धतीने ओळखला जाईल. राजकारणात खूप प्रगती होते अशा व्यक्तीची किंवा खूप प्रॉपर्टीज होतात.—- कुंडली क्रमांक २ पहा
३) उदाहरण — जर हा योग ७ व्या स्थानापासून असाच झाला असेल तर व्यक्तीला वैवाहिक सुख उत्तम मिळते. तो जर व्यापारी असेल तर पार्टनर साथ देतील किंवा रोज मिळणारा पैसा खूप येईल आणि त्याचे नाव होईल —कुंडली क्रमांक ३ पहा.
४) उदाहरण — जर हा योग १० व्या स्थानापासून असाच झाला असेल तर व्यक्तीला कर्म स्थानी खूप प्रगती मिळते. त्याच्या कर्माने त्याची ओळख निर्माण होते. समाजात त्याला खूप मानसन्मान असतो. वडिलांचे प्रेम किंवा त्यांचा सपोर्ट हा नेहमी असेल.– कुंडली क्रमांक ४ पहा.
वरील माळा योग हा केंद्र स्थानातून पाहण्याची पद्धत आहे पण जर हाच योग प्रत्येक स्थानातून सुद्धा पहिला जातो.
- द्वितीय स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर धन आणि कुटुंबाचे सुख ह्यात व्यक्ती सरस असतो पैसा मिळतो पूर्वजीत संपत्तीचा त्याला लाभ होतो. कुटुंबाकडून त्याला आर्थिक सपोर्ट असतो.
- तृतीय स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर व्यक्ती वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रगती करतो अनेक उद्योग करून नाव कमावितो. भाऊ बहिणी चे सुख चांगले असते.
- पंचम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर संतान सुख, विद्या सुख उत्तम मिळते. त्याच्याकडे असलेल्या स्किल चा त्याला फार उपयोग होतो. असा व्यक्ती शिक्षणाच्या जोरावर फार पुढे जाऊ शकतो. प्रेम मिळण्यासाठी देण्यासाठी हा एक उत्तम योग असेल. अशा व्यक्तीची मुले फार प्रगतीपथावर असतील.
- षष्ठ स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर आपली सर्व्हिस कुणालाही देताना त्या व्यक्तीला त्रास होत नाहीत, कर्ज सहज मिळते किंवा कर्ज घेऊन तो प्रगती करतो किंवा कर्ज कितीही झाले तरी तो आरामात फेडत असतो किंवा कर्जच घेण्याची पाळी येत नाही. कोणताही मोठा आजार व्यक्तीला होण्याचा संभव कमी असतो झालाच तर व्यक्ती लगेच त्यातून कव्हर होतो. स्पर्धा परीक्षेत त्याचे नाव होते. शौर्य पदके त्याला मिळतात.
- अष्टम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर अशा व्यक्तीला मृत्यूचे भय येत नाही. इझी मनी व्यक्तीला सहज प्राप्त होतात. कमी श्रमातून व्यक्ती पुढे जातो. पारिवारिक संपत्तीचा लाभ होतो. वारसा हक्कासाठी हा योग उत्तम असेल.
- नवम स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर व्यक्ती भाग्योदयासाठी सतत अग्रेसर असतो. भाग्य लक त्याला नेहमी साथ देते. आणि असा व्यक्ती समाजात मोठ्या पदावर असतो. एखाद्या धार्मिक संस्थेचा चेअरमन किंवा मोठ्या मोठ्या संस्था सांभाळणारे ह्यात जन्म घेताना दिसले आहेत.
- एकादश स्थान (लाभ) स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर प्रत्येक प्रकारच्या इच्छा त्याच्या लगेच पूर्ण होताना दिसतात. कर्म केल्याबरोबर प्रॉफिट समोर असते वाट पहावी लागत नाही. संतान सुख सुद्धा उत्तम मिळते.
- द्वादश स्थानापासून जर ४थ्या, ७व्या आणि १० व्या स्थानी एक एक शुभग्रह लिहिले असतील तर व्यक्तीला बंधन योग होत नाही. व्यक्तीचे कायद्याच्या कचाट्यातून नेहमी रक्षण होते. व्यक्तीकडे बँक बॅलन्स, स्वतःहून मिळवलेली संपत्ती फार असते, व्यक्ती जन्म स्थानापासून दूर जाऊन नाव कामवितो, अध्यात्मिक क्षेत्रात चांगली त्याची प्रगती होऊ शकते.
नोट — कोणत्याही स्थानापासून ४/७/१० स्थानात एक एक जर शुभ ग्रह असेल आणि तो जर नीच राशीत किंवा अशुभ स्थितीत असेल तरी त्याची वाईट फळे त्या स्थानाची असतील मात्र ज्या स्थानाच्या गळ्यात हि माळ पडली आहे म्हणजे ज्या स्थानापासून ४/७/१० व्या ठिकाणी हे शुभ ग्रह बसले आहेत त्या स्थानाला त्याचे सुख प्राप्त होते.
धन्यवाद…..!