You are currently viewing महादशा अंतर्दशा म्हणजे काय? ज्योतिष मध्ये सर्वात मोठा विषय

महादशा अंतर्दशा म्हणजे काय?

Mahadasha Chart

वर दाखवलेली इमेज हि विशोंत्तरी महादशा ची आहे. प्रत्येक कॉम्पुटर पत्रिकेत एक पान ह्याचे जरूर असते. नंतर अंतर्दशाची सुद्धा काही पाने असतात.

महादशा म्हणजे असा एक महत्वाचा ग्रह जो आपल्या कुंडलीत त्या विशिष्ठ कालावधीसाठी कार्यरत असतो ज्यात घटना कधी कुठे आणि कशा घडणार आणि त्या घटनांपासून सुख मिळणार कि यातना मिळणार हे सर्व त्या महादाशेच्या ग्रहावर अवलंबून असते.

महादशा म्हणजे काही वर्षासाठी असलेला तुमच्या पत्रिकेतील अध्यक्ष. आणि त्याखालोखाल जे ९ ग्रह काही कालावधी साठी दाखविले आहेत ते त्याचे सेक्रेटरी. (अंतर्दशा ग्रह)

महादशा तुमच्या पत्रिकेचे कॅलेंडर समजा. आणि त्याखालोखाल जे ९ ग्रह काही कालावधी साठी येत असतात ते त्या कॅलेंडर चे प्रत्येक पान समजा. हि पाने जशी जशी उलटत जातात व्यक्ती बरोबर त्या त्या घटना दिसत जातात. एक निष्णात ज्योतिषी हे नक्की सांगू शकतो कि त्या कालावधी मध्ये आपल्याबरोबर कोणकोणत्या घटना घडतील कशा घडतील आणि कुठे घडतील.

व्यक्तीने जन्म घेतल्याबरोबर ह्या महादशा सुरु होतात. आणि त्या १२० वर्षापर्यंत दाखविल्या जातात.

तुम्ही ज्या नक्षत्रात जन्म घेतला आहे त्याच्या ग्रहाची महादशा हि प्रथम लिहिलेली असते नंतर त्यापुढील क्रमाने त्यात त्या त्या महादशा दाखविल्या जातात.

उदाहरण — जर व्यक्तीं अश्विनी नक्षत्रात जन्म घेतला असेल तर अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू म्हणून त्या व्यक्तीच्या पत्रिकेत केतू महादशा पासून सुरुवात होते. आणि त्या नंतर येणाऱ्या महादशा पुढे लिहिल्या जातात.

त्याचा क्रम असा असतो.

  • केतू ७ वर्षे
  • शुक्र २० वर्षे
  • रवी ६ वर्षे
  • चंद्र १० वर्षे
  • मंगळ ७ वर्षे
  • राहू १८ वर्षे
  • गुरु १६ वर्षे
  • शनी १९ वर्षे
  • बुध १७ वर्षे

उदाहरण दुसरे जर व्यक्तीचा जन्म मृगशीर्ष नक्षत्री झाला असेल तर त्याची पहिली महादशा हि मंगळाची असेल कारण ह्या नक्षत्राचा मालक हा मंगळ आहे आणि नंतर राहू , गुरु शनी बुध केतू शुक्र रवी चंद्र अशा क्रमाने त्या त्या वर्षाच्या महादशा पत्रिकेत लिहिलेल्या असतील.

सर्वात पहिली महादशा हि पूर्ण तेवढ्या वर्षाची बऱ्याच वेळा नसते तुमचा चंद्र हा ० डिग्री पासून सुरु झालेला नसतो तो मधेच कुठे तरी त्या राशीत काही डिग्री वर ३० डिग्री पर्यंत असतो तो ज्या डिग्रीवर असतो तिथपासून पुढे तुमच्या पहिल्या महादशेचे संचालन सुरु होते.

इथे भुक्त आणि भोग्य महादशा विषय हा किचकट वाटेल तो एक गणिती भाग आहे. ज्यांनी हाताने पत्रिका बनविलेल्या असतात त्यांना हा विषय उत्तम माहिती असतो. हा विषय इथे देत नाही फक्त आपल्या माहितीसाठी पहिली महादशा हि बऱ्याच वेळा पूर्ण नसते हे समजविण्याचा हे लिहिले.

आपली महादशा अणि माझे विचार

आपल्याकडे जर कॉम्पुटर पत्रिका असतील तर त्या असून काय फायदा जर त्यातल्या महादशावर आपले लक्ष नसेल. कारण हेच आपले कॅलेंडर असते. जसे आपल्या घरातील कॅलेंडर आपण भिंतीवर टांगतो आणि त्यावर रोज नजर ठेवतो बँक हॉलिडे, सण कधी आहेत पाहण्यासाठी.

तसेच हे पण आपल्याला तशीच मदत करू शकेल. प्रश्न आता असा उरला कि आपल्याला त्यात काय समजेल. नक्की हा भाग तुमचा नाही. पण मोठ्या मोठ्या महादशा सुरु असतात तेव्हा तरी त्याचे निदान आवश्यक असते.

जेव्हा आपली महादशा जी सुरु असते तो महादशा स्वामी पत्रिकेत उत्तम स्थितीत असेल तर आपल्याला ती महादशा मग ती २० वर्षाची असली तरी ती उत्तम जाते आणि जर तो महादशा स्वामी पत्रिकेत बरोबर स्थितीत नसेल तर त्यात व्यक्तीला पूर्ण त्या महादशेत त्रास होतात.

लग्नकुंडली पाहताना ज्योतिषी आपल्याला मोठे मोठे योग सांगतात किंवा वाईट योग सांगतात किंवा आपल्या पत्रिकेतील एक दोन ग्रहांची ताकद सांगतात. पण ह्या सर्व घटना महादशा आणि अंतर्दशा मध्ये ते ग्रह असतानाच होतात. त्याशिवाय ते सत्यात उतरतच नाही.

म्हणून पूर्ण पत्रिका कितीही वाचली तरी आपल्या आयुष्यात त्या त्या गोष्टी घडतच नाहीत किंवा त्या योगाचे चांगले किंवा वाईट फळ मिळतच नाही. कदाचित आपल्याला आता कळले असेल ते कधी मिळणार ह्यासाठी महादशा चेक केल्या जातात.

ह्याचे पहिले उदाहरण म्हणजे बऱ्याच वेळा लग्नाचे योग मुलांच्या पत्रिकेत पाहिले जातात पण जर महादशा तो विवाह करण्यास मान्यता देत नसेल तर गोचरीने कितीही आलेले योग हे फुकट जाणारच कि नाही. म्हणून महादशा हि प्रत्येक घटनेसाठी कारणीभूत असावीच लागते.

महादशा कितीही चांगली असली तरी त्या खाली लिहिलेल्या ग्रहांच्या अंतर्दशा सुद्धा फार मत्वाचा रोल करू शकतात आपल्या जीवनात. म्हणजे त्या महादशेत छोटे छोटे पिरिअड हे त्या महादशा स्वामी चे सेक्रेटरी समजा. ह्यात जर अंतर्दशा स्वामी उत्तम असेल तर हाच सेक्रेटरी तुमच्या कितीतरी फाईल क्लिअर करून महादशा स्वामी ची स्वाक्षरी घेऊन तो घटना फायनल करतो.

पण जेव्हा महादशा स्वामी चा अंतर्दशा स्वामी हा शत्रू असतो तेव्हा तुमच्या टार्गेट ची फाईल तशीच राहते आणि तो अंतर्दशा स्वामी तुमचे कामच करत नाही.

ह्याचे पूर्ण निदान महादशेचे एक निष्णात ज्योतिषीच करू शकतो त्यामुळे नक्की ह्यावर विश्वास ठेवून आपल्या महादशावर लक्ष ठेवा ज्या १२० वर्षाच्या असतात. पण तेव्हढा व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे मधल्या आयुष्याच्या महादशा जरी चेक केल्या वयाच्या २० ते ६० पर्यंतच्या तरी तुम्हाला आपल्या आयुष्याचा सिनेमा पाहता येईल.

विशेष नोट — आपल्या महादशा ह्या कितीही चांगल्या असल्या तरी त्या नंतरच्या क्रमाने येणाऱ्या महादशेत आधीच्या घटना तशाच घडतील असे कधीही दिसत नाही म्हणून महादशा चेक करण्यासाठी योग्य ज्योतिषाची निवड करणे आपले कर्तव्य आहे. अशा ज्योतिषाची नक्की निवड करावी जो आपल्या महादशा पाहून त्या त्या वेळेला आधीच्या महादशा ग्रहांच्या घटना ओळखू शकेल (लहानपानापासून) जर असे झाले तर नक्की पुढे येणाऱ्या महादाशेविषयी तो ५०% तरी अचूक माहिती देऊ शकेल.

पण एक विनंती आहे कि ह्या विषयात ज्योतिषाची परीक्षा घेऊ नये कारण हे मांडताना बरेच लोक चुकू सुद्धा शकतात कारण प्रत्येक व्यक्तीला त्या त्या महादाशेच्या ग्रहांसारखे वातावरण मिळणे कठीण असते घटना घडविण्यासाठी हे तितकेच खरे आहे.

ह्याचे उदाहरण जर एखाद्याला शुक्राची महादशा असेल आणि शुक्र पत्रिकेत उच्च राशीत असेल आणि इतर स्थिती सुद्धा चांगली असेल तर ह्यात ज्योतिषी खूप सुखाची महादशा समोर मांडेल पण ते ग्ल्यामर ते सुख घेण्यासाठी तुमची कॅपॅसिटी किती आहे ह्यावर सुद्धा अवलंबून आहे म्हणून भिकाऱ्यांची पत्रिका पाहतो आहे कि एकदम श्रीमंत माणसाची पत्रिका पाहतो आहे त्या त्या प्रमाणे तो शुक्र ते ते परिणाम देईल. ह्याचे भान ज्योतिषाकडे असले पाहिजे.

धन्यवाद…..!

Leave a Reply