You are currently viewing चालू महादशेत अंतर्दशा आपणास कशी जाईल? | Antardasha predict on Tara Chakra Table

चालू महादशेत अंतर्दशा आपणास कशी जाईल?

कोणत्याही व्यक्तीस त्याच्या कुंडलीत कोणती ना कोणती एक महादशा सुरु असते. आणि त्याचा जो कार्यकाळ असतो तो सुद्धा सर्वांसाठी सारखाच असतो. त्या महादशेचा क्रमांक हा जन्मनक्षत्रापासून सुरु होतो. जसे एखाद्याचा जन्म जर रेवती नक्षत्रात झाला असेल तर त्यास प्रथम बुधाची महादशा सुरु असेल आणि पुढे केतू शुक्र रवी चंद्र मंगळ राहू गुरु शनी ह्या क्रमाने पुढील महादशा सुरु असतील.
पहिली महादशा सोडली तर प्रत्येक महादशेचा अवधी सुद्धा सर्वाना सारखा असतो.

त्या महादशेत जर वरील महादशेचे पेज पाहिलेत तर त्यातील अंतर्दशा सुद्धा दाखविल्या आहेत. महादशेचे फळ हे त्या पूर्ण महादशेत कुंडली प्रमाणे काढता येते. मात्र प्रत्येक अंतर्दशा इथे कशी जाईल हे समजविण्याचा प्रयत्न साध्या गणिताने करीत आहे.

इमेज क्रमांक १ पहा


आता सध्या समजा २०२२ डिसेंबर महिना सुरु आहे. तर वरील महादशेच्या पेज मध्ये चंद्राच्या महादशेत केतू ची अंतर्दशा १४/८/२०२२ पासून ते १५/३/२०२३ पर्यंत दाखविली आहे. इथे प्रत्येक अंतर्दशा स्वामी च्या पुढे त्याचा संपलेला अवधी असतो.

हेही वाचा :- महादशा अंतर्दशा म्हणजे काय? ज्योतिष मध्ये सर्वात मोठा विषय

आता चंद्राच्या महादशेत केतू ची अंतर्दशा कशी जाईल हे पाहू.

त्यासाठी आकृती क्रमांक २ मध्ये लग्न कुंडली च्या वर प्रत्येक ग्रह हा कोणत्या नक्षत्री आहे हे समजेल. चंद्राची महादशा आणि केतू ची अंतर्दशा ह्या व्यक्तीस सुरु आहे म्हणून चंद्र आणि केतू समोरील नक्षत्र लिहून घ्या. चंद्र — रेवती आणि केतू — पुष्य नक्षत्रात आहे. हे लिहून ठेवा.

आता आकृती क्रमांक ३ वर यावे लागेल जिथे तारचक्र – नक्षत्र स्वामी चे पेज ओपन करायचे आहे.

हे चंद्र कुंडली च्या वर असेल त्यात तुमचा महादशा नक्षत्र स्वामी शोधून घ्या आणि त्यावर बोट ठेऊन केतू च्या पुष्य नक्षत्रापर्यंत मोजा. हा चार्ट प्रत्येकाचा वेगवेगळा असेल.

हे अंतर म्हणजे रेवती पासून पुष्य नक्षत्र ९ व्या ठिकाणी आहे. ९ लिहा.
आलेल्या संख्येला ९ ने भाग द्या आणि उरलेली संख्या लिहून घ्या
जसे ९/९ = उरले ०
जर तुमची आलेली संख्या २७ असेल तरी त्यास ९ ने भाग दिला तरी ० उरते
जर तुमची आलेली संख्या १८ असेल तरी त्यास ९ ने भाग दिला तरी ० उरते
जर तुमची आलेली संख्या हि १५ असेल तर त्यास ९ ने भाग दिल्यावर उरलेली संख्या हि ६ असेल
हा नियम सर्वांसाठी सारखा आहे. जर आलेली संख्या ८ पर्यंत असेल तर तीच घ्यावी कारण त्यास ९ ने भाग देता येणार नाही.

आता खरी मजा हि आपणास खाली देत आहे कि आपल्या महादशेत अंतर्दशा कशी जाईल हे आलेल्या संख्येवर अवलंबून आहे.

  • जर ९ ने भाग देऊन १ उरेल तर — हा तारा तुमचा जन्म तारा सुरु असतो. ह्या अंतर्दशेत ज्या प्रकारचे काम कराल त्या प्रकारे त्याचे फळ नक्की मिळेल. ह्यात आपण खूप बिझी असाल. पाय ठिकाणावर राहणार नाही.त्याची करणे वेगवेगळी असू शकतील. सतत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल आणि हि अंतर्दशा चांगली जाईल.
  • जर ९ ने भाग देऊन २ उरेल तर — हा तारा संपत तारा सुरु असेल म्हणून ह्यात पैशाची सर्व कर्मे करावीत चांगले रिझल्ट मिळतील. पैशाच्या संदर्भातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होण्याची हि वेळ नाकारता येत नाही.
  • जर ९ ने भाग देऊन ३ उरेल तर — हा तारा विपत तारा सुरु असेल म्हणून हा एक अशुभ काळ असेल. ह्यात कोणतेही मोठे काम करू नये.
  • जर ९ ने भाग देऊन ४ उरेल तर — हा एक क्षेम तारा असेल म्हणून हि शुभ वेळ शुभ असेल ह्यात काही आपल्या अचिव्हमेंट पूर्ण होऊ शकतील.
  • जर ९ ने भाग देऊन ५ उरेल तर — हा प्रत्यरी तारा असेल म्हणून ह्यात शत्रू पासून सावधान राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कोणत्याही शत्रू पासून आपले नुकसान होऊ शकते.
  • जर ९ ने भाग देऊन ६ उरेल तर — हा साधक तारा असेल म्हणून हा काळ साधना करण्याचा असू शकतो. आपल्या कोणत्याही नवीन कार्याची साधना तुम्ही करू शकता. नवीन कार्यसिद्धी कडे नेणारी हि वेळ नाकारता येत नाही.
  • जर ९ ने भाग देऊन ७ उरेल तर — हा एक वध तारा आहे म्हणून जरा ह्या वेळी अतिशय सांभाळून राहणे असा सल्ला देण्यात येतो. कोणत्यातरी कार्याची समाप्ती ह्यात होण्याचा संभव असतो. किंवा चालू असलेले काम थांबू शकेल. ह्यात कोणाशीही वाद घालू नये त्रास होऊ शकेल.
  • जर ९ ने भाग देऊन ८ उरेल तर — हा एक मित्र तारा असेल म्हणून हि वेळ आपणास सर्वात शुभ जाईल. नवीन कार्याची सुरुवात इथे करणे शुभ असेल. हा कालावधी आपल्यासाठी काही नवीन संधी निर्माण करेल.
  • जर ९ ने भाग देऊन ९ किंवा ० उरेल तर — हा एक अधिमैत्री तारा असेल हि वेळ अति शुभ असते. बस काम करत राहणे आणि त्याची पूर्तता करणे हे जर करत राहिले तर आपणास हा काळ उत्तम जाईल.

तर प्रत्येकाने ह्या बाबतील स्वतः चेक करून आपल्या महादशेत अंतर्दशेत फळ जाणून घ्यावे. हे आपणास समजेल अशी अशा बाळगतो.

नोट — तुमचा तारचक्र टेबल हा तुमच्या जन्माच्या वेळेचा आहे इथे जी आलेली संख्या आहे तिथपासून मोजून तो तारा फिक्स करणे हि विनंती.

धन्यवाद…..!

Leave a Reply