कुंभ राशी अक्षर- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
एका घडा चिन्हाची राशी – रहस्यात्मक राशी- शनी ची राशी- शोधक राशी- स्थिर राशी- वायू राशी- लाभ स्थानातील राशी- पुरुष राशी- अंतर्मुख राशी- फायटर राशी- ईर्शालू राशी- मानसिक स्ट्रॉन्ग राशी- गुढग्याखालील पोटऱ्याची राशी. (Aquarius in Marathi)
आधी कुंभेतल्या नक्षत्रांची ची माहिती देतो.
ह्या राशीत ३ नक्षत्र — धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा.
- जर तुमचा जन्म चंद्र कुंभ राशीत (११ नंबर बरोबर) ० ते ६:४० पर्यंत पत्रिकेत लिहिला आहे तर धनिष्ठा नक्षत्र आहे तुमचे. गण – राक्षस आणि नाडी – मध्य असेल.
- जर पत्रिकेत आपला जन्म चंद्र कुंभ राशीत (११ नंबर बरोबर) ६:४० ते २०:०० डिग्री पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर शततारका नक्षत्र आहे. गण – राक्षस आणि नाडी – आद्य असेल
- जर जन्म चंद्र कुंभ राशीत (११ नंबर बरोबर) २०:०० ते २९:५९ पर्यंत पत्रिकेत लिहिला असेल तर पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे आपले. गण – मनुष्य आणि नाडी – आद्य असेल.
ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.
नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता. सध्या कॉमन कुंभ राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
Table of Contents
कुंभ राशीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव
सामान्य व्यक्तिमत्व पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज, स्लिम, मानेकडे उंटासारखे पुढे चेहरा करून चालणारे. ह्या राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा उंच असतात. हे अत्यंत ज्ञानी, आत्मचिंतनात गढलेले, संशोधक, विरक्त, ऐहिकाची हव्यास नसलेले, बुद्धिमान, परोपकारी, व्यवहार चातुर्य, गंभीर, वैराग्य वृत्ती, नवनवीन विचारांशी जुडण्याचा स्वभाव ह्यांच्या परंपरा रूढी ला थोडा बगल देतो.
शास्त्रीय विषयांची आवड असणारे व्यक्तिमत्व, पण कधी कधी ह्यांचा आळशी स्वभाव सुद्धा पाहण्यात आला आहे. ह्या राशीचे चिन्ह मुळात कुंभ (घडा) असल्याने स्वाभाविक हे गूढ असतात.
नेहमी दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव पण त्याची जाहिरात न करणारे कुंभ राशीचे असू शकतात.
शनी ह्या राशीत मुलत्रिकोण असतो म्हणून नियम कानून माहिती असणारे किंवा माहिती जास्त मिळविण्याचा मुळात ह्यांचा स्वभाव असल्यामुळे ह्यांनी जर त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर त्रास होतो ह्यांना.
कुंभ राशीच्या व्यक्तीच्या स्वभावात एक प्रकारचा प्रौढपणा दिसतो. आणि काहीतरी मोठे करण्याचा सतत प्रयत्न असतो.
कुंभ राशीचे शिक्षण आणि करिअर
वर वर चे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात. कोणत्याही करिअर मध्ये हि राशी समय सूचक असते. त्या करिअर मध्ये कोणत्याही अडचणी ह्या सहज सोडवितात.
केमिकल , डॉक्टर, इम्पोर्ट एक्स्पोर्ट, वस्त्रे, लोकर , रेशीम, सिल्क च्या वस्तू, विजेची उपकरणे, वायुतत्वावर चालणाऱ्या गोष्टी, जहाज होड्या, मोटार , वकिली शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे, धातूंशी संबंधित व्यवसाय करणे, शिक्षकी पेशा, प्रिंसिपल, व्याख्याते घाऊक व्यापारी, रेल्वे एस टी महामंडळात मोठ्या पदावर काम करणे, ह्यांसारख्या करिअर च्या वाटा कुंभ राशीला त्यांच्या मंगळ आणि बुधावरून ठरतात.
पत्रिकेत बुध जास्त ऍक्टिव्हेट असेल तर कुंभ राशीला आपल्या कौशल्याने व्यापार करता येतो आणि गुरु चे बळ कुंभ राशीला पैसा देतो मंगळ मोठ्या पदावर काम करण्यास प्रवृत्त करतो. वरील प्रमाणे शिक्षणाच्या वाटा निवडल्यास कुंभ राशीला जास्त करिअर मध्ये त्रास होत नाही.
कुंभ राशीचे वैवाहिक जीवन
कुंभ राशींच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा , प्रॉपर्टीज , वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा ह्यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही. फक्त धावपळ होईल तर रिलेशन जपण्यासाठी. कारण जास्त प्रपंचात लक्ष देत नाहीत. तर ह्यावरच वैवाहिक जीवनाचा खांब अवलूंबून असेल कि तुम्ही आपल्या जोडीदाराला किती देता आणि ती तुम्हाला किती रिटर्न देते. ह्यात जर कुंभ राशीच्या व्यक्तींनी हिशोब न केलेला बरा नाहीतर मानसिक त्रास होतो ह्यांना.पण केव्हा केव्हा कुंभ राशीच्या स्वतःचा अरसिक पणा आड आल्यामुळे होत असावा.
कुंभ राशीच्या पुरुषांना सल्ला — जर पत्रिकेत जरा जरी शुक्र बिघडला असेल आणि जर तुमचे वय ३० ते ५० असेल तर कुंभ राशीच्या पुरुषांना जास्तीत जास्त बाहेरख्याली संबंधात अडकण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि नंतर त्यांना त्याच वेळी किंवा वयाच्या ५० नंतर आरोग्याचे खूप त्रास होतात.
कुंभेच्या वैवाहिक जीवनासाठी कुंभ राशी (नाडी वेगळी असावी) , तुला राशी उत्तम विवाह करताना फक्त ह्यांनी समोरचा जोडीदार अति रसिक नसावा कदाचित त्याचा मूड खराब होईल विवाह नंतर लगेच.
रोग आणि कुंभ राशी
हि वायू राशी असल्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना काही वायू विकार होण्याचे त्रास होण्याची शक्यता असते. वाताचा त्रास, नसा गोठून रक्तप्रवाह खंडित होणे, काहींना पोटऱ्या दुखणे असे त्रास होण्याचा संभव असतो.
कुंभ राशीच्या व्यक्तींना आजार हा वयाच्या ३६ नंतर जास्त पहिला गेला आहे. आणि तो कायम स्वरूपात सुद्धा असतो. त्यामुळे ३६ नंतर ह्यांनी आरोग्याची अति काळजी घेणे महत्वाचे असेल. माझ्या अभ्यासाने कुंभ राशीकडे पैसा जमा होत असल्यास एखादा आजार बळविण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ह्यांनी अशा आजारी व्यक्तींना मदत करावी जो आजार आपल्याला सतावतो आहे.
कुंभ राशीचे प्रेम
बुद्धिमत्ता असल्येल्या व्यक्तींकडे जास्त आकर्षित होणारी कुंभ राशी हि प्रेमात पडताना हा व्यवहार जरूर करेल कि आपल्या तोलामोलाच्या जोडीदाराबरोबर प्रेमात येतील. पण तसे दिसले नाही तर जास्तीत जास्त ह्यांचे आकर्षण कमी होऊन फार वेळा ह्या राशींच्या व्यक्तींना प्रेमात सफल होणे जमले नसेल. प्रेमात ह्या व्यक्ती थोड्या आपल्याला फायदेशीर काय आहे अशा गोष्टींकडे झुकल्या जातात.
कुंभ राशी आणि शततारका नक्षत्र असेल तर प्रेम करताना वरील गोष्टींकडे न पाहता आपल्या खालच्या दर्जाच्या जातींच्या व्यक्तींकडे झुकाव असतो प्रेमात पडण्याचा. ह्यात सतर्क राहावे त्यात कुंभ राशी नेहमी नुकसानदायक ठरू शकतील.
बऱ्याच वेळा प्रेम आणि विवाह ह्यात बरेच अंतर दिसेल जर एखाद्या व्यक्तीने तोच जोडीदार विवाहासाठी निवडला तर.
कुंभ राशीच्या ५ ते २० वर्षातील मुलांच्या पालकांसाठी
आपल्या घरात कुंभ राशीची मुले ह्या वयातील असतील तर शिक्षणात तुम्हाला त्यांचा जास्त त्रास जाणविणार नाही. त्यांच्या जबाबदारीने ते आपले शिक्षण पार पाडत असतील फक्त शततारका आणि धनिष्ठा नक्षत्र असेल तर थोडा त्रास होईल.
कुंभ राशीची मुले ह्या वयाच्या १२ नंतर तुमच्या घरात काय विषय आहेत ह्यावर त्याचे लक्ष कमी असते आणि स्वतःच्या टार्गेटवर हि मुले पुढे जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून ज्यांना जास्त डिस्टर्ब् न करता तसे करू द्यावे आणि एकदा ह्यांनी काही ठरविले तर ते माघार घेत नाहीत म्हणून फक्त बघण्या पलीकडे आपल्या हातात काही नाही. एक संशोधन करण्याची सतत प्रवृत्ती तुम्हाला ह्या वयात दिसली तर तुम्ही समजावे कि हीच मुले पुढे जाण्यास पात्र आहेत.
कुंभ राशी + ६० च्या वृद्धांसाठी
ह्या वयात आलेल्या कुंभ राशीचा एक रुबाब दिसतो समाजाला. आणि भीती सुद्धा असते तशी. पण आरोग्याचे त्रास आणि काही नाती हि दूर झालेली नक्की दिसतील ह्या व्यक्तींना. सल्ला असा देण्यात येतो कि तुम्ही ह्या वयात असताना कुणाला तरी जवळ असण्याचा हट्ट करावा.
कारण कुंभ राशीच्या ब्लड रिलेशन मधील सर्व व्यक्ती ह्या आपल्या आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी होतात आणि नंतर हि राशी एकटी जीवन जगताना पहिली गेली आहे.
आजारांच्या बाबतीत वरील काही आजार जर ६० च्या आधी झाले असतील तर निदान २० वर्षे तरी आपण त्यावर मात करत फाईट कराल. म्हणून कोणत्याही अशा इन्शुरन्स पॉलिसिज वयाच्या ३६ नंतर तरी सुरु ठेवाव्यात हा सल्ला.
जर काहीच ह्यामध्ये दिसत नसेल तर मात्र ह्यांना एखादा निद्रेचा त्रास नक्की जाणवेल. चिंता करू नये शनी चे नियम आणि भक्ती ह्यात आपल्याला जरूर मदत करेल. अजून एक कि ह्यांना ह्या वयात कधीही पैशा बद्दल त्रास झालेले दिसले नाहीत. प्रॉपर्टीज, जमविलेला पैसा हे स्वतःसाठी वापरून पूर्ण सुखी होण्याकडे ह्या राशीचा कल असेल. कारण कुंभ राशींच्या मुलांचे करिअर कसेही होतेच.
फक्त आजारांबद्दल योग्य ती काळजी घ्यावी पुढे बस.
कुंभ राशी आणि शुभाशुभ
- शुभ अंक : ४ आणि ८ त्याखालोखाल ५,६
- सम अंक : ३,७ (नफा नुकसान काहीच नाही)
- अशुभ अंक : १,२,९
- मित्र राशी : वृषभ मिथुन कन्या तुला मकर
- शुभ दिशा : पश्चिम
- अशुभ दिशा : पूर्व
- शत्रू राशी : मेष, सिंह , वृश्चिक
- भाग्यशाली रंग : सफेद , काळा, निळा, हिरवा (स्वतःजवळ सफेद रंगाचा रुमाल अव्यश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत)
- शुभ दिवस : शनिवार
- इष्ट देव : विष्णू , शिव, शनी
- शुभ मंत्र : ॐ शं शनेच्छराय नमः जीवनात एकदा तरी २३००० रोज १०८ संख्येने मंत्र जप केल्याने शुभत्व प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्र केल्याने सुद्धा कुंभ राशीला त्रास कमी होतो.
सध्या एव्हढे पुरे…
विशेष नोट — सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कॉमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व कुम्भ राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.
शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.
आणि महत्वाचे — काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.
धन्यवाद…..!