You are currently viewing गुरु राशी परिवर्तन २०२१ : मीन राशी / मीन लग्न

गुरु राशी परिवर्तन २०२१ मीन राशी / मीन लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/

गुरु राशी परिवर्तन २०२१ मीन राशी मीन लग्न

वरील कुंडली हि मीन राशीची चंद्र कुंडली आहे आणि मीन राशीची लग्न कुंडली आहे.

आपली चंद्र कुंडली मीन राशी किंवा लग्न कुंडली मीन असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.

मीन राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा बाराव्या स्थानी येत आहे. हे स्थान व्यय स्थान आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या व्यय स्थानी सुद्धा चांगले फळ देईल.

वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या कर्म स्थानी आहे. जेव्हा कर्म स्थानाचा मालक गुरु हा बाराव्या स्थानी भ्रमण करेल तेव्हा आपल्या कर्माबद्दलच्या काही गोष्टींचा व्यय होईल. करिअर मध्ये काहीजणांना बदल दिसेल. करिअर हे जन्म स्थळापासून किंवा आपण जिथून शिक्षण केले असेल त्यातून दूर असेल तर त्यात चांगले परिणाम दिसतील. ज्यांना दूर जाऊन बाहेर करिअर किंवा शिक्षण करायचे असेल त्यांना हि उत्तम संधी म्हणावी लागेल.

गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या प्रथम स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा मागील व्यय स्थानी भ्रमण करणार आहे तेव्हा स्वतःचे प्रेसेंटेशन आपण कुठेतरी दूर जाऊन करावे असा सल्ला दिला जातो. किंवा ज्यांना बाहेर जाण्याचे योग असतील त्यांना हि उत्तम संधी आहे. जे जे मीन राशीतील व्यक्ती आपल्या जन्मस्थळात आहेत अशाना शारीरिक त्रास आधीपासून चा असेल त्यांना थोडा त्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागेल पण त्यातून आपण बाहेर याल नक्की. आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर प्रगती दिसेल. एखादे गुरु चे ग्रंथ
वाचन करण्याचा सल्ला दिला जातो मीन लग्न किंवा राशीवाल्याना. समाधान मिळेल.

हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : कुंभ राशी / कुंभ लग्न

गुरु ची ७ वी दृष्टी

गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान जॉब, आपण देत असलेल्या सर्व सर्विसेस, कर्ज, कॉम्पिटिशन, शत्रू ह्याचे आहे गुरु ची दृष्टी ह्यात आपल्याला चांगला सपोर्ट करेल. वरील जे जे विषय आपल्याकडे १३ एप्रिल पर्यंत येतील त्यात आपण समाधानी असाल.

गुरु ची ५ वी दृष्टी

गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान चतुर्थ स्थान म्हणजे आपल्या सर्व सुखाचे, मातृ चे , प्रॉपर्टीज चे आहे. ह्या विषयी सुद्धा आपणास समाधान मिळेल. नवीन घर खरेदी करू शकाल. पण ते आपल्या आत्ताच्या राहत असलेल्या शहरापासून दूर घेण्याचा प्रयत्न करावा. तर त्यात चांगले अनुभव येतील.

गुरु ची ९ वी दृष्टी

गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या पत्रिकेतील कष्ठाचे आहे आणि गुरु इथे जर दृष्टी टाकत असेल बाराव्या स्थानापासून तर हा एक राजयोग सुद्धा होईल. आपणास मागील गुंतवणुकीपासून लाभ अचानक दिसतील.

पण ते पैसे स्वतःकडे टिकणार नाहीत लगेच निघून सुद्धा जातील ह्याचे कष्ट दिसेल. छोट्या मोठ्या अचानक दुर्घटनेपासून आपले रक्षण गुरु करील त्यात काळजी नाही. पण काही ना काही सतत कष्ठीत गोष्टी आपल्यासमोर येत राहतील तेव्हा अध्यात्माचा सपोर्ट आपणास तारू शकेल. गुरु ची साधना करण्याचा सल्ला दिला जातो.

काळजीचे काही मुद्दे

मीन लग्न आणि मीन राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.

गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या वैवाहिक सुखाचे आणि व्यापारात पार्टनर चे स्थान आहे. रोज मिळणार पैसा सुद्धा इथूनच मिळतो. त्यामुळे जर हे विषय आधीपासून आपल्याकडे असतील तर त्यात त्रास असतील. वैवाहिक सुखात जोडीदाराशी जमवून घ्यावया ह्या कालावधीत.

जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपले लाभ स्थान आहे म्हणून ह्या काळात जेव्हढे लाभ होतील ते डायरेक्ट आपणास लाभणार नाहीत किंवा डायरेक्ट मिळाले तरी ते लगेच निघून जातील समाज पैसा मिळाला तर तो राहणार नाही असे समजावे.

जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान आपल्या ज्ञानाचे, मुलाबाळांचे, आपल्या विद्येचे आहे. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लगेल. पण जर शिकण्यासाठी बाहेर जात असाल तर काही प्रॉब्लेम्स नाही . आपल्याकडे असलेले गुण कला दाखविण्यासाठी आपणास जास्त मेहनत करावी लागेल. मुलाबाळांच्या अभ्यासाकडे इथे विशेष लक्ष द्या.

गुरु चे नक्षत्रीय भ्रमण

गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण

२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक धन/कुटुंब स्थान आणि दुसरे भाग्य स्थान. त्यामुळे ह्या कालावधीत आपल्या भाग्यासाठी पैसा खर्च होऊ शकेल. नवीन काहीतरी निर्माण करण्याचे उद्योग आपल्याकडे असतील.

५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे भाग्य स्थानातील जिथे ८ लिहिले आहे तेथे मंगळ भ्रमण करताना गुरु ह्या नक्षत्राचे फळ हे चांगले देईल. दूरच्या देशांतर्गत व्यवहारात आपला फायदा होईल. नवीन भाग्योदयाच्या गोष्टीत रस घ्याल. पण त्यात पैसा नक्की खर्च होईल.

गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण

गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. मीन लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानातून जिथे २ लिहिले आहे तेथून जात आहे. म्हणून ह्या स्थानाचे फळ उत्तम दिसेल मात्र वेगवेगळ्या शहरात जर आपण भटकत असाल. लहान भावंडांची विशेष काळजी घ्यावी लागेल त्यांना काही त्रास असेल तर आपली धावपळ होईल.

गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण

२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी बाराव्या स्थानाचे फळ देत आहे. २१ नोव्हेंबर २०२१ पासून ते २ मार्च पर्यंत जे जे कराल त्यातले काही वजा होताना नक्की दिसेल. काळजी घ्यावी. प्रयत्न सुरु ठेवावा हा काळ संपण्याची वाट पाहावी लगेच काही वजा करू नये किंवा सोडू नये जरी त्रास असला तरी. विद्यार्थ्यांना हि वेळ त्रासाची असेल. ह्याच वेळी आपल्या परीक्षा असतील तर मेहनत जास्त घ्या. स्पर्धा परीक्षा असतील तर त्यात उत्तम परिणाम दिसतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply