मूलांक आणि भाग्यांकाचा मेळ आपल्याकडे आहे का? (Compatibility of Mulank & Bhagyank)
वरील ग्रह अंक चार्ट मध्ये त्या त्या अंकाचे मित्र शत्रू आणि सम अंक दिले आहेत. ह्यावरून जन्म तारखेत आपल्या मूलांक आणि भाग्यांक मिळून जे जे अंक तयार होतात त्याचा मेळ जर बसत असेल तर जीवन हे अगदी स्मूथ होते. नाहीतर जीवनात भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागतेच.
हेही वाचा :- अंकांचे शत्रू, मित्र आणि विश्लेषण
कसे पाहावे?
समजा आपला मूलांक १ असेल आणि त्याचा भाग्यांक हा १ चे मित्र ९,२,५ ( A ) मध्ये येत असेल तर समजावे त्या व्यक्तीला जीवनात खूप कमी इशू असतील. १ आणि ९ मिळून त्याचे करिअर पैसा प्रसिद्धी तो मिळवेल. मूलांक १ आणि भाग्यांक २ त्याला सर्व सुखसुविधा जसे एखाद्या राजा राणी ला मिळतात त्या सर्व मिळत राहतील. आणि मूलांक १ आणि भाग्यांक ५ असेल तर जीवनात आनंद असेल जरी समस्या आल्या तरी तो आपल्या ५ नंबरच्या बुद्धीचा वापर करून दूर करण्याचा प्रयत्न कारेल.
१ मूलांक ला ३,६,१ हे दुसऱ्या दर्जा मध्ये येतात म्हणून १ आणि भाग्यांक ३ वाल्या व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग जास्त करून आपल्या समस्यांना तोंड देतील. १ आणि ६ अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात ग्लॅमर (शुक्र ६) चे भरपूर उपयोग करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील आणि १ आणि १ वाले खूप अग्रेसिव्ह होऊन आपल्या जीवनात त्यांचा लढा सतत पॉसिटीव्ह करण्याचा प्रयत्न करतील.
पण मूलांक १ वाल्या व्यक्तींना समजा त्यांची जन्म तारखेची बेरीज करता ८ मिळाला तर मात्र हा शनी चा अंक मूलांक २१ वाल्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट कष्ट आणि कष्ट निर्माण करीत राहील. अशा व्यक्तींना सुद्धा सक्सेस मिळेल पण खूप काही सोसावे लागल्यानंतर.
मूलांक १ साठी ४ आणि ७ भाग्यांक आले तर कधी सुख कधी दुःख काढून जीवनाचा आनंद घेताना दिसतील. ह्यात १ बरोबर भाग्यांक जर ४ असेल आणि त्या व्यक्ती एकमेकांपासून जर लांब असतील तर फायदा होईल नाहीतर नुकसान होण्याचे भरपूर वाव असले एकमेकांपासून. १ मूलांक ७ भाग्यांक असताना सुद्धा मिश्रित फळ समजावे.
पुढील सर्व मूलांक बरोबर सुद्धा तसेच नियम आहेत जर मूलांक चे मित्र अंक हे जर तुमचे भाग्यांक असतील तर उत्तम. सम असतील तरी चालतील. पण एकदा का तुमचा मूलांक आणि भाग्यांक हा मेळ खात नसेल तर तुम्हाला डेस्टिनी पर्यंत पोहोचविण्यासाठी हेच ड्राइव्हर कंडक्टर मदत करीत नसतात जाणार त्यांचे आपसात पटत नाही. आणि तिथेच व्यक्ती अडकत अडकत पुढे जात असतो.
ह्यासाठीच ह्या दोघांना चालेल असा एक अंक शोधण्याचा एक नूमरॉलॉजिस्ट मदत करीत असतो.
दिलेले जे मूलांक भाग्यांक आहेत त्यात आपण बसत असाल तर ह्याचा नक्की विचार व्हावा.
मूलांक | भाग्यांक |
1 | 8 |
8 | 1 |
3 | 6 |
6 | 3 |
2 | 8 |
8 | 2 |
4 | 2 |
2 | 4 |
4 | 9 |
9 | 4 |
9 | 7 |
7 | 9 |
- मूलांक म्हणजे — कोणत्याही महिन्याच्या तारखेची बेरीज जी तुमची आहे — समजा १९ = १+९ = १० = १ मूलांक
- भाग्यांक म्हणजे — तुमच्या सर्व जन्म तारखेची बेरीज करून आलेला सिंगल अंक — समजा २२-८-२०२१ तर २+२+८+२+०+२+१=१७= पुन्हा करा १+७ =८ हा भाग्यांक आहे.
धन्यवाद…..!