You are currently viewing उपच्छाया – छायाकल्प चंद्र ग्रहण: दिनांक ३० नोव्हेंबर २०२०

काय असते चंद्र ग्रहण

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रांगेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य च्या मधे पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी ची चंद्रावर पूर्ण किंवा आंशिक छाया पडते. ह्याने चंद्र बिंब काळे दिसते ह्या प्रोसेस ला चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात.

ग्रहण लागण्याअगोदर चंद्र पृथ्वीच्या उपच्छायेत प्रवेश करतो त्याला इंग्रजी मधे (Penumbra) असे म्हणतात. नंतर हळू हळू चंद्र पृथ्वीच्या वास्तविक छायेत पदार्पण करतो ह्याला भुभा (umbra) म्हणतात. ह्यात वास्तविक चंद्रग्रहण होते.

पण बऱ्याच वेळा चंद्र ह्या भुभा मधे प्रवेश करतच नाही. आणि ग्रहण काळ संपतो ह्या प्रोसेस ला उपच्छाया चंद्रग्रहण म्हणतात. ह्यात चंद्र अगदी नेहमी प्रमाणे दिसतो. अगदी सुक्ष्म पणे पाहिले तरच त्याच्यावर काही सावली दिसते नाही तर तो ह्यात स्पष्टच दिसतो.

चन्द्र ग्रहण (Chandra Grahan ३० नोव्हेंबर २०२०) केव्हा

ह्या दिवशी चंद्र ऋषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असेल.

  • ग्रहण प्रारंभ: १ वाजून ४ मिनिटे
  • ग्रहण मध्यकाल: दुपारी ३ वरून १३ मिनिटे.
  • ग्रहण समाप्त: ५ वाजून २२ मिनिटे.

सुतक आणि नियम

उपच्छाया चंद्र ग्रहणात सुतक काळ मानला जात नाही तसेही हे चंद्रग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे कोणतेही ग्रहणाचे नियम सुतक पाळू नयेत. ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि अमेरिकेच्या काही प्रांतात हे दिसून येईल.

सोमवारी कार्तिकी पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेला केली जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते. तसेच कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये, धार्मिक पथ्ये किंवा अन्य पथ्ये ह्यात ग्रहण काळातील नियम नाहीत.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    Best information 👍

Leave a Reply