You are currently viewing अष्टकवर्ग ग्रहांच्या कक्षा आणि ग्रहांचे गोचर म्हणजे काय?

अष्टकवर्ग ग्रहांच्या कक्षा आणि ग्रहांचे गोचर म्हणजे काय? | ALL ABOUT GOCHAR KAKSHA

कोणताही ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असताना तो तेथे ३० डिग्री पर्यंत असतो म्हणजे त्यास १२ राशी पूर्ण करण्यास ३६० डिग्री लागतात. जेव्हा एक ग्रह कोणत्यातरी राशीतून जात असतो तेव्हा तो ८ प्रकारच्या कक्षेतून जात असतो.

त्या कक्षा खालील प्रमाणे आहेत.

  • शनी –० डिग्री ते ३ डिग्री ४५ मिनिट पर्यंत शनी ची पहिली कक्षा असते.
  • गुरु –३ डिग्री ४५ मिनिट ते ७ डिग्री ३० मिनिट पर्यंत गुरु ची दुसरी कक्षा असते
  • मंगळ — ७ डिग्री ३० मिनिट ते ११ डिग्री १५ मिनिट पर्यंत मंगळाची तिसरी कक्षा असते.
  • सूर्य — ११ डिग्री १५ मिनिट ते १५ डिग्री पर्यंत सूर्याची चौथी कक्षा असते
  • शुक्र — १५ डिग्री ते १८ डिग्री ४५ मिनिट पर्यंत शुक्राची पाचवी कक्षा असते.
  • बुध — १८ डिग्री ४५ मिनिट ते २२ डिग्री ३० मिनिट पर्यंत बुधाची सहावी कक्षा असते.
  • चंद्र — २२ डिग्री ३० मिनिट ते २६ डिग्री १५ मिनिट पर्यंत चंद्राची सातवी कक्षा असते.
  • आणि सर्वात शेवटी तो एखादा ग्रह हा लग्नाच्या कक्षेत येतो. आणि तेथे त्याच्या ३० डिग्री संपतात आणि तो दुसऱ्या राशीत जातो.
  • लग्न – २६ डिग्री १५ मिनिट ते ३० डिग्री पर्यंत तो लग्नाच्या ८ व्या डिग्रीत असतो.

असे करता करता एखादा ग्रह हा प्रत्येक राशीतून आणि त्या राशीच्या प्रत्येक कक्षेतून जात असतो जेव्हा तो १२ राशीतून फिरत असतो त्या प्रोसेस ला त्या ग्रहाचे गोचर असे म्हणतात.

हेही वाचा :- कमी मेहनत आणि जास्त फायदा I समाधानी करिअर ची निवड

आपल्या कुंडलीत जे ग्रह फिक्स असतात ते आपल्या जन्म वेळेचे ग्रह असतात. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ते जे ९ ग्रह असतात ते त्या वेळेला कोणत्या राशीत आहेत कोणत्या नक्षत्रात आहेत कोणत्या भावात आहेत आणि कोणत्या डिग्रीवर असताना आपला जन्म झाला हे दाखवितात. त्या वेळी त्याचा स्नॅप शॉर्ट जो असतो तो आपली कुंडली.

मात्र ते आपल्या जन्मानंतर सुद्धा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. आपल्या पत्रिकेतून ते कोणत्या ना कोणत्या राशीतून आणि भावातून आणि कक्षेतून जात असतात त्यास गोचर असे म्हणतात.

आणि हा प्रकार त्या व्यक्तीचे भविष्य ओळखण्यास मदत करतो. फक्त गोचर पाहून एखादा ग्रह हा आपल्या ज्या भावात येतो आहे हे सांगून त्या गोचरीचे परिणाम सर्व ज्योतिषी सांगतात. पण काही वेळा असे पाहण्यात आले कि ते सर्व सर्वांसाठी असते.

जर ते चंद्र कुंडलीतून पाहत असतील तर ते प्रत्येक राशी साठी असते. आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होईल हे ठरविले जाते.
जर ते लग्न कुंडलीतून पाहत असतील तर ते आपल्या शरीरावर आणि ऍक्टिव्हिटीवर काय परिणाम होईल हे अनुमान करतात.

  • शनी एका राशीत साधारण ३० महिने भ्रमण करतो
  • गुरु एका राशीत साधारण १२/१३ महिने भ्रमण करतो.
  • मंगळ एका राशीत साधारण ४५ दिवस भ्रमण करतो.
  • रवी एका राशीत साधारण ३० दिवस भ्रमण करतो.
  • शुक्र एका राशीत साधारण २४/२५ दिवस भ्रमण करतो.
  • बुध एका राशीत साधारण २८/३० दिवस भ्रमण करतो.
  • चंद्र एका राशीत २.२५ दिवस भ्रमण करतो.
  • लग्न हे फक्त २ तासाचे असते त्यास ३० डिग्री पूर्ण करण्यास २ तास लागतात.

वर दिलेले जे भ्रमण आहे ते साधारण आहे जर एखादा ग्रह वक्री असेल तर त्यास जास्त दिवस लागू शकतात त्या राशीतून भ्रमण करताना

पण जर शनी सारखा ग्रह जर २.५ वर्षे एका राशीत राहतो आणि गुरु सारखा ग्रह हा एका राशीत १२/१३ महिने राहतो तर मग आलेले गोचरीचे भविष्य हे केव्हा फलद्रुप होईल त्या गोचरीत हे अष्टकवर्गाची मदत घेतल्याने कळते. त्यात आधी भिन्नाष्टक वर्ग आणि प्रस्तारक वर्ग बनविले जातात. .

पुढील भागात भिन्नाष्टक आणि प्रस्तराक चा खुलासा होईल.

धन्यवाद…..!

Leave a Reply