You are currently viewing अष्टकवर्गाने दिवसाचे कोणते तास आपल्यासाठी लकी?

अष्टकवर्गाने दिवसाचे कोणते तास आपल्यासाठी लकी?– BY ASTHAKVARG YOUR LUCKY HOURS IN A DAY

आपल्याला जर उत्सुकता असेल कि दिवसातील असा कोणता प्रहर माझ्यासाठी फार उत्तम असेल. सकाळी दुपारी कि संध्याकाळी हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला अष्टकवर्ग कुंडली लेख आपल्या कामी येऊ शकेल.

अष्टकवर्गाने दिवसाचे कोणते तास आपल्यासाठी लकी

वरील कुंडली हि सूर्याची भिन्नाष्टक कुंडली आहे. आपल्याकडे हि कॉम्पुटर कुंडली मध्ये असेलच. त्यात सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि लग्न असे मिळून एकाच पानावर ८ कुंडल्या वेगवेगळ्या भिन्नाष्टक वर्गाच्या असतील त्यातील पहिली कुंडली हि सूर्य भिन्नाष्टक वर्गाची असते. जी खाली दिल्याप्रमाणे असेल. मी ज्यांना ज्यांना पीडीएफ रिपोर्ट दिला आहे त्या सर्वांकडे ह्या कुंडल्या असतीलच. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी कोणत्याही फ्री कुंडली सॉफ्टवेअर ची मदत घेऊ शकता

सूर्याच्या भिन्नाष्टक वर्ग कुंडलीत लग्न स्थान पासून ४ थ्या स्थानापर्यंत दिवसाचा पहिला एक त्रितीयांश म्हणजे सकाळी ७ ते दुपारी १२ किंवा १ वाजेपर्यंत समजावे, — नंतर ५ व्या स्थानापासून ८ व्या स्थानापर्यंत १२ ते २:३० किंवा ३ पर्यंत ची वेळ असेल, — नंतर ९ व्या स्थानापासून ते १२ व्या स्थाना पर्यंत ३ पासून ६:३० असे समजावे सूर्यास्त होईपर्यंत.

हेही वाचा :- कमी मेहनत आणि जास्त फायदा I समाधानी करिअर ची निवड

३० दिवसासाठी एका राशीत सूर्य असतो नंतर तो दुसऱ्या राशीत जातो तुमच्या कुंडली प्रत्येक स्थानात जेव्हा जेव्हा सूर्य जातो तेव्हा तो त्या स्थानात येऊन किती गुण देतो हे गोल गोल केलेल्या आकड्यात दाखविले आहेत.
आता ह्या कुंडलीत खालील प्रमाणे पाहू.

वरील कुंडलीत सूर्याच्या भिन्नाष्ठक वर्ग कुंडलीत लग्न द्वितीय स्थान तिसरे स्थान आणि कुंडलीचे चौथे स्थान ह्यात क्रमाने
२+५+५+३= एकूण गुण १५ येतात
पंचम स्थानापासून पुढील चार घरे ५+५+२+४ = १६ येतात
नंतर ९ व्या स्थानापासून पुढील चार घरे ३+३+७+४ = एकूण १७ गुण येत आहेत

म्हणजे दुपारी ३ ते सूर्यास्तापर्यंत ह्या कुंडलीत ९ व्या स्थानापासून पुढील ४ घरांचे एकूण गुण हे १७ सर्वात जास्त गुण मिळत असल्यामुळे कोणतेहि काम केले तर त्यात यश मिळेल. हि सर्व कामे हि त्याच्या ऊर्जेशी आणि सूर्याच्या गुणधर्माशी कनेक्टेड असावी जसे प्रमोशन बद्दल बॉस बरोबर बोलणे, करिअर मधील मोठे डिसिजन घेणे वगैरे. आरोग्याबद्दल काही निर्णय घेणे. राजकारणाशी किंवा सरकारी कामासाठी सुद्धा जी जी कामे असतील त्यात वरील फॉर्मुला एकदा काढून फिक्स करून घ्या. त्याचे परिणाम आपल्याला उत्तम मिळतील ह्यात शंका नाही.

हे आपल्यासाठी आयुष्यभराचे असेल. त्यात कधीही बदल होणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

धन्यवाद…..!

Leave a Reply