You are currently viewing कमी मेहनत आणि जास्त फायदा I समाधानी करिअर ची निवड

अष्टक वर्गाचा खेळ (Game of Ashtakvarga)

ज्योतिष शास्त्रात अष्टक वर्ग पाहण्याची पद्धती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पण सध्या बरेच जण ह्या पद्धतीकडे दुर्लक्षित झालेले दिसतात. त्याचे कारण गणिती भाग. कोणत्या ७ ग्रहांनी आणि लग्न लॉर्ड ने त्या हाऊस मध्ये बसून किती किती बिंदू दिले ह्याचा अभ्यास म्हणजे अष्टकवर्ग. तो गणिती भाग मी इथे आपल्याला न देता डायरेक्ट एक सामान्य व्यक्ती ज्याच्याकडे कॉम्पुटर ची कुंडली असेल किंवा मी माझ्या सर्व क्लाइंट्स ला जी २३/२४ पेज चे पीडीएफ कुंडली देतो त्यात नक्की अष्टकवर्गाचे दोन पाने असतातच.
आता जे खाली इमेज दिले आहे ते ओपन करून आपल्या अष्टक वर्गाचा खेळ जाणून घ्या. फक्त वरील विषयासाठी इथे काही त्यावर प्रकाश टाकत आहे. ज्याने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला नसेल त्याला सुद्धा स्वतः बद्दल बरेच काही कळेल सहज.

सर्वाष्टक वर्ग

भिन्नाष्टक वर्ग कुंडली म्हणून एक पेज आपल्या कॉम्पुटर च्या पत्रिकेमध्ये असते. त्यात सर्वाष्टकवर्ग कुंडली म्हणून सर्वात शेवटी एक कुंडली असते. जिथे गोल गोल केलेले काही नंबर्स प्रत्येक हाउस मध्ये दिले आहेत. जेव्हा जेव्हा प्रत्येक ग्रह त्या त्या राशीतून जातात तेव्हा सर्वानी मिळून बिंदू (मार्क्स दिलेले असतात) ह्याचा अभ्यास कसा आहे ते तुम्ही सध्या करू नका.

आपण फक्त हे पहा कि कोणत्या हाउस मध्ये आपल्याला सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत.

वरील कुंडलीत ३ ऱ्या स्थानात सर्वात जास्त मार्क्स दिसत आहे ३७. आता त्या स्थानावर बोट ठेऊन त्या स्थानापासून ३ घर पुढे जा.
म्हणजे जिथे ८ लिहिले आहे (वृश्चिक राशीचे घर – कुंडलीचे ५ वे घर) तिथे २४ मार्क्स दिसत आहे.

ह्या व्यक्तीने जर त्याच्या आयुष्यात जर ५ व्या स्थानापासून आपले कार्य केले तर त्याला कमी मेहनत करून त्या केलेल्या मेहनती पेक्षा जास्त फळ मिळेल. म्हणजेच कमी मेहनतीत जास्त प्रॉफिट मिळेल. कारण तो ८ नंबर च्या ५ व्या घराला आपल्या प्रेसेंटेशन चे स्थान ऍक्टिव्ह करेल आणि ५ व्या स्थानापासून ११ वे स्थान हे तिसरे स्थान म्हणजे जिथे 37 मार्क्स आहेत त्याचे लाभ स्थान होईल.

आता ५ व्या घरापासून काय विचार केला जातो ते पाहू..

  • ५ व्या घराची ऍक्टिव्हीटी म्हणजे कधीच जॉब न करणे कारण ते जॉब च्या ६ व्या घरापासून १२ वे स्थान आहे.
  • ५ वे घर कुंडलीचे ज्ञानाचे असते तुमच्या IQ लेव्हल चे.
  • ५ वे घर कन्सल्टिंग चे आहे. म्हणजे सल्ला देण्याचे काम

अजून ५ व्या घरावरून प्रेम देणे घेणे अफेअर्स संतान सुख मागील जन्म सुद्धा पाहतात पण हा विषय इथे नाही.

वरील कुंडलीत जर ह्या व्यक्तीने कन्सल्टिंग चा व्यवसाय केला जॉब न करता किंवा करून तर त्याला त्यात जास्त समाधान मिळेल आणि कमी मेहनतीत जास्त पैसा सुद्धा.

कोणत्या स्थानावरून आपल्याला काय काय फिल्ड्स करायच्या आहेत हे कदाचित लगेच कळणार नाही त्या एक एक फिल्ड्स मी खाली देतो ज्या बेसिक असतील. पण योग्य ज्योतिषाचा सल्ला नक्की ह्यात आपल्याला मदत करेल.

  • वरील सूत्रानुसार जर प्रथम स्थानावरून कार्य करायचे असेल तर सेल्फ डेव्हलपमेंट चे सर्व कार्य
  • दुसऱ्या स्थानापासून बँकिंग जिथे जिथे पैशाचे व्यवहार किंवा कुटुंबातील एखादा व्यवसाय चे कार्य
  • तिसऱ्या स्थानातून मार्केटिंग, कॉम्युनिकेशन, ट्रॅव्हल्स चे सर्व करिअर
  • चौथ्या स्थानापासून प्रॉपर्टीज, शेती वगैरे
  • पाचव्या स्थानावरून कन्सल्टिंग
  • सहाव्या स्थानावरून जॉब.
  • सातव्या स्थानावरून रोज मिळणारा पैसा असा व्यापार
  • आठव्या स्थानावरून ज्योतिष तंत्र मंत्र किंवा इन्शुरन्स
  • नवव्या स्थानावरून धार्मिक गोष्टींच्या बद्दल ची कामे किंवा ट्रॅव्हल्स
  • दहाव्या स्थानावरून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ची सर्व करिअर्स
  • अकराव्या स्थानावरून सोशिअल ऍक्टिव्हिटीज
  • बाराव्या स्थानावरून विदेश संदर्भातील सर्व करिअर्स

धन्यवाद…..!

Leave a Reply