You are currently viewing पाशांकुश / पापांकुशा एकादशी : २७ ऑक्टोबर २०२०

मनुष्य जीवन जगत असतानाच्या त्याच्या हातून पूर्ण आयुष्यात काही वेळा जाणते पणी किंवा न जाणते पणाने चुका/पापे होत असतात. अशा सर्व चुका पापांना इथेच प्रायश्चित करण्याचे व्रत म्हणजे पाशांकुश किंवा पापांकुशा एकादशी.

हे व्रत केल्याने आयुष्यात जी जी पापे मनुष्य करतो त्याचा क्षय होऊन मनुष्य देह सोडल्यानंतर वैकुंठात निर्मळ होऊन जातो.

पाशांकुश एकादशी कथा

श्री कृष्णाने युधिष्ठीर ला सांगितल्याप्रमाणे फार पूर्वी विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा मनुष्य राहत होता. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात हिंसा, छळ कपट,मदिरापान असे वाईट कर्म केले होते. जेव्हा त्याचा अंत जवळ आला तेव्हा लवकरच यमराज त्याचे प्राण हरण करणार आहे अशी अनुभूती त्याला झाली.

आपल्या पूर्ण आयुष्यात आपण एकही चांगले कर्म केले नाही उलट खूप वाईट कर्म केले आहेत ह्याचा पच्छाताप त्याला आता होऊ लागला.

ह्या भीतीने तो ऋषी अंगिरा ह्यांच्या आश्रमात पोहोचला आणि त्याने अंगिरा ऋषींकडे क्षमायाचना केली कि माझा अंत आता जवळ आला आहे आणि मी केलेल्या पापांचा क्षय मला ह्याच जन्मात करायचा आहे तर कृपया मला ह्यात आपण मदत करा.

हे ऐकून अंगिरा ऋषींनी त्याला पापांकुशा एकादशी चे व्रत विधी विधानाने करण्यास सांगितले तसे त्याने हे व्रत केले आणि जेव्हा त्याचा अंत झाला तेव्हा त्याला परलोकी मोक्षाची प्राप्ती झाली.

पाशांकुश/पापांकुशा एकादशी मुहूर्त

  • एकादशी तिथि आरंभ : २६ ऑक्टोबर २०२० सकाळी ९:०२ पासून ते २७ ऑक्टोबर २०२० सकाळी १०:४८ पर्यंत
  • एकादशी तिथि उपवास : २७ ऑक्टोबर
  • व्रत पारण (उपवास सोडणे) : २८ ऑक्टोबर २०२० सकाळी ०६:३० ते ८:४४ पर्यंत.
  • द्वादशी तिथि समाप्ती : २८ ऑक्टोबर १२:५४

दुसऱ्या दिवशी प्रदोष व्रत असल्याने ज्यांचा एकादशी आणि प्रदोष चा सुद्धा उपवास असेल त्यांनी एकादशी चा उपवास सोडताना वरील वेळात साधे लिंबू पाणी पिऊन उपवास सोडू शकता आणि प्रदोष च्या व्रताची सुरुवात करू शकता.

एकादशी महत्व उपवास कसा करावा नियम आणि अधिक इतर एकादशी माहिती साठी खालील लिंक देत आहे कृपया त्यावर क्लिक करून अधिक माहिती मिळवावी हि विनंती.

https://shreedattagurujyotish.com/ekadashi/

https://shreedattagurujyotish.com/kamika-ekadashi-16th-july-2020/

धन्यवाद…..!

Leave a Reply