You are currently viewing कुंडलीत ह्या भावात केतू किंवा मंगळ असतील तर दोन सख्या भावंडानी एकत्र कधीच राहू नये

कुंडलीतील असा एक भाव आहे जिथे केतू किंवा मंगळ किंवा हे दोन्ही ग्रह असतील तर माझे मत असे आहे कि दोन्ही भावंडानी एकाच घरात किंवा जास्तीत जास्त एकाच शहरात सुद्धा राहण्याचा प्रयत्न करू नये. तो भाव म्हणजे कुंडलीचा ३ रा भाव (3rd house)

हा भाव आपल्या पराक्रमाचा असतो ह्याच भावावरून लहान भावंडे पाहतात. ह्या स्थानी वरील प्रमाणे ग्रह असतील तर दोन्ही भावंडांपैकी एकाच्या जीवनात बरेच अडथळे येतात असे निदर्शनात आले. मग हा प्रकार शिक्षण करिअर वैवाहिक जीवन किंवा प्रॉपर्टीज बद्दल असू शकेल.
जसे एकाचे शिक्षण झाले एकाचे झाले नाही . एकाचे करिअर झाले दुसऱ्याचे झाले नाही किंवा असाच प्रकार पुढील वैवाहिक जीवन किंवा आर्थिक परिस्थितीत सुद्धा होऊ शकेल. लक्ष द्या.

उपाय —

असे ह्या वेळी होईल त्या कालावधीतले टार्गेट पूर्ण करण्यास ज्याला अडचणी येत आहेत त्यास वेगळे करावे किंवा ज्याच्या पत्रिकेत असा योग्य आहे त्यास वेगळे करावे. हे करताना जास्तीत जास्त कल्चर भाषा खाणे पिणे जिथे वेगळे होईल किंवा साधारण ३०० किलोमीटर पेक्षा लांब जाण्याचा प्रयत्न करावा लागतो.

हा प्रकार १००% मिळतो जेव्हा त्या मुलांच्या मधले किंवा आधीचे मूळ अबोर्ट केलेले असते.

त्यासाठी मग जास्तीत जास्त प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीला म्हणजे सूर्य जेव्हा राशी बदलतो तो दिवस साधारण दिनांक १३/१४/१५/१६/१७ असतो हे गूगल करून मिळविता येते किंवा कॅलेंडर मध्ये असते. त्या वेळेस गायीला ज्वारी भिजवून त्यास अगदी नरम करून त्यात गूळ घालून खाण्यास द्यावी हे आईने करावे दोन्ही भावंडांच्या सुखासाठी.
माझा त्यासाठी हा लेख वाचून घ्या —- https://shreedattagurujyotish.com/abortion-karanarya-mahilansathi-ek-mahatvacha-vishay/

जर पत्रिकेत असा योग मिळाला आणि भावंडे नाहीत किंवा कोणतेही भावंडं अबोर्ट झालेली नाहीत तर हा विषय आपल्यास लागू होत नाही काळजी करू नये.

खाली कुंडलीचे तिसरे स्थान लग्न पत्रिकेत दाखविले आहे.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768 
7506737519

Leave a Reply