जन्मतारखेत ३ अंक मिसिंग कसा होईल?
जर एखाद्याची जन्मतारीख जर १९/४/२००१ असेल तर त्याचा मूलांक १+९=१०=१ असेल
आणि त्याचा भाग्यांक १+९+४+२+०+०+१=१७–१+७ = ८असेल
म्हणजे जर मूलांक किंवा भाग्यांक सुद्धा कुठेही ३ शी संबंधित नाही आणि जर आपल्या जन्मतारखेत सुद्धा ३ अंक कुठेही नाही ह्याचा अर्थ आपल्या जन्म तारखेत ३ चा परिणाम आपले शिक्षण, करिअर किंवा परिवार ह्यावर होऊ शकेल.
शिक्षण
९०% असे दिसले आहे कि जर वरील प्रमाणे आपल्या जन्मतारखेत ३ अंक नसेल तर व्यक्तीचे शिक्षण एकतर अर्धवट राहते किंवा ते जरी पूर्ण झाले असले तरी त्यास त्याने घेतलेल्या सर्टिफिकेट चा उपयोग लगेच करता येत नाही किंवा होतच नाही*
मग तुम्ही डॉक्टर व्हा किंवा इंजिनीरिंग ला जा ज्याने पैसे खर्च करून आपणास खर्च केलेला पैसा करिअर करून काढावाच लागतो किंवा त्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारे त्रास न होता त्याचे समाधान आपल्याला मिळावावेच लागते. पण असे होताना ९०% विद्यार्थ्यांना त्याचा त्रास नेमका होतो.
आपल्यापैकी कोणी म्हणेल असे काही नसते तर तुम्ही १०% मध्ये मोडू शकता.
जर असे नसेल तर त्या विद्यार्थ्याने आपले शिक्षण कोणत्याही कंफर्ट झोन मध्ये घेतलेले नसेल आणि परिस्थितीला सामोरे जाऊन त्याने खूप मेहनत घेतली असेल. जसे पार्टटाइम करून शिक्षण घेणे , हॉस्टेल मध्ये शिक्षण घेणे, घरातल्या वातावरणाचे वाईट परिणाम होत असताना शिक्षण घेणे.
कारण असे झाले नाही तर तुम्ही ९०% मध्ये याल नक्की म्हणून मी स्वतः माझ्या नुमरॉलॉजि च्या मार्गदर्शनात हे नक्की सांगत असतो कि आपल्याकडे ३ नंबर नसताना शिक्षण कसे घ्यावे.
करिअर निवडीसाठी ३ अंक मिसिंग चे परिणाम
करिअर निवडताना शक्यतो व्यक्ती असाच प्रयत्न करेल कि तो जे शिकला आहे ज्याची सर्टिफिकेट आहे त्या शिक्षण बद्दलचे करिअर निवडीसाठी तो अगोदर प्रयत्न करेल. पण ९०% लोकांना त्रास झालेला पहिला आहे कि ज्या शिक्षणावर त्याचे सर्टिफिकेट आहे त्याच संबंधित करिअर निवडीसाठी त्रास झाला किंवा तेच करिअर मिळाले नाही आणि दुसरेच काहीतरी करावे लागले.
१०% ह्यात अपवाद होऊ शकेल जर त्यांचे शिक्षण लहापानापासून कोणत्यातरी परिस्थितीचा सामना करून केले असेल.
गुरु आणि परिवार
फॅमिलिअर होण्यासाठी फॅमिलीशी एकरूपता मिळण्यासाठी त्याचा उत्तम आनंद घेण्यासाठी परिवार पुढे नेण्यासाठी ३ नंबर मिसिंग ह्याचा वाईट परिमाण ९०% व्यक्त्तीला होतोच होतो. ह्याचे कारण ३ अंक हा गुरु चा आहे जो आपल्याला पारिवारिक आनंद देतो.
१०% व्यक्ती असे म्हणणार नाहीत कि आमच्याकडे ३ अंक नाही तरी आम्ही आमच्या परिवाराचा उत्तम आनंद घेत आहोत ह्याचा अर्थ तुम्ही खालील प्रमाणे शिक्षण आणि करिअर केले असेल ३ नंबर नसताना.
१) आपले शिक्षणच पूर्ण झाले नसेल किंवा…
२) आपले शिक्षण पूर्ण झाले असेल तर त्या शिक्षणाचा आणि करिअरचा काही संबंध नसेल.
३) आपण ज्याच्याशी विवाह केला असेल त्या व्यक्तीच्या जन्मतारखेत ३ अंक असेल किंवा मूलांक भाग्यांक असेल.
हेही वाचा :- नीच गुरु आणि शिक्षण व्यवस्था
ह्या ३ अंकाचा विचार करताना काही उदाहरणे समाजात मिळाली ती अशी
पालकांनी मुलांना खूप चांगले शिकविले ३ नंबर नसताना आणि ते मूल शिकले सुद्धा. तो चांगला डॉक्टर झाला किंवा इंजिनीर झाला पण त्याचा एकतर करिअर वर वाईट परिणाम झाला किंवा त्याला नंतर लग्न करताना त्रास झाला किंवा लग्न केल्यावर मूल होण्यास त्रास झाला (परिवाराची वाढ म्हणजे गुरु) किंवा एकतर डिवोर्स झाला किंवा पती पत्नी चा परिवार डिस्टर्ब झाला अजून काही कारणाने.
म्हणून नीट विचार केल्यावर असे लक्षात आले असेल कि आपले शिक्षण आणि करिअर ह्याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनात झाला नाही पाहिजे ह्यासाठी ३ नंबर फार महत्वाचा आहे.
हे पाहण्यासाठी समाजातील स्वतंत्र पूर्वीच्या महान व्यक्तींच्या जन्मतारखेवर आपण अभ्यास करू शकता कि त्यांचे शिक्षण कसे झाले कोणत्या परिस्थितीत झाले आणि त्यांनी आपले करिअर कसे केले. ९९% रिझल्ट आपल्याला मिळून जाईल जसे मी इथे व्यक्त केले आहे.
इथे तरी सुद्धा शिक्षण करिअर आणि वैवाहिक जीवन ह्यात चांगला रिझल्ट मिळण्यासाठी खाली काही उपाय देतो ज्याने आपणास त्याचा त्रास कमी होऊ असेल.
१) प्रथम कोणत्याही निष्णात नुमरॉलॉजिस्ट चा सल्ला घ्या ज्याने करून आपणास उत्तम सल्ला मिळेल
२) ३ नंबर मिसिंग साठी कोणताही सल्ला घेताना त्यात निष्णात असलेल्या व्यक्तीकडून सल्ला घ्या
३) गुरुवारी कोणत्याही गुरु च्या देवळात तुम्ही ज्याला गुरु मानता.
४) गुरुवारी चणा डाळ भिजवून गूळ घालून गायीला द्या.
५) कोणत्याही ज्योतिषाची किंवा गुरुची दक्षिणा बुडवू नका किंवा अपमान करू नका कारण हेच कर्म मागील आपल्या जन्माशी कनेक्ट झाले असेल म्हणून ह्या वेळी ३ मिसिंग आला असेल असे मला वाटते त्याचा कोणताही प्रूफ माझ्याकडे नाही.
६) गुरुवारी जास्तीत जास्त पिवळे पदार्थ/वस्तू दान करा.
७) लग्न करताना जोडीदाराच्या जन्म तारखेत ३ अंक असावाच.
इथे जे काही आपणास दिले आहे ते आधी कुणीही ह्यावर विचार केला नसेल असे मला वाटते त्यामुळे वरील सर्व विचार माझे स्वतःचे आहेत ज्याचा मला माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनुभव आलेला आहे. त्यामुळे आपल्याशी हे असेच असू शकेल आणि असेच होईल हे मी मानत नाही त्यामुळे फक्त वाचून घ्या पटत असेल तर विचार करा नाहीतर सोडून द्या. ह्यात जर काही चुका असतील तर कॉमेंट करू शकता सद्विवेक बुद्धीने करा उलट सुलट चर्चा स्वीकारली जाणार नाही.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519