You are currently viewing राहू राशी परिवर्तन २०२२ मेष राशी/मेष लग्न

राहू राशी परिवर्तन २०२२ मेष राशी/मेष लग्न- RAHU/KETU TRANSIST FOR MESH RASHI

राहू/केतू परिवर्तन २०२२

वरील लिंक मध्ये ज्या प्रमाणे महत्वाचे पॉईंट राहू केतूच्या बदलाचे दिले आहेत त्याच प्रमाणे फक्त आता इथे मेष राशी आणि मेष लग्न ह्यावर राहू केतू च्या भ्रमणाचा (भासमानाचा) विचार करू.

राहू राशी परिवर्तन २०२२- मेष राशी / मेष लग्न

मेष राशी आणि मेष लग्न म्हणजे आपली राशी जरी मेष नसली पण लग्न मेष असेल तर किंवा आपले लग्न मेष नसले पण राशी मेष असली तर खाली दिलेले विवेचन हे आपल्या साठी असेल.

  • मेष राशी/लग्न पत्रिकेत राहू हा प्रथम स्थानी येतो म्हणजेच जर तुम्ही मेष राशीचे असाल तरी आणि लग्नाचे असाल तरी तुमच्या राशीत दिनांक १२/४/२०२२ पासून पुढे १८ महिने राहू चे भ्रमण असेल त्याने मेष राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना एक नवीन उमेद मिळेल. मागील काही वर्षाचे जे जे टार्गेट होते मनात ते सत्यात उतरविण्यासाठी इथे राहू आपल्याकडून खूप काही करून घेईल. राहू इथे काही गोष्टींसाठी आपल्याला अहंकार देऊ शकतो. सांभाळून राहावे चुका होऊ शकतील.
  • १२/४/२०२२ ते १५/६/२०२२ पर्यंत राहू मेष राशीतल्या कृतिका नक्षत्राचे फळ देणार आहे. तेव्हा ह्या राशी किंवा लग्न च्या व्यक्तींना थोडी आरोग्याची काळजी करावी लागेल जर आधीचे काही आजार असतील आणि त्यावर काहीच केले नसेल तर आता त्यावर नव-नवीन उपचार करावेसे वाटतील. राहू इथे आपल्या काही रिलेशन ला तडा जाऊ देऊ शकतो सांभाळावे. इथे राहू डोक्यात भ्रम आणू शकतो. काही व्यक्ती काहीही निर्णय घेताना घाई करताना दिसतील.
  • १५/६/२०२२ ते २१/२/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या भरणी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मेष राशी किंवा मेष लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे मिळेल. ज्यांचे घटस्फोटाचे विषय असतील त्यांचे विषय मार्गी लागतील. वैवाहिक प्रश्न सुद्धा मार्गी लागतील. पैसा मिळेल. मेष राशीच्या किंवा लग्नाच्या व्यक्तींना इथे मोठे निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपल्या स्वतःला जे जे मिळवायचे असेल ते ते इथे प्रयत्न करू शकाल.
  • २१/२/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत राहू मेष राशीतल्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि त्याचे फळ हे मेष राशी किंवा मेष लग्नाच्या व्यक्तींना पुढील प्रमाणे असेल. ह्या कालावधीत आपली खूप धावपळ होणार आहे भरणी नक्षत्राच्या वेळी जे जे निर्णय घेतले असतील त्यात तुम्ही आता खूप बिझी शेड्युल मध्ये असाल. विवाह आणि वैवाहिक विषयात इथे जरा जपून राहणे आणि रिलेशन ला कुठेही तडा जाऊ देऊ नये जरा हा काळ नाजूक आहे.

मेष राशी/लग्न च्या व्यक्तींना केतू चे सुद्धा परिणाम खालील प्रमाणे असतील.

  • केतू आपल्या सातव्या स्थानातून भ्रमण करत आहे त्यामुळे जर आपण व्यावसायिक असाल तर आपली धावपळ दिसेल आणि इथे पार्टनरशिप हा विषय नाजूक बनू शकतो लक्ष द्यावे.
  • केतू तुला राशीत १२/४/२०२२ पासून ते १८/१०/२०२२ पर्यंत विशाखा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे मेष राशी/लग्न च्या व्यक्तींना इथे वैवाहिक विषयातील खर्च अधिक होतील. विद्यार्थ्यांना हा काळ चांगला नाही जर ह्यात काही रिझल्ट येत असतील तर जास्त मेहनत करावे लागतील. हाच काळ काही मेष राशी किंवा लग्नाच्या व्यक्तींना बाहेरगावी जाण्यास प्रवृत्त करेल. प्रयत्न करावा.
  • केतू तुला राशीत १८/१०/२०२२ पासून ते २६/६/२०२३ पर्यंत स्वाती नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी उत्तम असेल स्वतःला जे जे करायचे असेल ते ह्या कालावधीत करा. पण ह्याच कालावधीत आपल्याला काही भ्रम निर्माण होतील निर्णय कसे घ्यावेत ह्याचा सल्ला घेणे हितावह ठरेल.
  • केतू तुला राशी २६/६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत चित्रा नक्षत्राचे फळ देणार आहे. त्यामुळे ह्या कालावधीत खूप काही अचानक घटना प्रवास घडतील. निर्णय सांभाळून घ्यावे .

उपाय रोज हनुमंताची सेवा कोणत्याही स्वरूपात करावी — हनुमंताचे दर्शन घेणे , त्यास प्रत्येक मंगळवारी सिंदूर लेपन करून तेथे हनुमान चालीसा वाचणे, हनुमंताच्या उजव्या पायाच्या सिंदुराचे पुरुषांनी कपाळी आणि स्त्रियांनी फक्त कंठाला तिलक करणे.
गणेश उपासना मंगळवारी करणे वगैरे.

धन्यवाद…..!

Leave a Reply