गुरु राशी परिवर्तन २०२१ कुंभ राशी / कुंभ लग्न- गुरु २० नोव्हेंबर २०२१ ला कुंभ राशीत जात आहे १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु कुंभ राशीत असेल. त्यावरील त्याचे नक्षत्रीय भ्रमण आणि इतर विवेचन वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://shreedattagurujyotish.com/guru-rashi-parivartan-2021-jupiter-transit-in-kumbh-rashi-in-marathi/
वरील कुंडली हि कुंभ राशीची चंद्र कुंडली आहे आणि कुंभ राशीची लग्न कुंडली आहे.
आपली चंद्र कुंडली कुंभ राशी किंवा लग्न कुंडली कुंभ असेल (मग राशी किंवा लग्न वेगवेगळे असले तरी) खाली दिलेले सर्व काही आपल्यासाठी आहे.
कुंभ राशी/लग्नाच्या कुंडलीत गुरु हा प्रथम स्थानी येत आहे. हे स्थान आपल्या व्यक्तिमत्वाचे आपल्या प्रेझेन्टेशन चे आहे. गुरु १४४ दिवस ह्या स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तो वक्री होणार नाही ह्याच राशीत संपूर्ण मार्गी असेल. तेव्हा जर आपल्या पत्रिकेत जन्मतः गुरु ची स्थिती उत्तम फळ देईल. आपल्या जन्म कुंडलीत गुरु जर वक्री नसेल तो ० ते ५ किंवा २७ ते २९.५९ डिग्री पर्यंत नसेल. गुरुवर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नसेल. आणि दशा महादशा उत्तम असेल तर ह्या कुंभ राशीतील गुरु आपल्या ह्या प्रथम स्थानी चांगले फळ देईल.
वरील कुंडलीत जिथे ९ नंबरच्या धनु राशीला आणि १२ नंबर च्या मीन राशीला सर्कल केला आहे त्या गुरु च्या दोन राशी आहेत.
धनु राशी हि आपल्या लाभ स्थानी आहे. जेव्हा लाभ स्थानाचा मालक गुरु हा प्रथम स्थानी भ्रमण करेल तेव्हा आपली सर्व धावपळ हि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला प्रेझेंट करण्यासाठीची असेल. इथे तुम्ही अनेक प्रकाराने लाभ मिळविण्यासाठी धावपळ करू शकाल आणि ती पॉसिटीव्ह असेल.
गुरु ची १२ वी राशी मीन आपल्या दुसऱ्या स्थानी येत आहे आणि त्याचा मालक स्वतः गुरु हा मागील प्रथम स्थानी भ्रमण करणार आहे तेव्हा कुटुंब आणि पैसा ह्यासाठी आपण पूर्णपणे तत्पर असाल.
हेही वाचा : गुरु राशी परिवर्तन २०२१ : मकर राशी / मकर लग्न
Table of Contents
गुरु ची ७ वी दृष्टी
गुरु ची ७ वी दृष्टी हि ५ नंबर च्या सिंह राशीवर येत आहे (जिथे बाण आहे) ते स्थान वैवाहिक जोडीदाराचे आहे. व्यापारासाठी हे स्थान व्यापार आणि पार्टनरशिप चे आहे. ह्या दोन्ही विषयात आपणास चांगले अनुभव येतील. जोडीदार आपणास पूर्ण सहकार्य करेल. आधीचा काही मनमुटाव असेल तर तो दूर होईल. व्यापाऱ्यांना पार्टनरशिप मध्ये लाभ होतील.
गुरु ची ५ वी दृष्टी
गुरु ची ५ वी दृष्टी हि जिथे ३ नंबर मिथुन राशी आहे त्यावर येत आहे. जिथे बाण आहे हे स्थान पंचम स्थान म्हणजे आपल्या कलाकौशल्याचे , प्रेमाचे , ज्ञानाचे आहे इथे गुरु आपल्या ह्या स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हा उत्तम कालावधी म्हणता येईल. संतती ची कोणतीही धावपळ हि पॉसिटीव्ह दिसेल. संतती कडून समाधानी असाल. प्रेमप्रकणात यश येईल आणि कौटुंबिक काही समस्या असतील तर त्या दूर करू शकाल.
गुरु ची ९ वी दृष्टी
गुरु ची ९ वी दृष्टी जिथे ७ नंबर ची तुला राशी आहे जिथे बाण आहे तेथे येत आहे. हे स्थान आपल्या पत्रिकेतील भाग्य स्थान आहे. भाग्योदयाच्या नवीन संधी आपल्यासाठी येतील. आत्तापर्यंत करिअर, संतती, शिक्षण, ह्याबद्दल काही रखडले असेल तर चांगले रिझल्ट मिळतील ह्या विषयी.
काळजीचे काही मुद्दे
कुंभ लग्न आणि कुंभ राशीच्या कुंडली चार्ट मध्ये जिथे क्रॉस केला आहे त्या स्थानातील काळजी किंवा सावधानता आपल्याला बाळगावी लागेल.
गुरु पासून चे ८ वे घर हे ६ नंबर चे असेल हे स्थान आपल्या भाग्य स्थानाचे आहे . हे स्थान कष्ठाचे आहे म्हणून जर काही आधीपासून चे विषय असतील तर त्यात गुरु आपल्याला सहकार्य करताना दिसत नाही. आयता पैसा मिळणार नाही कृपया त्यासाठी मागे लागू नका. त्रास होऊ शकेल.
जिथे १० नंबर मकर राशी आहे ते गुरु पासून चे मागील स्थान आपल्या व्यय स्थानी येत आहे म्हणून ह्या काळात परदेश गमन करत असाल तर कामे उशिरा होतील. शिक्षणासाठी जात असाल तर काही हरकत नाही. परदेशातून शुभ समाचार नाहीत. गुंतवणूक करताना जपून करावी. शॉर्ट टर्म गुंतवणूक फायदा दिसत नाही.
जिथे ४ नंबर लिहिले आहे ते स्थान रोग, जॉब, शत्रू, कर्ज ह्याचे स्थान आहे . जेव्हा हे स्थान गुरु पासून ८ वे असते तेव्हा ह्या विषयी च्या म्यानेजमेंट मध्ये गुरु चे सहकार्य मिळताना कठीण होईल काही असाध्य रोग आधीपासून असतील तर त्यात पैसा खर्च होऊन धावपळ होईल लक्ष द्या. तरी सुद्धा तुम्ही ते दूर करण्यास पॉझिटिव्ह व्हाल कारण शेवटी गुरु प्रथम स्थानात आहे .
गुरु चे नक्षत्रीय भ्रमण
गुरु चे धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण
२१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत गुरु मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून भ्रमण करेल. हे भ्रमण कुंभ राशी/लग्न साठी मंगळाची दोन स्थान ऍक्टिव्ह होत आहेत एक तिसरे स्थान आणि दुसरे दशम / कर्म स्थान. त्यामुळे ह्या कालावधीत करिअर साठी धावपळ होईल. लहान भावंडांसाठी त्याच्या करिअर कडे लक्ष देऊन विषय मिटविण्याचा सल्ला दिला जातो.
५ डिसेंबर २०२१ पासून २०२१ पासून मंगळ १७ जानेवारी पर्यंत हाच मंगळ वृश्चिक राशीत येत आहे लाभ स्थानातील जिथे ८ लिहिले आहे तेथे मंगळ भ्रमण करताना गुरु ह्या नक्षत्राचे फळ हे चांगले देईल. करिअर मध्ये आपली हिम्मत काम करेल मोठे निर्णय घ्याल. अर्ग्युमेण्ट करिअर मध्ये होत असतील तर त्यात आपण जास्त सावध राहावे. कोणतेही अति उत्साही निर्णय घेऊ नका.
गुरु चे शततारका नक्षत्रातून भ्रमण
गुरु २ जानेवारी २०२२ ते २ मार्च २०२२ पर्यंत शततारका नक्षत्रातून भ्रमण करेल तेव्हा तो राहू च्या नक्षत्रातून भ्रमण करीत असल्यामुळे राहूचे फळ देण्यास सुरुवात करेल. कुंभ लग्न आणि राशीच्या पत्रिकेत राहू हा प्रापर्टी आणि सुख स्थानातून जिथे २ लिहिले आहे तेथून जात आहे. म्हणून या स्थानाचे फळ राहू देण्यास सुरुवात करेल. घर खरेदी विक्री ह्यात जोमाने करता येईल पण त्यात सुद्धा कमी चांगले फळ मिळेल. सल्ला घ्यावा लागेल. घरातील एखादे वाद तंटे समोर येतील.
गुरु चे पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण
२ मार्च २०२२ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत गुरु चे पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण असेल. पूर्वभाद्रपदा हे गुरुचेच नक्षत्र असल्यामुळे हा काळ आपणासाठी पहिल्या स्थानाचे फळ देत आहे. २१ नोव्हेंबर २०२१ पासून ते २ मार्च पर्यंत जे जे कराल त्याचे चांगले चित्र ह्यात पाहावयास मिळेल. आपण खूप पॉझिटिव्ह असाल.
धन्यवाद…..!