कुलवर्धन / कुलदीपक राजयोग- चंद्रापासून किंवा सूर्यापासून किंवा लग्न स्थानापासून पासून पाचव्या स्थानात खालील सर्व ग्रह असतील तर हा योग आपल्या पत्रिकेत आहे असे समजावे.
मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे पाचही ग्रह सूर्य लग्न चंद्र पासून ५ व्या भावात असावेत.
हेही वाचा : आपल्या पत्रिकेत लकी ग्रह कोणता.
Table of Contents
कुंडली उदाहरण १
चंद्र जिथे लिहिला आहे तिथून पाचव्या स्थानी वरील ग्रह दाखविले आहेत. आपल्या पत्रिकेत चंद्र कुठेही लिहिला असेल तरी चालेल तिथून ५ व्या स्थानी हे ५ ग्रह लिहिले आहेत का पहा.
कुंडली उदाहरण २
रवी जिथे लिहिला आहे तिथून पाचव्या स्थानी वरील ग्रह दाखविले आहेत. आपल्या पत्रिकेत रवी कुठेही लिहिला असेल तरी चालेल तिथून ५ व्या स्थानी हे ५ ग्रह लिहिले आहेत का पहा.
कुंडली उदाहरण ३
लग्न म्हणजे आपल्या पत्रिकेचे पहिले स्थान तिथून पाचव्या स्थानी वरील ग्रह दाखविले आहेत. आपल्या पत्रिकेत कोणतेही लग्न असले तरी पहिल्या स्थानापासून ५ मोजा म्हणजे पाचवे स्थान.
कुलवर्धन / कुलदीपक राजयोग ची शुभ फळे
शारीरिक बळ , निरोगी, ऐश्वर्यकारी, परिवाराची उन्नत्ती करणारा, कुळाची प्रतिष्ठा करणारा. असा व्यक्ती अत्यंत भाग्यवान असेल आपल्या कुळाचे नाव मोठे करेल आणि सर्वाना योग्य पद्धतीने मदत करून प्रगती पथावर नेहमी असेल.
धन्यवाद…..!