होळी- कोणताही मंत्र सिद्ध करण्यासाठी, कोणतीही मोठी साधना करण्यासाठी, कोणतीही समस्या लगेच सोडविण्यासाठी, तांत्रिक क्रियेला घालविण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी वर्षातून दोनच दिवस फार महत्वाचे असतात एक होळीची पूर्णिमा आणि दुसरी दिवाळीची अमावस्या.
ह्या दिवशी सामान्य व्यक्तीने केलेले कोणतेही प्रयोग हे सिद्ध होण्याची ताकद त्यात असते. म्हणून मी येथे ज्योतिष शास्त्रातील होळी च्या दिवशी करणारे सर्व उपाय आपल्यासमोर ठेवत आहे.
बरेच उपाय हे मी तयार केलेले नसून मोठ्या मोठया आचार्यांनी सांगितले ले आहेत. आपण जर ह्याचा उपयोग त्या दिवशी जरूर करून पाहावा. बऱ्याच लोकांना न पटणारे हे असू शकते पण करून पाहायला काही हरकत नाही असे मला वाटते कारण ज्या व्यक्ती खूप समस्या मध्ये असतात त्यांनी हे जरूर करावे.
Table of Contents
होळी उपाय
उपाय १
- होळी च्या दिवशी सकाळी सूर्याला जल द्या
- ह्या दिवशी तुम्ही आपल्या घरात आणि दुकानात तेथील वास्तू दोष निगेटिव्हिटी आणि ज्या धन संबंधित समस्या असतील त्या सोडविण्यासाठी तेथे ११ गोमती चक्र , एकाक्षी नारळ , स्फटिक श्री यंत्र, दक्षिणावर्त शंख ह्या दिवशी श्रद्धेने ह्याची स्थापना केली तर जरूर त्याचे चांगले परिणाम मिळतात. दक्षिणावर्त शंख एका चांदीच्या वाटीत ठेवा आणि त्यात रोज पाणी किंवा दूध भरत राहा. हे अंघोळीच्या पाण्यात जरूर घ्या कोणताही निगेटिव्ह सेल्स दूर होण्यास मदत होते. वास्तू च्या दोषात हे पाणी घरात शिंपडल्याने कोणतेही मोठे प्रयोग वास्तू चे केलेत नसले तरी चालतात.
ह्या सर्व वस्तूंवर हळदी + गंगाजल + केसर मिक्स करून लावून त्याची मनोभावे पूजा करा
ॐ श्रीए नमः ह्या मंत्राचा जप त्यासमोर १०८ वेळा जरूर करा
अशी १०८ ची ११ माला जप केल्याने जास्त चांगले अनुभव येतील. रोज एक माळ केल्याने त्याची प्रचिती लवकरात लवकर येईल
उपाय २
होळी पूर्णिमेच्या रात्री चंद्राला दुधाने अर्ध्य देणे हे चांदीच्या वाटीतून देणे उत्तम. सफेद फुल घालून देणे अति उत्तम. सफेद मिठाई किंवा साबुदाणा खीर किंवा तांदळाची खीर चांदीच्या वाटीतून चंद्राला ह्या दिवशी दाखविणे आणि ती प्रसादात घेणे
हा उपाय ह्या दिवसापासून प्रत्येक पूर्णिमेला करत जा आणि त्या दिवशी अर्ध्य देताना खालील मंत्र म्हणा
- ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नम: ।
उपाय ३
घरातील धन हानी होत असेल तर पैसे वाया जात असेल तर होळीच्या दिवशी घराबाहेर उंबरठ्याबाहेर संध्याकाळी ७ नंतर गुलाल ठेवा आणि त्यावर एक तेलाचा मातीचा दिवा लावा आणि होळी पेटल्यावर हा दिवा विझवल्यावर तो होळीत टाकून या वर्षभर धन हानी पासून रक्षण होते
उपाय ४
घरातील समृद्धी साठी होळीच्या दिवशी एक खाऊच्या पानावर 1 बत्ताशा + २ लवंग + थोडे काळे तीळ ठेऊन त्याला काळ्या धाग्याने बांधून घरातील प्रत्येक सदस्याने होळीच्या ३ परिक्रमा करून होळीत टाका.
उपाय ५
व्यापारात लाभ होण्यासाठी होळी च्या दिवशी सकाळी किंवा रात्री एका गुलालाचा पॅकेट मध्ये एक चांदीचा सिक्का + मोती शंख टाका आणि हे लाल कपड्यात बांधून तिजोरी मध्ये ठेवा.
उपाय ५
ह्या दिवशी दुपारी गायीला जरूर एक गोड पदार्थ द्यावा.
उपाय ६
ह्या दिवशी गरिबाला अन्न दान जरूर करावे.
उपाय ७
ह्या दिवशी तुम्ही कुणाकडूनही उधार घेऊ नये आणि वस्त्राचे दान करू नये स्वतःच्या.
उपाय ८
तुम्ही मांगलिक आहात किंवा मंगल दोषामुळे लग्न होत नसेल किंवा नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल तर ह्या दिवशी सकाळी हनुमंजीला ५ लाल गुलाब चरणी अर्पण करा असे ५ दिवस सतत करा होळी पासून.
उपाय ९
मनोकामना पूर्ण करण्यासाठी होळीच्या दिवशी शिवपीडीवर ५ बेलपत्र वर चंदन टिळा लावून अर्पण करा ठेवा आणि नंतर येणाऱ्या सोमवारी पंचमेवा चा प्रसाद दाखवा ती इच्छा पूर्ण होईल.
उपाय १०
५ हळदी ची गाठी + ११ कमळगट्टे बीज + एक मुट्टी समुद्री मीठ + एक मुठी धने वेगवेगळ्या पुदीत बांधून एका पिशवीत भरून हि पिशवी पिवळ्या कपड्यात बांधा हि पोटली तुम्ही देवघरात कोठेही दिसणार नसेल अशा ठिकाणी ठेवा पण देवघर जर नॉर्थ ईस्ट ला नसेल तर नॉर्थ ईस्ट ला च ठेवा.
उपाय ११
व्यापार चालत नसेल तर एकाक्षी नारळाला गहू चे आसन वर स्थापित करा आणि खालील मंत्र १०८ वेळा मुंगा माळेवर म्हणा
लाल आसन घ्या बसायला.
मंत्र- ऊं श्रीं श्रीं श्रीं परम सिद्धि व्यापार वृद्धि नम:।
उपाय १२
ह्या दिवशी होळी पेटताना एक ऊस पानासकट होळीत टाकून थोडा पेटल्यावर घरी आणा आणि साऊथ वेस्ट ला घरात ठेवा ह्याने धन लाभ च्या संधी मिळतील.
उपाय १३
होळीच्या आगीत एक कोळसा टाकून तो पेटल्यावर काढून घरी आणून जर त्यावर १०००० वेळा खालील मंत्र म्हटलं तर तो मंत्र सिद्ध होतो ह्याचा जर टिळा लावला प्रत्येक काम करायच्या अगोदर तर ते काम झाले म्हणून समजा (त्याची बारीक पूड बनवून चांदीच्या डब्बीत भरून ठेवा मंत्र झाल्यावर)
मंत्र है ऊग्रम वीरम महाविष्णू संख्या १००००
उपाय १४
होळीच्या दिवशी काळी हळद घ्या आणि तिला शुद्ध करून घ्या. तूप + सिंदूर मिक्स करून तिलक करा चांदीच्या प्लेट मध्ये ठेवा त्याला गुग्गळं धूप दाखवा आणि तुपाच्या दिव्याने आरती दाखवा गॉड नैवेद्य सुद्धा दाखवा. आता ह्याला उचलून लाल वस्त्रात चांदीचे काही शिक्के टाकून बांधून घ्या आणि तिजोरीत ठेवा धन हानी किंवा कमी होणार नाही.
उपाय १५
होली, दिवाली, नवरात्रि मध्ये गोमती चक्र ची विशेष पूजा होत असते.
सर्व सिद्धि योग, अमरुत योग, रवि पुष्य योग, आदि विभिन्न मुहूर्तावर गोमती चक्र सिद्ध करता येते.
धन लाभ साठी 11गोमती चक्र आपल्या देवघरात एका वाटीत ठेवा समोर बसून ॐ श्री नमः चा जाप करा आणि रोज हा मंत्र त्या वातीकडे पाहून ११ वेळा उच्चारण करा देवाची पूजा करताना दहनासाठी हा एक चांगला प्रयोग आहे.
उपाय १६
कुणाला जर ह्या दिवशी नवग्रहांची यंत्र स्थापना करायची असेल तर बाजारात मिळणारे नवग्रह यंत्र घ्या.
सकाळी अंघोळ करून एका पाटावर सफेद कापड ठेवा
त्यावर अक्खे मूग + तांदूळ अक्खे + गेहू + लाल मसूर + काळी उडद अक्खी + काळे तीळ
एक एक मुट्टी ठेवा आणि त्यावर हे यंत्र ठेवा केसर गंगाजल चा तिलक करून धूप दीप दाखवा पूजा करा
आणि समोर बसून स्फटिक माळेवर १०८ वेळा खालील मंत्र म्हणा
मंत्र — ”ब्रम्हा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमि -सुतो बुधश्च
गुरुश्च शुक्र शनि राहु केतवरू सर्वे ग्रहा शांति करा भवन्तु ”
आत्ता हे यंत्र तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलून तुमच्या देवघरात ठेवा किंवा दुकानाच्या दरवाजावर लावा. लाभ होतील रोज धूप दीप दाखविले तर उत्तम परिणाम मिळतात नवग्रहांची शांती होते आणि त्रास होत नाहीत.
उपाय जेव्हढे जमतील तेव्हढेच करावे आणि पूर्ण श्रद्धेने करणे आवश्यक असेल.
श्री दत्तगुरु ज्योतिष
देवेंद्र कुणकेरकर
९८२१८१७७६८
धन्यवाद…..!