Table of Contents
कसा बनतो हंस योग?
पंचमहापुरुष योगातील एक महत्वाचा योग हंस योग जो गुरु ग्रहाने बनतो. ह्या योगात लग्न कुंडलीच्या केंद्र स्थानात गुरु उच्च राशीत किंवा स्वराशीत लिहिला असेल तर हंस योग होतो.
- केंद्र स्थाने –(प्रथम चतुर्थ सप्तम दशम )
- गुरु ची उच्च राशी — कर्क ४ नंबर
- गुरु च्या स्वराशी — धनु आणि मीन ९ आणि १२ नंबर
हंस योगाची फळे
गुरु ने हा योग होत असेल तर व्यक्तीच्या पत्रिकेत हंस योग होतो असा व्यक्ती मृदू भाषी असतो. सौम्यता बोलण्यामधून निरखून येते. अशा व्यक्ती कफ प्रधान असतात. सुंदर पत्नी मिळण्याचे योग, एखाद्या शास्त्राचे उत्तम ज्ञान असू शकते अशा व्यक्तीच्या अंगी, गुणी व्यक्तींमध्ये अशा व्यक्ती मोडतात, आचार विचार सुदंर असणाऱ्या व्यक्ती या योगात जन्म घेतात.
नोट –– स्थिर लग्नात हा योग होत नाही — वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ लग्न हे स्थिर लग्ने आहेत.(२/५/८/११)
स्थानगत फळे हंस योगाची
मेष लग्नात हा योग जिथे ४ नंबर कर्क राशी केंद्रात चतुर्थ स्थानी लिहिली आहे तिथे होतो. ह्या लग्न कुंडलीत भाग्य स्थानाचा अधिपती (९ नंबर ची धनु राशी) गुरु आणि बाराव्या स्थानाचा अधिपती (मीन राशीचा) गुरु होत आहे आणि तो जेव्हा उच्च राशीत असेल तर आपल्या पत्रिकेत भाग्य आणि बारावे स्थान याचे फळ चांगले मिळते म्हणून अशा व्यक्तींना सल्ला दिला जातो कि घरापासून दूर जाऊन आपला भाग्योदय करा. उन्नती होईल. चंद्राला गुरु जर पाहत असेल तर असा व्यक्ती निष्पाप असतो. मात्र महिलांना ह्यात चांगले फळ मिळत नाही वैवाहिक सुखात त्रास होतात. पण विद्या, स्वभाव, सर्व्हिस देण्यामध्ये अशा स्त्रिया निपुण असतात.
- माझ्या मते हा योग ह्या पत्रिकेत असेल तर सहनशीलता जास्त असल्यामुळे नुकसान सुद्धा पहिले गेले आहे. अशा व्यक्ती त्रस्त होतात. म्हणून कोणत्याही विषयात किती सहन करावे ह्यावर मापदंड ठेवला तर जास्त त्रास होत नाहीत. कुंडली क्रमांक १ पहा.
- मिथुन लग्नासाठी गुरु हा आकारक ग्रह आहे. एव्हढा प्रभाव हंस होगाचा ह्यात दिसून येत नाही. स्वभाव चांगला दिसतो मात्र दुसऱ्याचा प्रभाव जास्त येतो आणि त्याच्यात व्यक्ती गुंतून जातो हे योग्य नाही. इथे केंद्राधिपती दोष लागतो. हा योग चांगला नाही वैवाहिक सुखात. मात्र जोडीदार लायक असतो जर गुरु एकटा असेल तर. कुंडली क्रमांक २ पहा.
- मिथुन लग्नात जर १२ नंबर मध्ये दशम स्थानी गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. वैवाहिक जीवनात हा योग उत्तम फळे देत नाही. सालाहकर व्यक्ती असतो पण स्वतःचा सल्ला उपयोगी येत नाही.कार्य क्षेत्री अशा व्यक्ती इमाने इतबारे काम करताना दिसतात पण थोडे हैराण सुद्धा असतात. पैसा मिळतो तो स्वकष्टाने मिळविलेला असतो. पूर्वजीत संपत्ती मिळताना कठीण होते. कुंडली क्रमांक — २ पहा.
- कर्क लग्नात जर प्रथम स्थानी ४ नंबर मध्ये गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. कुंडलीत ६ वे स्थान ९ नंबर धनु राशीचा मालक गुरु आणि कुंडलीचे भाग्य स्थान १२ नंबर चा मालक गुरु प्रथम स्थानी बसलेला असल्यामुळे भाग्य उन्नती जरी असली तरी भाग्यासाठी सतत व्यक्ती पळत असतो. आणि सहाव्या स्थानाचा गुरु इथे असल्यामुळे सतत व्यक्तीच्या मागे पीडा असते. संघर्ष करावा लागतो, आपल्या परिवारा साठी हा योग उत्तम नाही, समाजासाठी खूप चांगला होतो. सहाव्या स्थानाचा मालक जर उच्च किंवा स्वराशीचा होऊन केंद्र स्थानी असेल तर अस्त्र योग होतो. जे जे शत्रू समोर येतील जीवनात ते मोठे असतात. ह्याने संघर्ष जीवनात वाढत जातो. खास वैवाहिक सुख घेताना असे होते. मात्र नेम अँड फेम अशा व्यक्तीचे उत्तम होते. प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेत कर्केचा गुरु प्रथम स्थानी होता . — कुंडली क्रमांक ३ पहा.
- कन्या लग्न ६ नंबर चे — जर ९ नंबर धनु राशीत गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. आईचा प्रभाव जास्त असतो. इथे धनु राशीत गुरु आहे त्यामुळे आईच्या जीवनात संघर्ष असतो. जर एखादा पाप ग्रह ह्यावर प्रभाव टाकत असेल तर खूप त्रास दिसतो आईच्या जीवनात. पण ह्यात व्यक्तीला उत्तम कार्यक्षेत्र मिळते आणि उन्नती होते बाकी हंस योगाची उत्तम फळे मिळतात. कुंडली क्रमांक ४ पहा.
- कन्या लग्न ६ नंबर चे — जर १२ नंबर मीन राशीत गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. स्वतःची प्रॉपर्टी बनण्यासाठी हा एक उत्तम योग होतो. व्यक्ती पैसा प्रसिद्धी मिळवितो आपल्या बुद्धी च्या जोरावर प्रगती करतो. व्यापार क्षेत्री त्याची प्रगती होते. मोठे लाभ होतात. वैवाहिक जीवनात थोडे प्रथम त्रास होतात कुटुंबाकडून सपोर्ट मिळत नाही. मात्र नंतर त्यावर व्यक्ती मात करून पुढे जातो कारण पत्नी उत्तम मिळते.. कुंडली क्रमांक ४ पहा.
- तुला लग्न ७ नंबर चे — जर ४ नंबर कर्क राशीत दशम स्थानी गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. इतकी चांगली फळे ह्या लग्नात ह्या हंस योगाची मिळत नाहीत. कारण तृतीय स्थानी धनु राशी आणि रोग स्थानी मीन राशी चा मालक गुरु कर्म स्थानी येत आहे. त्यामुळे आपल्या कर्मासाठी व्यक्ती दिन दिन काळजी करत फिरतो तसे सुद्धा तुला लग्न साठी गुरु हा लग्न स्थानाचा शत्रू होतो म्हणून. आचार विचार खूप उत्तम असतात. पण हैराण होतात जेव्हा गुरु ची दशा महादशा अंतर्दशा असते. कुंडली क्रमांक ५ पहा.
- धनु ९ नंबर चे लग्न – ह्यात प्रथम स्थानी ९ नंबर मधेच गुरु असेल तर हंस योग निर्माण होतो. ह्यात व्यक्तीचा रुबाब असतो. आईचा प्रभाव असतो. प्रापर्टी सुख उत्तम मिळते. व्यक्ती आपल्या जीवनात उत्तम रित्या स्वतःला प्रेसेंट करतो आणि प्रगतीपथावर असतो. तो कोणाचेही ऐकेल जेव्हा त्याला त्या गोष्टी पटतील नाहीतर असा व्यक्ती आपल्या मतावर ठाम असतो. कुंडली क्रमांक ६ पहा.
- धनु ९ नंबर च्या लग्नात जर १२ नंबर मीन राशीत गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. चतुर्थातील हा योग प्रॉपर्टीज चे उत्तम सुख देतो. मानसिक समाधान मिळते. वाहन सुख सुद्धा चांगले असते व्यक्तीला. कुंडली क्रमांक ६ पहा.
- मकर १० नंबर च्या लग्नात — ४ नंबर च्या कर्क राशीत सप्तम स्थानी वैवाहिक सुखात गुरु लिहिला असेल ता हा हंस योग होतो. इथे वैवाहिक सुखाची फळे मिळताना व्यक्तीला त्रास होताना दिसेल. ह्याला कारण मकर लग्नात गुरु कितीही चांगला असला तरी त्याची चांगले फळे तो देत नाही. पण जर इथे शनी थोडा दुर्बल असेल तर वैवाहिक सुखाची फळे मिळताना दिसतात. बाराव्या स्थानी गुरु ची धनु राशी आणि तिसऱ्या स्थानी गुरुची मीन राशी येते आणि त्यांचा मालक हा वैवाहिक सुखात येतो म्हणून भटकंती आणि व्यय जास्त होतात व्यक्तीच्या आयुष्यात. हा हंस योग जरी असला तरी तितकीशी चांगली फळे ह्यात मिळत नाहीत — कुंडली क्रमांक ७.
- मीन १२ नंबर च्या लग्नात — जर ९ नंबर धनु राशीत दशम स्थानी गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. ह्यात व्यक्ती मोठ्या पदावर काम करणारे दिसतात. सालाहकर असू शकतील. मेहनती असल्यामुळे घराच्या बाहेर सतत असतात. कुंडली क्रमांक ८.
- मीन १२ नंबर च्या लग्नात — जर १२ नंबर मीन राशीत प्रथम स्थानी गुरु लिहिला असेल तर हंस योग होतो. ह्यात व्यक्तीला निर्णय घेताना त्रास होतात. कार्य क्षेत्री व्यक्ती संतुष्ट नसतो . सतत बदलाव होतो. व्यक्तीला ह्यात कोणत्याही प्रॉफिट साठी शनी ग्रहाचा मापदंड पाहावा लागेल. कारण इथे शनी ची मकर राशी लाभ स्थानात येते. कुंडली क्रमांक ८.
नोट — वरील स्थिती ची सर्व फळे गुरु च्या महादशा आणि अंतर्दशेत जास्त मिळतात. जर गुरु शी पत्रिकेत सूर्य किंवा चंद्रा ची युती होत असेल तर व्यक्तीला त्याची फळे कमी मिळतात. हा योग पाहण्यासाठी लग्न च्या स्वामी ची ताकद सुद्धा किती आहे हे पाहावे लागते.
तर असा हंस योग आपल्या पत्रिकेत असेल तर जरूर एखाद्या निष्णात ज्योतिषांकडून त्याचे फळ जाणून घ्या. खास करून गुरु ची महादशा अंतर्दशा सुरु असेल तर.
धन्यवाद…..!