You are currently viewing वयाच्या २४ नंतर १००% परिणाम

वयाच्या २४ नंतर १००% परिणाम

चंद्र

वर जी लग्न कुंडली इमेज दिली आहे त्यात त्या स्थानाची नावे आहेत. त्यात कोठेही तुमचा चंद्र एका ठिकाणी असेल. तो कोणत्याही नंबर बरोबर लिहिला असेल तरी खालील मुद्दे त्या स्थानातील वाचा. एक लाईन लिहिलेली हि तुमच्या साठी आहे सर्व नाही.

उदाहरण — जर तुमचा चंद्र हा सातवे स्थान येथे लिहिला असेल तर सातव्या स्थानासाठी ची लाईन वाचून घ्या आणि खालील काही चंद्राबद्दल असलेले नोट वाचा.

  • पहिल्या स्थानी चंद्र: आयुष्यभर मन हे स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी धावेल. धावपळ दगदग ह्यात सारखे मन ऍक्टिव्हेट असेल. येथील मन शांत नसते. (तुम्ही स्वतः स्थिर नाही)
  • दुसऱ्या स्थानी चंद्र: आयुष्यभर कुटुंबाचा विचार डोक्यातून जाणार नाही. कुटुंबासाठी येथील चंद्र बरीच मानसिक धावपळ करवितो.(तुमचे कुटुंब आणि पैसा स्थिर नाही)
  • तिसऱ्या स्थानी चंद्र: आयुष्यभर इकडे धाव तिकडे धाव ह्यासाठी मनात विचार असतील. भावंडांचे विचार किंवा पराक्रम कसा दाखवू ह्याचा विचार सतत असेल. (तुमचे पराक्रम स्थिर नाहीत)
  • चौथ्या स्थानी चंद्र: आयुष्यभर मातृ सुखाचा विचार, प्रॉपर्टीज वाहन ह्याबद्दल सतत मन धावेल.
  • पाचव्या स्थानी चंद्र: विद्या आणि प्रेमात (माझ्यावर कोण किती प्रेम करेल- सर्व रिलेशन ह्यात आले) ह्यात मन अति विचारी असेल. आपल्या कौशल्याचा कलेचा विचार मन जास्त करते. (प्रेम स्थिर नाही)
  • सहाव्या स्थानी चंद्र: आयुष्यभर एक संकट आले तर दुसऱ्या संकटावर मन सतत व्यस्त आधीच असेल. मनाला सतत चिंता. सतत दुसऱ्याला सर्विस कशी देता येते ह्याचा मनात विचार.(जॉब स्थिर नाही)
  • सातव्या स्थानी चंद्र: विवाहाच्या आधी हे मन शत्रूला टार्गेट करण्यासाठी धावते विवाहानंतर जोडीदार स्वतः शत्रू होईल का किंवा आहे का ह्यासाठी सतत मनात विचार येतात. असे होत नसेल तर मन सतत आपल्या जोडीदाराबद्दलच विचार करेल तेथून मन कधीच बाहेर येणार नाही.(वैवाहिक सुख स्थिर नाही)
  • आठव्या स्थानी चंद्र: मनात मानसिक उदासीनता. भीती ह्यासाठी मन सतत खर्चिक असेल. (मन स्थिर नाही)
  • नवव्या स्थानी चंद्र: येथील चंद्र सतत मनात भाग्योदयाचा विचार असेल. सतत धर्म नियम पाळण्याचा मन येथे विचार करते. भाग्योदयात सतत बदल दिसतात. (भाग्योदय स्थिर नाही)
  • दहाव्या स्थानी चंद्र: करिअर, कर्म ह्यातून मन कधीच बाहेर पडत नाही. (करिअर स्थिर नाही. बदल हमखास )
  • अकराव्या स्थानी चंद्र: लाभ इच्छा ह्याचा सतत विचार मनात असेल ह्यातून मन कधीच बाहेर पडणार नाही. (सतत अतृप्ती)
  • बाराव्या स्थानी चंद्र: मन सतत आपल्या स्वतःच्या सर्कल मधून बाहेर पडण्याचा विचार करते स्वतःला मन कधीच रमऊ शकत नाही. सतत मायनस होण्याची चिंता जरूर असते.

चंद्र आणि मन ह्यावर माझे मत

चंद्र हा एक असा ग्रह आहे जो सतत आपला आकार बदलतो. त्यामुळे मानसिक धावपळ तो सतत देतो तो ज्या स्थानी असेल त्याबद्दलची काळजी तो सतत लावतो.

  • वरील विधान हे थोड्याफार प्रमाणात कमी परिणाम देईल किंवा तुम्ही त्यावर चांगली मात करू शकाल जर चंद्र स्थिर राशीत लिहिला असेल तर. म्हणजे तुमचा चंद्र २/५/८/११ ह्या आकड्याबरोबर लिहिला असेल (कोणत्याही स्थानी)
  • वरील विधान हे जास्त चंचलता निर्माण करणारे असेल जर तुमचा चंद्र चर राशीत लिहिला असेल म्हणजे चंद्र खालील आकड्या बरोबर लिहिला असेल –१/४/७/१० (कोणत्याही स्थानी)
  • वरील विधान हे जास्त कॉन्फयुज्ड करेल मनाला जर तुमचा चंद्र हा द्विस्वभाव राशीत असेल म्हणजे चंद्र खालील आकड्याबरोबर लिहिला असेल — ३/६/९/१२ (कोणत्याही स्थानी)

सगळ्यात जास्त त्रास ह्यात चंद्र ० ते ५ डिग्री पर्यंत किंवा २६ पासून ते २९:५९ डिग्री पर्यंत असेल.
(चंद्राच्या डिग्री पाहण्यासाठी लग्न कुंडलीत चंद्राच्या समोर डिग्री लिहिलेल्या असतील बारीक आकड्यात त्या पहा.)

किंवा कुंडली च्या वर निरयन स्पष्ट ग्रह त्यात प्रत्येक ग्रहांच्या डिग्री ह्या ० ते २९:५९ पर्यंतच्या असतील त्या पहा. त्यात शेवटच्या कॉलम मध्ये ग्रहांच्या अवस्था सुद्धा पहा.

  • मृत चंद्र हा कधीही मनाची एंज्योमेन्ट देत नाही. त्या स्थानाची फळे चांगली मिळत नाहीत मानसिक रित्या.
  • वृद्ध अवस्थेतील चंद्र आपली मानसिक हालचाल जास्त करवत नाही. मन निपचित पडलेले दिसते काही जणांचे.
  • बाल अवस्थेतील तुमचा चंद्र हा तुम्हाला त्या स्थानात खेळवितो.
  • कुमार अवस्थेतील चंद्र तुमच्या मनाला ताजे ठेवतो त्या स्थानात. वाईट परिस्थितीतही तुम्ही त्यात एंज्योमेन्ट करता कुणाची पर्वा न करता.
  • युवा अवस्थेतील चंद्र हा त्या स्थानातील मानसिक लढाया करायला लावतो. तुम्ही नेहमी नव्या उमेदीकडे असता.

नोट —वरील सर्व परिणाम हे वयाच्या २४ नंतर कन्फर्म समजा. आणि त्याचा इफेक्ट ४८ पर्यंत तरी असेल. त्यात एखादी समस्या वयाच्या २४ नंतर कधीही आली तर ४८ पर्यंत मानसिक स्थिती तशीच असेल.

मी येथे उत्तम समजविण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा चंद्र आणि आपले मन जास्त समजण्यासाठी योग्य कोणत्याही ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता. कोणतेही पूर्णिमेचे उपाय हे चंद्र बळकट करण्याचे असतील त्यावर खालील लिंक ओपन करून वाचून घ्या.

पौर्णिमेचे – चंद्र स्ट्रॉंग करण्याचे उपाय

https://shreedattagurujyotish.com/pournima-remedies/

धन्यवाद…..!

Leave a Reply