You are currently viewing धनासाठी खास दिवाळी टिप्स

खालील काही टिप्स दिल्या आहेत त्या दिनांक १४ नोव्हेंबर ला जास्तीत जास्त प्रयोगात आणू शकता तुम्ही आणि आपापल्या परीने त्याचा लाभ मिळवू शकता. जे जे जमेल ते ते श्रद्धने करावे आपल्या विभागात जे जे मिळेल ते आधीच आणून घ्यावे.

  • श्री सूक्त चा ५ मिनिटाचा पाठ महालक्ष्मी पूजनापासून देवउठनी एकादशी पर्यंत रोज करा. धनाच्या बाबतीत चांगले परिणाम दिसतील .
  • लक्ष्मी पूजन मध्ये एक आवळा घ्या त्यावर सिंदूर तिलक करा एक लाल चुनरी त्यावर ठेवा आणि महालक्ष्मी च्या समोर ठेऊन खालील मंत्र ५ माळा कमळगट्टाच्या माळेवर जप करा.

ऊँ विष्णुप्रिया नमः

दुसऱ्या दिवशी तो आवळा आपल्या गल्ल्यात किंवा घरातील तिजोरीत ठेवा.

  • महालक्ष्मी चे पूजन झाल्यावर गरीब लहान मुलींना आणि सुहागिनी स्त्रियांना जरूर काही ना काही द्यावे ह्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
  • महालक्षमी पूजन रात्री पितळेच्या ग्लासात चांदी चा एक तुकडा टाकून त्यात पाणी भरून घरातल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा रात्री. दुसऱ्या दिवशी पिण्यास उपयोग करा.
  • ११ गोमती चक्र त्यावर केसर आणि गंगाजल चा लेप करून लाकडाच्या डब्बीत ठेऊन जर तिजोरीत ठेवले तर बरकत येते.
  • दिवाळीच्या रात्री अशोक च्या वृक्षाला दिवा लावून त्याचे पूजन केले तरी महालक्ष्मी ची कृपा होते.
  • ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र किंवा कनकधारा यंत्र स्थापित करून महालक्ष्मी ला प्रसन्न ठेवता येते घरात किंवा दुकानात सुद्धा.
  • दुकानाच्या गल्ल्यात ११ कमल बीजे ठेऊन त्याला रोज धूप दीप दाखवून महालक्ष्मी ची कृपा प्राप्त करता येते.
  • महालक्ष्मी चे पूजन करताना तेथे वडाच्या झाडाची ५ आणि अशोकाच्या झाडाची ३ पाने पूजन स्थळी ठेवावीत. वडाच्या पानावर हळद पाणी किंवा गंगाजल मिक्स करून स्वस्तिक काढावे आणि अशोकाच्या पानावर श्री लिहावे त्याची धूप दीप दाखवून पूजा करावी. दुसऱ्या दिवशी हि दोन्ही पाने तिजोरीत ठेवावी.
  • दिवाळीच्या रात्री दिनांक १४ ला पिंपळाच्या ६ पानावर पनीर किंवा दुधाची मिठाई ठेऊन रात्री पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. कोणतेही कार्य सिद्ध होण्यासाठी हा उपाय करावा.
  • दिवाळीच्या लक्षमी पूजननाच्या वेळी एक ऊस आणून त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी तो ऊस आपल्या वास्तू मध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात वर्षभर ठेवावा. धन उपाय समजून करून पाहावे.
  • दीपावली च्या दिवशी अशोक वृक्ष चे मूळ आणून त्याची पूजा करून तिजोरीत ठेवल्याने धनात वृद्धी होते. हे मूळ आणताना सकाळीच वृक्षाकडे जावे त्याची सहमती घ्यावी त्याला प्रार्थना करावी आणि थोडे खोदून घेऊन मग जरासे काढून घ्यावे.
  • दीपावली च्या दिवशी काळी हळदी (बाजारात महाग मिळते) तिला सिंदूर आणि धूप दाखवून पूजन करून चांदी च्या दोन नाण्याबरोबर लाल कपड्यात बांधून ठेवल्याने आर्थिक समस्या येत नाहीत. पैशाच्या बाबतीत समाधान मिळते.
  • दीपावली च्या रात्री किंवा रवी पुष्यामृत च्या दिवशी चौतिसा यंत्र भोजपत्रावर केसर आणि गंगाजल मिक्स करून डाळींबीच्या लेखणीने लिहून त्यासमोर जमेल तो महालक्ष्मी चा मंत्र जाप करून तिजोरीत अथवा गल्ल्यात ठेवून द्यावा धनाच्या बाबतीत चांगले परिणाम दिसतील.
  • दुकानाच्या गल्ल्यात तिजोरीत ११ कमळ बीज बरोबर श्री यंत्र ठेवावे आणि रोज धूप दीप दाखवावे लक्ष्मी चा वास सतत राहील.
  • दीपावली च्या दिवशी हत्था जोड़ी चे पूजन करून लाल चमकदार रेशमी कपड्यात किंवा सिंदूर च्या डबीत ठेवल्याने आणि हि वास्तू तिजोरीत ठेवल्याने धनाबाबतीत चांगले परिणाम दिसतील.
  • एकाशी नारळ , दक्षिणावर्त शंख आणून त्याची पूजा दीपावली च्या महालक्ष्मी पूजनात केली आणि नंतर ते तिजोरीत ठेवले तर धनासंबंधीत समस्या राहत नाहीत.
  • धनाच्या बाबतीत चांगले अनुभव येणासाठी गोमती चक्राला लाकडी च्या डबीत सिंदूर बरोबर ठेवावे. आणि ती डबी तिजोरीत ठेवावी.
  • महालक्ष्मी पूजन च्या दिवशी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला हत्ती आणि कमळावर बसलेली महालक्ष्मी चे सुंदर चित्र लावावे ह्याने घरात लक्ष्मी नांदते.

धन्यवाद…..!

Leave a Reply