१२ राशी आणि त्यात असलेली २७ नक्षत्र नक्षत्र ह्यातून चंद्र भ्रमण करताना २ पक्ष सुरु असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात १५/१५ तिथी असतात. (WHICH BIRTH – SHUKLA OR KRUSHNA PAKSHA?)
आपल्या पत्रिकेत पहिल्याच पानावर लिहिलेले असते कि आपला जन्म शुक्ल कि कृष्ण पक्षात झाला आहे. हे पाहण्यासाठी इमेज क्रमांक १ आणि २ पाहू शकता.
शुक्ल पक्षाच्या १५ तिथी खालील प्रमाणे आहेत.
१) प्रतिपदा २) व्दितीया ३) तृतीया ४) चतुर्थी ५) पंचमी ६) षष्टी ७) सप्तमी ८) अष्टमी ९) नवमी १०) दशमी ११) एकादशी १२) द्वादशी १३) त्रयोदशी १४) चतुर्दर्शी
१५) पूर्णिमा
कृष्ण पक्षाच्या १५ तिथी खालील प्रमाणे आहेत.
१) प्रतिपदा २) व्दितीया ३) तृतीया ४) चतुर्थी ५) पंचमी ६) षष्टी ७) सप्तमी ८) अष्टमी ९) नवमी १०) दशमी ११) एकादशी १२) द्वादशी १३) त्रयोदशी १४) चतुर्दर्शी १५) अमावस्या
प्रत्येक अमावास्यानंतर चंद्राच्या कला हळू हळू वाढत जातात आणि चंद्र पूर्णिमेकडे पूर्णतेकडे जात असतो ह्या १५ दिवसाला शुक्ल पक्ष असे म्हणतात. आणि ह्यात शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीपासून चंद्र हा बली होत जातो. आणि पूर्णिमा झाल्यानंतर त्याचा आकार कमी कमी होत जातो आणि पुढे तो अमावास्येला दिसेनासा होतो. ह्या पूर्णिमेनंतरच्या १५ दिवसाला कृष्ण पक्ष म्हणतात.
शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीपासून कृष्ण पक्षातल्या सप्तमी तिथी पर्यंत कुणाचा जन्म झाला असेल तर अशा सर्व व्यक्तींचा चंद्र बली असतो. अशा व्यक्ती मनाने मजबूत असतात, मानसिक स्थिती स्थिर असते, अशा व्यक्ती मन लावून कोणतेही कार्य करतात, मन भटकत नाही.
शुक्ल पक्षात ज्यांचा जन्म झाला असेल अशा व्यक्ती चंद्र सारख्या चमकणाऱ्या असतील, चेहरा गोल , गौर वर्ण , चित्त शांत, व्यावसायिक प्रवृत्ती, प्रत्येक कार्य मनाने करणारा स्वभाव, व्यक्ती लगेच पाप प्रभावात येत नाही, विचार शुद्ध असतात, पाप प्रभावात येत जरी असतील तरी काही चुका करण्याच्या अगोदर विचार करतील, भावनाप्रधान होतील, ज्ञान संपन्न असतात, सफलता साठी प्रयत्नशील असतील.
कृष्ण पक्षात ज्यांचा जन्म झाला असेल अशा व्यक्ती दयावान कमी असतील थोडे निष्ठुर होऊ शकतील, क्रोधी , स्त्री आसक्ती कमी स्त्री असेल तर पुरुष आसक्ती कमी, निर्णय क्षमता कमी, दुर्विचारी पण वाढतो, चुकीच्या वातावरणाचे चुकीच्या व्यक्तींचे प्रभाव लगेच ह्यांच्यावर पडतात, आस्थावान कमी, आपल्या कार्यात इतरांचे सहकार्य घेतात.
कृष्णपक्षात सप्तमी पर्यंत जर जन्म झाला असेल तर वरील विधानांमध्ये कमतरता येऊ शकते पण कृष्ण पक्षातल्या नवमी ते अमावस्या पर्यंत च्या जन्म मध्ये वरील विधाने जास्त जुळण्याचा संभव असेल.
माझे मत शुक्ल आणि कृष्ण पक्षातील जन्म घेणाऱ्या व्यक्तींसाठी
आजच्या युगात शुक्ल पक्षातील व्यक्तींनाच जास्त त्रास झालेला पाहण्यात येतो कारण ह्या व्यक्ती सरळ कॉम्पिटिशन करत नाहीत. डेरिंग कमी पडते, सरळ पणाने निर्णय घेण्याचा विचार हा त्यांच्या अंगलट येतो. आपला हक्क हिसकावून घेत नाहीत मिळतो का ते वाट पाहतात. कारण अशा व्यक्ती समाधानी असतात आणि आत्ताच्या युगात समाधानी असलेल्या व्यक्तीच मागे पडतात.
हा त्रास कृष्ण पक्षातील लोकांना होताना दिसून येत नाही कारण डेरिंग जास्त असते, आपला हक्क मिळविण्यासाठी ह्या व्यक्ती योग्य वेळी योग्य ठिकाणी कुदळ मारतात आणि दगडातून पाणी काढण्याची शक्ती प्राप्त करतात. मानसिक समाधान नसले तरी अशा व्यक्ती इतरांचा पोशिंदा म्हणून समाजा समोर येतात. स्वतः हि खातात दुसर्यालाही खाऊ देतात. केव्हा केव्हा हि प्रवृत्ती पत्रिका बरोबर नसेल तर मात्र खालच्या थराला व्यक्तीला नेऊ शकतील सांभाळावे.
सल्ला आणि उपाय
शुक्ल पक्षातल्या प्रतिपदा ते सप्तमी आणि कृष्ण पक्षातल्या नवमी ते अमावस्या ज्यांचा जन्म झाला असेल अशा सर्वानी मेडिटेशन चा सहारा घ्यावा, योगा करत राहावे, कोणतेही निर्णय घाई गडबडीत घेऊ नये. अध्यात्मिक राहून चंद्राला बळ देण्याचे उपाय करावेत खास पूर्णिमेला.
धन्यवाद…..!