Table of Contents
कसा बनतो शश योग
वरील पत्रिकेत केंद्र स्थानात (प्रथम चतुर्थ सप्तम दशम ) शनी लिहून दाखविला आहे. जर ह्या चार स्थानात कोठेही तुला राशी ७ नंबर बरोबर, मकर राशी १० नंबर बरोबर, कुंभ राशी ११ नंबर बरोबर शनी लिहिला असेल तर आपल्या पत्रिकेत पंचमहापुरूषातील शश योग होत आहे.
शश योगाची फळे
हा एक राजयोग मानला गेला आहे. पण इथे हा राजयोग आपोआप आलेला नसतो तो खूप मेहनत करून एखाद्या उच्च प्रतिष्ठित स्थानी व्यक्ती पोहचतो आणि समाजात ह्या व्यक्तीला इतरांकडून हे पद प्राप्त झालेले असते. ह्यालाच शनी चा राजयोग म्हणतात.
अशा व्यक्तीला लोकतांत्रिक प्रसिद्धी मिळते जे प्रजातंत्रात निवडून येतात. धातू विषयक कार्यात निपुण असतो. असा व्यक्ती गुप्त दानी असतो. जे केलेले दान इतरांना समजत नाही. व्यक्ती थोडा क्रूर, धाडसी होतो, स्वतःच्या आईबद्दल त्याला फार आदर प्रेम असते.
माझ्या मतानुसार खूप काही सोसून असा व्यक्ती एकदम निखरतो काही वेळा असेही दिसले कि ह्या योगात eव्यक्तीकडे असलेले कर्म त्यात तो कोणताही समझोता कुणाशीही करत नाही त्यासाठी तो स्वतःच्या सुखाचा कोणताही त्याग करण्यास तयार असतो.
शश योगाची स्थानागत फळे
- १ नंबर चे मेष लग्न असेल आणि ७ नंबर तूळ राशीत सप्तम स्थानी जर हा योग तो असेल तर तो आपल्या वैवहिक सुखाच्या स्थानात होत आहे. वैवाहिक स्थानाबद्दल इथे थोडे क्लेश उत्पन्न होऊ शकतील पण कार्य क्षेत्रासाठी हा शनी उत्तम असेल. असा योग असेल आपल्या पत्रिकेत तर सल्ला असा दिला जातो कि करिअर झाल्याशिवाय विवाह करू नये. नाहीतर ह्या योगाची फळे मिळताना कठीण होते. वयाच्या ३० पर्यंत ह्या फलितासाठी वाट पाहण्यात हरकत नाही. — कुंडली क्रमांक १ पहा
- मेष लग्नात मकर राशीत १० नंबर बरोबर शनी लिहिला असेल तर हा शश योग कर्म स्थानात होतो करिअर साठी हा योग उत्तम मानला गेला आहे. मात्र ह्यात सुद्धा वैवाहिक सुखासाठी उत्तम नव्हे आपण आपल्या कार्याकडे जास्त फोकस करावा आणि हा राजयोगाची फळे घ्यावीत असा सल्ला दिला जातो.– कुंडली क्रमांक १ पहा
- वृषभ २ नंबर च्या लग्नात हा योग ११ नंबर बरोबर शनी लिहिला असेल तर कर्म स्थानात होईल, भाग्याचा स्वामी १० नंबर मकर राशीचा स्वामी होऊन तो कर्म स्थानात येतो. आणि कर्म स्थानाचा मालक स्वतः आपल्या कुंभ राशीत बसतो त्यामुळे करिअर आणि भाग्याचा दृष्टीने हा एक राजयोग होऊ शकतो. मात्र ह्याच शनी ची १० वी दृष्टी मंगळाच्या वृश्चिक ८ नंबर शत्रू राशीवर विवाह स्थानावर येत असल्यामुळे वैवाहिक सुखाबद्दल इथे थोडा कमी फळ देण्याचा संभव नाकारता येत नाही. असे लोक बौद्धिक स्तरावर प्रगती करतात. राहू केतूच्या प्रभावात कमी फळ मिळते. — कुंडली क्रमांक २ पहा
- कर्क ४ नंबर च्या लग्नात हा योग ७ नंबर तुला राशीत होतो ४थ्या भावातून हा शनी लग्न स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे एव्हढा खास फळे देणारा हा शश योग मानत नाहीत तरीसुद्धा प्रॉपर्टी पैसा ह्याचे सुख व्यक्तीला असते. ह्यात चंद्र सुद्धा जर शनी च्या दृष्टीत युतीत असेल तर मात्र व्यक्ती डिप्रेशन ला गेलेले पहिले आहेत. — कुंडली क्रमांक ३ पहा
- ह्याच पत्रिकेत ४ नंबर च्या लग्नात १० नंबर मकर राशीत शनी असेल तर शश योग होतो ह्यात सुद्धा शनी लग्न स्थानावर दृष्टी टाकतो पण इथे वैवाहिक सुखात जोडीदार खूप मदतनीस असल्यामुळे व्यक्तीला सपोर्ट मिळतो आणि ह्या शश योगाची फळे मेहनीतने त्याला उशिरा का होईना वैवाहिक सुखात असताना शेवटी मिळतात वयाच्या ४५/५० नंतर.– कुंडली क्रमांक ३ पहा
- सिंह लग्नात ५ नंबर मध्ये विवाह स्थानात ११ नंबर ची कुंभ राशी येते आणि त्यात शनी असेल तर शश योग होतो. जोडीदार खूप चांगला सालाहकर असून तो विवाह सुखासाठी खूप चांगला मदतनीस होतो. इथे चौथ्या स्थानावर वृश्चिक राशी वर शनी ची १० वी दृष्टी खास चांगले फळ प्रॉपर्टी चे आणि सुख स्थानाचे देत नाही संघर्ष असू शकतो. — कुंडली क्रमांक ४ पहा
- ७ नंबर तुला लग्न असेल तर शनी इथे प्रथम स्थानी शश योगात त्याची फळे देताना व्यक्ती जनमानसात खूप फेमस असतो. मात्र स्त्रियांच्या बद्दल त्याची मते चांगली नसतात. ह्याचे कारण शनी वैवाहिक सुखात मेष राशीवर आपली ७ वी दृष्टी टाकतो. कर्मस्थानावर ४ नंबर चंद्राच्या राशीवर आपली १० वी दृष्टी टाकत असल्यामुळे करिअर मध्ये अप डाउन होते. किंवा एकदा तरी खूप खालचा स्तर पाहून व्यक्ती पुन्हा टॉप ला येतो. — कुंडली क्रमांक ५ पहा
- ह्यात ७ नंबर च्या लग्न कुंडलीत १० नंबर मकर राशी चौथ्या स्थानी शनी लिहिला असेल तर शश योग होतो. पंचमाचा स्वामी कुंभ ११ नंबर चा सुद्धा मालक होऊन तोच शनी मागील स्थानी असल्यामुळे इथे संतान प्राप्ती होताना त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. प्रॉपर्टी साठी उत्तम पत्रिका होते. कार्यक्षेत्री खूप मेहनत करावी लागते. — कुंडली क्रमांक ५ पहा
- ८ नंबर वृश्चिक राशीच्या लग्नात शनी जर ११ नंबर कुंभ राशीत असेल तर शश योग होतो. मंगळाच्या लग्न असेल तर शनी ची इथे प्रॉपर्टीज ची सुखे कमी होताना दिसतात. व्यक्तीला सतत घर बदलावे लागते अशा घटना होत असतात. पण त्यातही तो अग्रेसर होतो. वृश्चिक लग्न स्थिर लग्न आहे आणि शनी मंद ग्रह असल्यामुळे प्रगती होताना खूप हळू हळू होते कष्टाने होते पण व्यक्ती आपल्या जीवनात सफल होतो. भाग्य स्थानात चंद्राची राशी कर्क असल्यामुळे सतत स्थानबद्दल करू भाग्याला चमकावत राहावे लागते. — कुंडली क्रमांक ६ पहा
- मकर १० नंबर च्या लग्न कुंडलीत प्रथम स्थानी शनी लिहिला असेल तर शश योग होतो. असा व्यक्ती आपल्या कामात मग्न असतो. संसारात जास्त मिसळताना दिसत नाही. त्याचे कर्म त्याच्यावर हावी असते. आणि व्यक्ती कर्म स्थानी खूप प्रगती पथावर असतो. व्यक्ती आपले प्रेसेंटेशन उत्तम करतो. कुंडली क्रमांक ७ पहा
- ह्याच १० नंबर च्या मकर लग्न कुंडलीत कर्म स्थानी जर शनी लिहिला असेल ७ नंबर च्या तुला राशीत तर शश योग होतो. आर्थिक उन्नती होते. आपल्या करिअर मध्ये तो उत्तम व्यक्ती मानला गेला आहे. बाहेरील स्तोत्र आणि कार्यक्षेत्र उत्तम असते. कुंडली क्रमांक ७ पहा
- कुंभ ११ नंबर च्या लग्न कुंडलीत जर शनी प्रथम स्थानी लिहिला असेल तर शश योग होतो. ह्यात व्यक्ती विदेशात जाऊन खूप प्रगती करू शकतो. मातृस्थान पासून व्यक्ती लांब जाऊन प्रगती करतो. असे असेल तर व्यक्तीला शश योगाची चांगली फळे मिळतात कारण १२ स्थानात मकर राशी आहे ती शनी ची आहे. कुंडली क्रमांक ८ पहा.
नोट — वरील योग पाहताना शनी बरोबर कोणता ग्रह आहे शनी वर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे चंद्र आणि रवी ची स्थिती उत्तम आहे का. त्या पत्रिकेत शुक्र बुधाची युती तर नाही हे पाहून शश योग केव्हा हा योग फळे देतील हे ग्रहांच्या बलाबल ने निर्णय घ्यावा हे योग्य ज्योतिषांकडूनच समजते. तरी आपण असा शनी चेक करून झाल्यावर योग्य तो सल्ला घ्यावा.
धन्यवाद…..!