Table of Contents
शनी राहू युती एक प्रेतशाप योग
ज्योतिष शास्त्रात एक म्हण आहे ” शनी कुजवत राहू आणि राहू कुजवत शनी” अर्थात शनी राहूसारखे फळ देतो आणि राहू शनी सारखे. आता हे दोन्ही पाप ग्रह जर व्यक्तीच्या एकाच स्थानी कुठेतरी बसले असतील तर त्यास प्रेतशाप योगाची संज्ञा दिली जाते. अर्थात हा एक पितृदोष होतो. अशी युती जर आपल्या पत्रिकेत कोणत्याही एका स्थानी लिहिली गेली असेल तर खाली दिलेला लेख आपल्यासाठी असेल.
प्रथम ह्याची सामान्य फळे देतो
हि युती ज्यांच्या पत्रिकेत असेल चांगल्या स्थानी आणि ह्या दोन राशींना आवडणाऱ्या राशीत आणि स्थानात असेल तर ती चांगली फळे देणारी असेल. अशा वेळी व्यक्ती इतरांचा पोशिंदा असतो. भरपूर पैसे कामवितो आणि इतरांना मदत सुद्धा करतो. काही व्यक्ती राजकारणात किंवा मोठ्या पदावर पाहिल्या गेल्या आहेत.
जर हि युती मध्यम स्वरूपाची असेल तर म्हणजे ह्यांच्या डिग्री पाहून ठरविता येते. तर व्यक्ती सामान्य पणे थोडा कठोर असतो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि थोड्या कालावधीसाठी तो जीवनात हैराण सुद्धा होऊन नंतर शेवटी किंवा आधी स्थिर असतो. स्वतःच्या कर्तृत्वात आपले हित साधून पुढे जातो.
जर हि युती वाईट स्थानात किंवा वाईट राशीत असेल तर ह्या युतीची अगदी वाईट फळे मिळतात. अशा व्यक्ती समाजात घातक प्रवृत्तीच्या पाहिल्या गेल्या आहेत. आणि काही व्यक्ती पागल सुद्धा म्हणजे वेड्यासारखी करतात. त्यांच्या ऍक्टिव्हिटी ह्या असामाजिक तत्वाच्या असतील किंवा घरात कोणालाही त्रासदायक असू शकतील. किंवा आयुष्यात सक्सेस कोठेही न होता भटकंतीत असू शकतील.
वरील पैकी कोणत्याही स्थितीत हि युती चांगली किंवा वाईट असली तर इंडिविज्युअल सुखासाठी हि युती कधीही वाईटच मानली गेली आहे.उदाहरणार्थ वैवाहिक सुख आणि संतान सुख किंवा हेल्थ चे सुख किंवा प्रॉपर्टीज चे सुख मिळेलच असे नाही. हे त्या त्या स्थानाप्रमाणे असेल जिथे हि युती असेल.
शनी राहू राशींप्रमाणे युतीची फळे
तूळ, कन्या, मिथुन वृषभ ह्या राशीत म्हणजे ७/६/३/२ ह्या राशीत चांगल्या ठिकाणी हि युती व्यक्तीला फार उच्च पदावर नेऊ शकते. समाजात ह्यांचा धाक असू शकतो जर ह्या दोन्ही ग्रहांच्या डिग्री मध्ये फार कमी अंतर असेल तर हे होऊ शकते. पण १ ते ५ डिग्री किंवा २६ ते ३० डिग्री ह्यात येथील फळे कमी प्रमाणात दिसतील.
जर मेष वृश्चिक आणि कर्क सिंह धनु आणि मीन राशीत ह्या युत्या म्हणजे १/८ (मंगळाच्या राशीत) किंवा ४ ह्या चंद्राच्या राशीत किंवा ५ सिंह राशीत किंवा ९/१२ गुरु च्या राशीत हि युती असेल तर जास्त त्रासदायक पहिली गेली आहे. १/८ मध्ये जन्म स्थानी किंवा मातृ स्थानी ह्या युतीला त्रास होतात. मंगळाच्या कोणत्याही राशीत हि युती घातक ठरते ती ज्या स्थानात असेल त्या स्थानाची फळे हि उग्र मिळतात.
४ कर्क राशीत हि युती असेल तर मातृसुख कमी आणि भटकंती होते. ५ सिंह राशीत हि युती करिअर ला त्रासदायक पाहिली गेली आहे. किंवा आरोग्यासाठी सुद्धा उत्तम नसते ऊर्जा कमी होते. किंवा वडिलांचे सुख कमी असू शकते. किंवा वडिलांना त्रास असू शकतो. एखादा काका हा त्याच्या जीवनात त्रस्त पाहण्यात आला. किंवा मरणोत्तर त्याची विधी झालेली नसते.
१/८ मंगळाच्या राशीत घातपात होण्याची शक्यता फार असते किंवा एखादे ऑपरेशन सुद्धा होण्याचा संभव नाकारता येत नाही. किंवा रिलेशन मेंटेन करता येत नाही व्यक्तीला. ९/१२ मध्ये हि युती संतती साठी उत्तम मानली गेली नाही. तिला त्रास किंवा तिच्यापासून त्रास हे प्रकार पाहण्यात येऊ शकतील.
शनी राहू युतीची स्थानागत फळे
प्रथम स्थानी राहू शनी
प्रथम स्थानी हि युती फार भटकंती देते मातृ सुख कमी होते. प्रथम स्थानी १/८/४/५/९/१२ ह्या राशी इथे लिहिल्या असतील तर आई वडील पैकी एक लहानपणी जाण्याचे प्रकार जास्त दिसतात. दोन विवाह होण्याचे प्रकार पाहिले गेले किंवा वैवाहिक सुखात बाधा होऊ शकते. आरोग्य चांगले असते पण लहानपणी आरोग्याचे भरपूर त्रास पाहिले गेले.
द्वितीय स्थानी राहू शनी
द्वितीय स्थानी हि युती कुटुंब स्थानाचे सुख मिळताना कठीण होते. वाणीचा प्रभाव कमी होतो. पैशासंबधित त्रास सतत होतात. दिलेले पैसे अडकतात म्हणून सल्ला दिला जातो कि कुणाला मदत अथवा उसने देऊ नये. एखादे व्यसन असू शकते गुरु जर पत्रिकेत उत्तम स्थतीत नसेल तर हे हमखास पाहण्यात येते. घरात मंगलकार्य वर्षानुवर्षे होताना कठीण होतात.
तृतीय स्थानी शनी राहू युती
ह्या स्थानातील युती भावंडांचे सुख कमी एखादे भावंडं जाण्याचा योग फार दिसला. किंवा एखाद्या भावंडाची जबाबदारी पडते खास बहीण असेल तर. पराक्रम दाखविण्यासाठी इतर शहरातील भटकंती कामी येते. भावंडात राहून सुख कमी पाहिले गेले. दोन भावंडं एकत्र राहताना एकाचा भयोगदाय अडकतो.
चांगल्या राशीत हि युती असेल मोठे मोठे बिल्डर ह्या युतीवर निर्माण झाले. देश सोडून प्रगती करून नावारूपाला आलेले. आणि लहानपणापासून च्या परिस्थिती बदलून टाकून आयुष्यात सक्सेस झालेल्या व्यक्ती पाहण्यात आल्या.
चतुर्थ स्थानी शनी राहू युती
मातृ सुखासाठी इथे हि युती उत्तम नाही. प्रॉपर्टीमध्ये त्रास होतो. घरात वाद विवाद पाहण्यात येतात. इथे चांगल्या राशीत हि युती नसली तर आई वर संसाराची जबाबदारी येते तिला कठीण जाते. ह्या घराण्यात प्रॉपर्टी पासून काहीच फायदा पाहिला गेला नसतो. कुटुंब विखरलेले असू शकते. किंवा ज्याच्या पत्रिकेत हि युती असेल तो मातृस्थानापासून लांब जाऊन प्रगती करतो. जन्म स्थानी ह्या युतीची कठोर फळे मिळतात. ह्या युतीत पिता अल्पायु आई दीर्घायु दिसली.
जर चांगल्या राशीत हि युती असेल तर व्यक्ती इंजिनिअर, शेती, खाणी व्यवसायात दिसतो. वाळू उपासणारे ह्या युतीवर जास्तीत जास्त दिसले आणि असामाजिक तत्वावर काम करून पैसे मिळविणारे सुद्धा दिसले.
पंचम स्थानी शनी राहू ची युती
पत्नी ला पोटाचे आजार, संतान सुख कमी, बुद्धिवादी, स्वार्थी अशा व्यक्ती पाहण्यात आल्या. करिअर मध्ये सतत उतार चढाव दिसला. अशा व्यक्तींच्या संतती जर जवळ असतील तर त्रास नाहीतर लांब असतील तर मोठ्या झालेल्या पाहण्यात येतात. हे तेथील राशीवर अवलंबून असेल. कोणत्याही परिस्थितीत येथील युती पितृदोष निर्माण करते त्यामुळे आधीच्या पिढीतील दोष हे पुन्हा पाहण्यात आले.
षष्ठ स्थानी शनी राहू ची युती
चांगल्या राशीतील हि युती मोठ्या पदावर काम करणारी दिसते, आधी शत्रू निर्माण होतात नंतर शत्रूवर मात करून पुढे जातात. सतत स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिशन ह्याचा सामना करावा लागतो. वाईट राशीतील हि युती कर्ज सतत दिसते किंवा आरोग्याला त्रास होतो.कोर्ट कचेरी होते. गुरु पत्रिकेत उत्तम नसला तर वैवाहिक सुख कामी होते. एखादा असाध्य रोगात पैसे खर्च होतात.
सप्तम स्थानी शनी राहू युती
ह्या युतीची फळे हि वैवाहिक सुखासाठी उत्तम नव्हेत. मात्र जर पती पत्नी दोघेही सामाजिक काम करत असतील किंवा २४ तासांमधून १५/१६ तास हे कामात असतील म्हणजे करिअर ओरिएंटेड पती पत्नी असतील तर त्रास कमी होताना पाहिला गेला.
ह्या युतीची फळे शारीरिक सुख कमी देतात. एकत्र कुटुंबात त्रास होताना दिसला. मुलींच्या पत्रिकेत हि युती काळजीची वाटली वैवाहिक सुखासाठी.
अष्टम स्थानी शनी राहू
आरोग्याच्या तक्रारी किंवा सतत अडचणी समोर येताना दिसतात. कुटुंब सुख कमी, आईवडिलांच्या सुखात त्रास होतो, एखादी प्रॉपर्टी वाद होतो. पण काही कारणाने धन अचानक मिळते. वृद्धपकाळात त्रास पाहण्यात आला. ह्या स्थानी हि युती व्यक्तीला एकटेपणा देते. काही गोष्टी ह्या आयुष्यात कधीच उघड होताना दिसत नाहीत. किंवा त्यांचा उलगडा कुणाला करता येत नाही. अशा व्यक्तींच्या अंगी गूढ पण जास्त येतो .
नवम स्थानी शनी राहू युती
परदेश गमन ह्या युतीवर होतेच. प्रगती हि दुसऱ्या प्रांतात करावी असा सल्ला दिला जातो. येथील हि युती पित्यासाठी उत्तम फळे मिळत नाहीत. ह्या युतीवर जन्म होणाऱ्या व्यक्तीच्या घराण्यात पितृदोष हमखास पाहण्यात येतो. भाग्योदय होताना कठीण होतो. जीवनातील एक तरी गोष्ट मिळताना कठीण होत जाते बरीच वर्षे वाट पाहावी लागते. शिक्षण उत्तम झाले तर भाग्योदयात अडचणी येताना पहिल्या गेल्या. मोठी बहीण असेल तर तिची जबाबदारी घ्यावी लागते असे दिसते कारणे हि वेगवेगळी असू शकतील. किंवा मोठ्या बाहीचा प्रभाव जास्त पाहण्यात आला. नसेल तर मोठा भाऊ नसतो किंवा हा व्यक्तीला भावंडच नसतात. एकटा असतो.
दशम स्थानी राहू शनी युती
हि युती इथे उत्तम फळे करिअर मध्ये देताना दिसली आहेत. अशा व्यक्तींनी निर्माण व्यस्थेत कामे करावीत. एखादा प्रोडक्ट स्वतःच्या नावाने काढून ब्रँड बनवावा आणि तो पुढे चालवावा हे उत्तम. ह्या युतीची फळे जर चांगली करिअर मध्ये मिळाली तर ती जन्म स्थानापासून दूर असू शकतील तर उत्तम नाहीतर वैवाहिक किंवा संतान सुखासाठी उत्तम नव्हेत. जास्त व्यापारी पणा ह्या युतीत इथे दिसतो नोकरीत कमी लाभ मिळतात. नोकरी असेल तर रिटायरमेन्ट ला त्रास होताना दिसतो.
मोठ्या पदावर सरकारी अधिकारी ह्या युतीत दिसले परंतु ते कर्मठ मिळाले. स्वतःचं नाव राखण्यासाठी काहीही करणारे अधिकारी ह्या युतीत जन्माला आलेले दिसले. किंवा इतरांना खूप त्रास देणारे अधिकारी सुद्धा पाहण्यात आले असे नसेल तर त्यांना वैवाहिक सुख नसताना सुद्धा पाहण्यात आले. संतती होताना कठीण होते इथे.
लाभ स्थानातील शनी राहू युती
संतती बाधा उत्पन्न होते. लोभी स्वार्थी व्यक्ती दिसतात ह्या युतीवर. लाभ उत्तम पैसा खूप मिळाला तर संतान दूर होते. किंवा तिला त्रास होतो. राहू शनी च्या ह्या युतीवर बरेच व्यापारी इथे प्रगतीपथावर दिसले. नोकरीत असणारे व्यक्ती इथे हैराण होताना दिसतात. हि युती थोडी इथे व्यक्तीला भटकंती करायला लावते. चांगल्या राशीत हि युती प्रथम खूप मेहनत करायला लावते नंतर स्थिरता देते.
विद्यार्थी दशेत जर शिक्षण हे एखाद्या कोर्से चे झाले तर उत्तम परंपरेगांत अभ्यास काही कामाचा पाहिला गेला नाही. एखाद्या कमर्शिअल शिक्षणाने करिअर करण्याचा सल्ला दिला जातो. वकिल , सामाजिक संस्थेचे अधिकारी ह्या योगावर पाहिले गेले. सरकारी नोकऱ्या असतील तर संतान सुख कमी.
द्वादश स्थानी शनी राहू युती
जन्मस्थानापासून दूर जाऊन ह्या व्यक्तींना जास्तीत जास्त आपले करिअर करण्याचा सल्ला दिला जातो. जन्म स्थानी विवाह सुख, प्रॉपर्टी सुख, मातृ सुख कमी दिसले. परदेश गमन सतत दिसले. हि युती इथे व्यक्तीला स्वत्रंत ठेवत नाही सतत दबावात ठेवते कुणाच्या तरी म्हणून त्रास होतो. ह्या युतीवर बंधन योग होतो. आरोग्यासाठी सुद्धा काही जणांना त्रास होताना पाहिले गेले. काही जण जेल यात्रा करतात ह्या युतीवर. किंवा सरकारी जेल अधिकारी ह्या युतीवर जन्माला आलेले दिसले. ह्या युतीत स्वतःच्या बॅंकबॅलन्स ला प्रॉपर्टीज ला स्थिरता मिळताना कठीण होते वयाच्या ४२/४८ पर्यंत हा त्रास असतो.
शनी राहू युती चे सामान्य उपाय
- ह्या युतीवर वरील कठोर फळे मिळत असतील तर प्रथम पितृदोषाचे उपाय करावेत. त्यात त्रिपिंडी श्राद्ध उत्तम. (ह्यावर माझ्या वेब ला माहिती दिली आहे)
- ह्या युतीचा सामान्य उपाय म्हणजे किडी दान सांगितले गेले आहे. करिअर मध्ये किंवा कोणत्याही दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्रास होत असेल तर सरळ मुंग्यांना चिमूटभर साखर पीठ रोज घालत जावे कोणत्याही झाडाखाली.
- ह्या युतीवर विक्षिप्त माणसे दिसली तर त्यांना वळणावर आणण्यासाठी किंवा एखाद्या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रत्येक रविवारी आणि अमावास्येला आंधळ्यांना अन्न दान एखाद्या आश्रमात करू शकता.
- ह्यात शनिवारी पिंपळाचे संगोपन त्याची सेवा पूजा अर्चा उत्तम .
धन्यवाद…..!